✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझे काही "पाहण्याचे" कार्यक्रम... :)

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 08/31/2008 - 18:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42146 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

न
नंदन Sun, 08/31/2008 - 18:29 नवीन

मस्त

लेख, तात्या. लेखाची शैली तुझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा थोडी वेगळी वाटली. दोन्ही किस्से मजेदारच. बिवलकर काकूंची प्रतिक्रियाही आवडली. अजूनही असेच किस्से असतील, तर ते वाचायला आवडतील. (बोरिवली, मुलुंड ही सुरुवातीची दोन टोकं झाली -- आता हळूहळू मुंबईकडे सरकायला हरकत नाही ;))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 08/31/2008 - 18:53 नवीन

हेच म्हणतो

शैलीतील बदल सुखावह आहे. आपला, (उपवर) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मेघना भुस्कुटे Sun, 08/31/2008 - 19:58 नवीन

असेच

असेच म्हणते! सात्विक वाचून नाही म्हटलं तरी जरा कंटाळा आलाच होता. हे वाचताना धमाल येतीय. :) लवकर लिहा आणखी अनुभव असतील तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ध
धनंजय Tue, 09/02/2008 - 15:58 नवीन

हेच म्हणतो

ही शैलीही उत्तम हाताळली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/31/2008 - 18:32 नवीन

मस्त

मस्त तात्या, "हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" "अभ्यंकर? अरे हां हां! बरोबर! अभ्यंकरच. सॉरी हां, माझा जरा घोटाळा झाला. मेहेंदळे सात वाजता यायच्येत!" हे सहीच! आता मिपावर कांदापोह्यांची जागा वांगीभात घेणार का? अदिती
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 08/31/2008 - 18:33 नवीन

वा तात्या...

वा तात्या... मानला तुम्हाला...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 08/31/2008 - 18:38 नवीन

अरे वा ह्या विषयावरचं

लिहिणार असं मागं म्हणाला होतात तात्या, तसं खरंच लिहिलंत की! बिवलकरांचा किस्सा खरंच मनोरंजक आहे. कुठलीही परीटघडीची भीडभाड न बाळगता वांगीभात चापण्याची आणि नारळाच्या वड्या खात त्यांचे कौतुक करण्याची तुमची रसिकता भावली!;) अजूनही असे अस्सल किस्से येऊदेत! (खुद के साथ बातां : गाण्याचा कोणी शौकीन भेटला आणि बघायच्या कार्यक्रमाऐवजी गाण्याची मैफिल करुनच तात्या आले असा एखादा किस्सा असेल का रे रंगा? B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/31/2008 - 18:43 नवीन

ह.

ह. घ्या. (खुद के साथ बातां : गाण्याचा कोणी शौकीन भेटला आणि बघायच्या कार्यक्रमाऐवजी गाण्याची मैफिल करुनच तात्या आले आणि म्हणूनच ते स्थळ हातचे गेले असा एखादा किस्सा असेल का रे रंगा? ) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/31/2008 - 18:41 नवीन

मस्त...

मस्त... नंदनशी सहमत. "मुलगा? अहो मीच मुलगा आहे!" :) "हो का? वा वा वा!" जोश्या मनसोक्त हासत उद्गारला! :) :) कसला पोपट ..... बिपिन.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 08/31/2008 - 21:12 नवीन

तात्या,

तात्या, भाग आवडला... ..... मी तीन मुली घरी जाऊन पाहिल्या, त्या आठवणी जागृत झाल्या...... पोरींच्या बापांशी जाम अवांतर / फाल्तु विषयांवर बोलावं लागतं.... ( त्या वेळी मी मोरूची मावशी नाटकात काम करत असे...मग काय, मुलीच्या बापाशी अत्र्यांची नाटकं याविषयावर काहीबाही बोलत वेळ काढला...आणि पोरीने चकार शब्द काढला नाही...) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रेवती Sun, 08/31/2008 - 19:10 नवीन

अरे वा!

तात्या, आपण हे अनुभव मोकळेपणाने सगळ्यांना सांगताय ह्याचेच कौतुक आहे. मला वाटते बरेच जण आपापले असे अनुभव सांगतील आता! वांगीभाताचा किस्सा आवडला. इतके मनमोकळे लोक आता कमीच झालेत. चचलेले या शब्दाचा अर्थ समजला नाही. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/01/2008 - 00:46 नवीन

रेवती, चचले

रेवती, चचलेले या शब्दाचा अर्थ समजला नाही. चचणे म्हणजे मरणे. आमच्या गुरुजींनी "अंतुबर्वा" ह्या लेखात हे क्रियापद वापरले आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शैलेन्द्र Sun, 08/31/2008 - 19:17 नवीन

चचलेले==

चचलेले== देवाघरि गेलेले..
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/31/2008 - 22:37 नवीन

अरेरे!

मला माहीत नव्हते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
ट
टारझन Sun, 08/31/2008 - 20:13 नवीन

तात्या हे काय ?

असं म्हणून भाबडेपणाने, मोकळेपणाने हासत काकू उद्गारल्या! छ्या! मला तर आता त्या मुलीपेक्षा काकूच जास्त आवडू लागल्या होत्या!
तात्या .. असं माझं टिन एज मधे व्हायचं बॉ ... आता चोविशीत खोट काय बोलू ... लेखणात मला पु.लंचा प्रभाव दिसला. उत्तम लेख ... वास्तविकता डायरेक्ट डोळ्यासमोर आमचाही एक किस्सा : .......... मावसभावाच्या लग्नासाठी २ वर्षांपुर्वी नासकात गेलो होतो. सकाळी मुलीकडच्यांनी राहण्या साठी घर दिलेलं..अंघोळ आणि नाष्ट्याची सोय होती . दुसर्‍या दिवशी सगळं आवरून नाष्ट्यासाठी जाणार तोच २ टोपड्यांनी मला पकडलं. माझं शिक्षण आणि मी कोण हे पुर्ण माहित होतं त्यांना. पण मी त्यांना ओळखत नव्हतो. मला म्हणे इथे अंमळ गर्दी आहे, आपण आमच्या घरी चलावे. मी म्हंटलं असंल कोणी तरी पोरीकडचा, इथला खाऊ संपला म्हणून आपली खास व्यवस्था केली असेल. मी होकार द्यायच्या २ मिनीटात एका रिक्षात कोंबून मला त्या घरी नेण्यात आलं. मी फक्त नाष्टा करायला जायचं या मानसिकतेत होतो. १० मिनीटावर घर होतं . ......... मस्त २ मजली बंगला होता, बाहेर धान्य वगैरेचं गोदाम , ट्रॅक्टर , एक जिप ..घरामागे मोठ्ठ वावर. एक द्राक्षाची बागही होती साइड ला. फॅमिली बक्कळ पैका वाली असावी.मी येण्याची आधीच कल्पना आहे की काय आत सगळं नीट नेटकं आवरलेलं, एका बाजुला झोक्यावर त्या घरातले पुराणपुरूष झोका घेत लिहिता आणि उच्चारता न येणारा झोक्याचा आवाज करत शांतता भंग करत होते. हॉल मधे लाकडी सोफे त्यावर कुशनच्या उशा (हे मला बिककुल कंफर्टेबल वाटलं नाही) आणि उत्तम बैठकीची व्यवस्था होती. कुठे कोणी पादलं तरी एका मोठ्या दिवाणखाण्यात सगळी फॅमिली वास हवेत विरायच्या आत जशी जमा होते इथे सगळी फॅमिली हजर. कर्णधाराने फिल्डींग लावल्याप्रमाणे सगळे आपापल्या पोझिशन वर होते. घरातले कर्ते आणि मुखिया वाटनारे गृहस्थ ३-४ लटकेलछाप लोकांना घेउन बसले होत.त्यांची मुले पण एका कोपर्‍यात बसलेली. एक जण आभ्यास करत होता (एप्रिल मधे अभ्यास? मी ताडले ते बेनं नुसतं नाटक करत होतं ) सुना स्वयंपाक घरातुन डोकवत होत्या. १२-१५ वर्षांच्या ३ मुली उगाच मला पाहून एकादा लै भारी विनोद झाल्यावर ह ह पु वा व्हावी तशा(किंवा पौराणिक मालिकांमधल्या राजकन्या व तिझ्या मैत्रिणी जशा कारण नसताना हसतात तशा) उगाच हसून एकडून तिकडून येऊन स्वैंपाकघरात पळत होत्या. मी अजुन ही निरागस मनाने गंमत पहात, मी मुलाचा भाउ आहे म्हणून आपल्याला काही फॉरेन रिटर्न सारखी वागणुक मिळते आहे असे समजुन फुगत होतो. मी आल्यावर सगळेच आपल्याघरी कृष्ण दही चोरायला आला असा आनंद त्यांना झालेला. सगळे उभे राहिले. आणि "आमच्या घरी चला" म्हणनारे कुठे तरी धान्याच्या पोत्यांवर विराजले.अजुनही ट्युब पेटत नव्हती. मग घरातुन चहा आला. आम्ही अंमळ बोर माणूस , चहाच्या बाबतीत बाजीराव नखरे फार. "चहा नको .. मला त्याबरोबर गुडडे ची बिस्किटे लागतात." असं म्हंटल्याबरोबर एका आदेशासरशी अभ्यास करणारं(!!) ते बेनं बाणासारखं बाहेर पळालं मोजुन २ मिनीटात चहा गार व्हायच्या आत माझ्या पुढ्यात बिस्किटे हजर. आपण ऑलिंपीक मेडल जिंकल्याचा आनंद त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत होता. च्या-बिस्किटं झाल्यावर, एक काकू मला स्वयंपाक घरातुन येत आहेत असं मला ८० अंशाच्या कोनातुन दिसलं.. त्यांच्या मागे एक गोरी पान,सुंदर,ऍव्हरेज उंचीची मुलगी मस्त साडी घातलेली, पदर थोडा डोळ्यांपर्यंत , हातातल्या ट्रे भल्या मोठ्या ट्रे मधे पोहे, बालुशाही,गुलाबजाम, समोसे, आणि अजुन कसलासा पदार्थ होता. चहा+बिस्किट नाकात गेलं आणि खोकला लागला .४४० किलो व्होल्टचा झटका लागावा आणि काळजात धस्स्स व्हावं आणि मति खुंटावी असलं फिलींग मला पुर्वी कधीही आलं नव्हतं.मला परिस्थितीची कल्पना आल्यावर सावरायला ५-१० सेकंद गेले. मी बावळटासारखा तिच्याकडे पहात होतो. आयला "आपल्याला दाखवण्याचा" प्रोग्रॅम आहे , ही गोष्ट पटतच नव्हती. मी खरोखर स्वता:ला पिंच करून पाहिलं. बापरे.. मी जाम घाबरलो. पोहे खाऊन झाले. गुलाबजाम मला आवडतात हे सिक्रेट माहिती असावं , मोठ्याबाउल मधे २०+ गुलाबजाम होते. मी कसे बसे (जबराइच्छा होत असताना) फक्त ६-८ गुलाबजाम खाल्ले. आणि त्या कर्त्याने डायरेक्ट विषयाला हात घातला. "काय मंग जावायबाप्पू .. पोरगी पसंत का ? आम्हाला तुम्ही कालच पसंत पडले ........." असली खतरा सुरूवात ...( आयचा घो ... टार्‍या ... तुझी कन्यारास यावेळी कशी गप्प बसली बे ?) माझी बोलती बंद झालेली .. मी त् त् प् प् करत होतो. मी म्हणालो मी असला विचार नाही हो केला अजुन .. मी तर आजुन जॉबलेस आहे हो .. त्यावर ते म्हणाले आवो .." कुटं चाकर्‍या करत बसता .... आमची बागायती हाय, द्राक्ष, कापशी आन् उसाचं आमुक आमुक मिळतं .. " खुल्लमखुल्ला ऑफर ? मला काहीही सुचत नव्हतं ... चहा-पोहे खाऊन नाय कसं म्हणू याचं बळच जिवावर आलेलं... कसं बसं बडबडायला लागलो (मला सुचलं नाही की उगाच इंग्लिश बोलायची सवय आहे) ... मी इंग्लिश सुरू झाल्यावर तर सगळे लोक अजुन ४ पावलं पुढे सरकुन मी काय बोलतोय हे ऐकत आहेत असा भास मला झाला.आईशी चर्चा करावी लागेल, असं पटेबल कारण देत शेवटी कसा बसा निसटलो .. जाताना पोरीकडे एक फिल्मी लुक दिला, बिचारी 'चक्क' लाजली आणि मी 'तिला नाही म्हणनार आहे' हे शल्य मनात ठेउन निघालो . (समाप्त) अविवाहित -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 08/31/2008 - 21:13 नवीन

टार्‍या,

टार्‍या, आवडला रे तुझा लेख.... :):) ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्वाती दिनेश Mon, 09/01/2008 - 11:35 नवीन

अरे..

बा टारझना,तुझा किस्सा वाचल्यावर कसे काय त्या (अचानक उद्भवलेल्या) प्रसंगाला तू (गुलाबजाम खात खात)तोंड दिले असशील ते दृश्य डोळ्यासमोर आले,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ल
लिखाळ Mon, 09/01/2008 - 15:33 नवीन

जोरात !

टारझन महाशय, किस्सा मस्तच.. फारच जोरात ! >>मी आल्यावर सगळेच आपल्याघरी कृष्ण दही चोरायला आला असा आनंद त्यांना झालेला.<< हा हा हा.. हे फारच मस्त ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/01/2008 - 15:52 नवीन

टार्‍या,

टार्‍या, दही थोडंसं तरी चाखून बघितलं का रे? म्हणजे गोड का आंबट ते तरी कळलं असतं... ;) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ट
टारझन Mon, 09/01/2008 - 16:44 नवीन

नको ..

नको .. दह्याची चव घेतली असती तर तिथेच लोणी घुसळायचा जॉब मिळाला असता ...आणि पोती वहावी लागली असती (सुचक डांबिस कृपा) आणि आज इमानात बसून आफ्रिकेत मज्जा मज्जा करायला भेटली नसती .. दही खाण्यापेक्षा टस्कर देणे सोप्पे :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/01/2008 - 16:51 नवीन

असो... हा

असो... हा विषय आपण इथे (म्हणजे ह्या धाग्यावर) थांबवू... रात्री प्रत्यक्ष बोलू... टिंग्याचे मतही विचारात घेता येईल... ;) काही नाही तुझी काळजी वाटते म्हणून हा उपद्व्याप :S बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
संदीप चित्रे Tue, 09/02/2008 - 20:04 नवीन

भलताच सटका !

>> आयला "आपल्याला दाखवण्याचा" प्रोग्रॅम आहे हहपुवा टार्‍या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/31/2008 - 19:43 नवीन

टार्‍या,

टार्‍या, तसंही तुला कोणाला नाही म्हणायाला अंमळ जडच जातं, विशेषतः काका लोकांना.... मला माहित आहे. कसला प्रसंग गुदरला रे तुझ्यावर. माणसं काय काय थराला जातात. मस्त लिहिलं आहेस. बिपिन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/31/2008 - 20:26 नवीन

खासच अनुभव!!

तात्या, मस्तच लिहिलंत!! बिवलकर काकू एकदम आवडल्या! :) आणि तुम्ही हे अनुभव मोकळेपणे लिहिताय हे ग्रेट! टार्‍या , सह्हीच रे!! त् त् प् प् एकदम झक्कास!! =))
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/31/2008 - 20:27 नवीन

पारदर्शक

आवड्ले मज आवड्ले. मनापासुनी आव्ड्ले. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 08/31/2008 - 21:35 नवीन

:)

टार्‍या अन् तात्या दोघांचेही अनुभव मस्त! (अननुभवी) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 08/31/2008 - 21:50 नवीन

ह्म्म!!

तात्याशेठ, वेगळ लेख.. किस्से आवडले.. प्रेवि मुळे आमच्या आयुष्यात 'कांदापोहे' खायचा योग काही आला नाही.. राहीन गेलेल्या गोष्टी.. अशी पाहून न जमलेली मुलगा मुलगी नंतर कधी भेटले तर त्या दोघांना काय वाटत असेल? हा विचार नेहमी मनात येतो.. (प्रेवि)केशवसुमार
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 08/31/2008 - 22:18 नवीन

अशी पाहून

अशी पाहून न जमलेली मुलगा मुलगी नंतर कधी भेटले तर त्या दोघांना काय वाटत असेल? हा विचार नेहमी मनात येतो.. (प्रेवि)केशवसुमार हा एकांकिकेचा झकास विषय असू शकतो... यावर संवाद पाडीन म्हणतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
र
रेवती Sun, 08/31/2008 - 22:55 नवीन

अगदी!

हा विचित्र प्रसंग माझ्या भावाच्या बाबतीत घडला आहे. त्याचे लग्न ठरले व होणार्‍या वहिनीला घेऊन मी, भाऊ, वहिनी, माझा नवरा व मुलगा असे आत्याकडे गेलो तर तीने सांगितले की तीचे आणखी एक नातेवाईक त्यांचा मुलगा व होणारी सून असे भेटायला येणार आहेत. जेंव्हा ते आले (म्हणजे अजून दरवाजातच होते) माझ्या भावाचा व त्या आलेल्या नातेवाईकांच्या सूनेचा चेहरा पडला. त्या दोघांशिवाय कुणालाही याबद्द्ल माहीत नव्हते (माझ्या आई बाबांना माहीत होते पण ते आमच्याबरोबर नव्हते). हॅलो म्हणून झाल्यावर भाऊ व माझी होणारी वहिनी स्वयंपाकघरात जाउन बसले. आम्ही तेथून लवकर सटकलो हे सांगायला नको. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
वाचक Tue, 09/02/2008 - 05:11 नवीन

तेंडुलकर

ह्यांची एक गोष्ट आहे - कथा संग्रहाचे नाव आत्ता आठवत नाहिये - पण मुलगा त्या मुलीला 'काकूबाई' समजून नकार देतो आनि मग ती मुलगी त्याच्या घरी येउन त्याची उलटतपासणी घेतल्यासारखे प्रश्न विचारुन त्याला निरुत्तर करते - संवाद अप्रतिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मेघना भुस्कुटे Tue, 09/02/2008 - 07:04 नवीन

'आमच्यावर

'आमच्यावर कोण प्रेम करणार?' - 'तेंडुलकरांच्या निवडक कथा'मधे समाविष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
व
वाचक Tue, 09/02/2008 - 08:09 नवीन

बरोबर -

आत्ताच बेसमेंटमधे जाउन बघितले पुस्तक - धन्यवाद मेघना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
प
पद्मश्री चित्रे Mon, 09/01/2008 - 16:51 नवीन

लेख मस्त आहे..

आणि प्रांजळ. आवडला. >>अशी पाहून न जमलेली मुलगा मुलगी नंतर कधी भेटले तर त्या दोघांना काय वाटत असेल? हा विचार नेहमी मनात येतो मी बघितलेला एक मुलगा माझ्याच ऑफीस ला होता, पण पुण्यात. पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांच्या नावावर काट मारली.पण बढ्त्या -बद्ल्या घेत घेत आम्ही २ वर्षापूर्वी एकाच ऑफीस ला आलो. प्रथम एक्मेकानां बघुन दचकलो,ऑकवर्ड वाटलं. आधी बरेच दिवस बोललोच नाही. टाळायचोच बोलणे.पण हळु हळु सगळं नॉर्मल झालं. आता आम्ही अगदी छान सहकारी मित्र आहोत. ( हा लेख त्यानेच आधी वाचला आणि मला वाचायला सांगितला.. आणि खूप हसलो..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सहज Sun, 08/31/2008 - 22:26 नवीन

सही

तात्या आणि टार्‍या किस्से आवडले. :-) प्रेवि जिंदाबाद!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/01/2008 - 04:19 नवीन

+१

हेच म्हणतो.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋषिकेश Sun, 08/31/2008 - 22:36 नवीन

मस्त!

हा हा! छानच! तात्या, मस्त विषय आणि लेखनशैली! अजून येऊ द्यात. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 08/31/2008 - 22:57 नवीन

मस्त!

आमचा प्रेमविवाह असल्याने कांदेपोह्यांची बैठक हा विषय अपरिचित, पण तात्याने वर्णन केलेले अनुभव वाचून =)) विशेषतः स्वतःचा झालेला पोपट मनमोकळेपणाने चित्रित करण्याची इष्टाईल आवडली....:) हे खरंच असं असतं का हो? की काल्पनिक? ;) अप्रतीम चवीचा वांगी-भात, सोबत तितकीच सुंदर काकडीची कोशिंबिर आणि घरी केलेली अतिशय सुरेख अशी नारळाची वडी! मी मनमुराद दाद देत त्या बेतावर तुटून पडलो! तात्या, हे मात्र खूप आवडलं!! अरे, भोजन सत्य, पोरगी मिथ्य:! [स्वगतः हे परमेश्वरा, अशा प्रसंगातून सोडवल्याबद्दल मी तुझा आजन्म ऋणी राहीन!!:) पण प्रेमविवाहातही सगळं साधं-सोपं असतं असं समजू नका मंडळी! आता त्या अनुभवावरही एक लेख लिहायला हवा!! :X ]
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/31/2008 - 23:28 नवीन

:)

तात्या, किस्से आवडले आणि लिहिण्याची शैलीही. मी घरात शिरलो. जोश्या 'बसा' म्हणाला. पुढचा क्षण हा नियतीने आमच्या थोराडपणावर घातलेला घाला होता! "हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" जोश्याने आपलेपणाने, भोळेपणाने विचारलंन, परंतु आपण नक्की कुठला बाँब टाकला आहे याची त्या बिचार्‍या जोश्याला कल्पना नव्हती! हा हा हा हा =)) असा प्रसंग तर दुश्मनावरही येऊ नये.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 08/31/2008 - 23:31 नवीन

मस्त अनुभव

माझा स्वतःचा असा अनुभव नसल्याने अशा प्रसंगांना कधी तोंड द्यावे लागले नाही. अर्थात, देण्याची इच्छाही नव्हती. :) पण तुमचे किस्से आवडले. मस्त!
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sun, 08/31/2008 - 23:35 नवीन

वांगीभात!

मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात वांगीभात! मजा आहे. पहिल्या किश्श्यातल्या जोशीकाकांना मुलगा एकटा येणे अपेक्षित नसावे बहुतेक. आणि पुढे झालेले गृहस्थ ;-) मुलगा नसावेत असे वाटले असावे. मी मुलगा बघायला अशी एकदाच एका मुलाच्या घरी गेले होते. त्याच्या आईशी पुष्कळ गप्पा मारून परतले. बाकी इतर वेळी मुलगा व मी एखाद्या उपहारगृहात एकमेकांना पाहून घेत असू. अश्या प्रकारात भरपूर मित्र झाले. बहुतेकांची आता लग्ने (एकेक) झाली आहेत. संपर्क अधून मधून होतो. त्यात काही विशेष वाटत नाही. (रेवती यांच्या अनुभवाचे आश्चर्य वाटले.)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/01/2008 - 00:29 नवीन

हो पण,

रेवती यांच्या अनुभवाचे आश्चर्य वाटले धक्का बसला, कि आता हे इथे कुठे आलेत? किंवा आपण इथे अगदी आत्ताच का आलो?. त्यानंतर वर्षभरात माझ्या आईला सूनेच्या डोहाळेजेवणाचे आमंत्रणही आले. त्यावेळेस काही विचित्र वाटले नाही. आधी माहीत असणे की कोण भेटणार आहेत व दाखवण्याच्या कार्यक्रमात ओळख होताना कीती मोकळेपणा (बोलण्यात) मिळाला यावरही गोष्टी अवलंबून असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृदुला
प
प्राजु Sun, 08/31/2008 - 23:39 नवीन

अरे वा...

तात्या, एकदम मस्त आहेत दोन्ही अनुभव. आणि हो,खरंच लेख शैली मध्ये बदल जाणवला बरं. हरकत नाही . पण मला एक प्रश्न पडला आहे.. तुम्हाला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये वांगी भात आणि कोशिंबीर बरी मिळाली हो!!!;) नाहीतर जनरली, चहा-पोहे असाच बेत असतो . म्हणून तर त्याला मुलगी पाहण्याचा किंवा दाखवण्याच्या कार्यक्रम न म्हणता चहा पोह्याच्या कार्यक्रम म्हणतात. क्वचितच कधी तरी पोह्याच्या जागी उपमा आणि उन्हाळा असेल तर चहाच्या जागी सरबत असा बदल होतो.. ;) लेख आवडला हे सां न ला. पण हे काय दोनच अनुभव... अजून बरीच मुंबई बाकी आहे ना!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 09/01/2008 - 10:04 नवीन

मस्त!

तात्या, सहीच आहेत किस्से! आवडले. टार्‍या, तुझा अनुभवही भन्नाट होता. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 09/01/2008 - 10:58 नवीन

तात्या जी,

तात्या जी, टार्या जी.... मस्त....!..... असे प्रसंग तर आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाची लज्जत वाढवतात...... (स्पश्टीकरणः जीवनाच्या पुर्वार्धात घडलेले हे प्रसंग उत्तरार्धात आठवून... आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करताना..... अंमळ तरुण झाल्यासारखं वाट्टं.. नै...!!! :) ) बाकी लग्न-गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात.... हेच खरं!!! :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/01/2008 - 11:31 नवीन

ह्म्म..

तात्या, लेख आवडला.चहापोह्यांच्या कार्यक्रमाला 'वांगीभात' वाचून आश्चर्यही वाटले.इथे जर्मनीतही आमच्या एका मित्रासाठी असा एक जर्मन कार्यक्रम केला होता त्याची आठवण झाली. स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/01/2008 - 14:48 नवीन

स्वाती ताई,

मस्त आहे तुझी गोष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
अ
अजिंक्य Mon, 09/01/2008 - 12:28 नवीन

तात्या आणि टारझन.....

दोघांचेही (दोन्ही) अनुभव मस्त.... (तात्या, तुमचं डेअरिंग जबरदस्त आहे. नाहीतर स्वतःबद्दलचे अनुभव 'शेअर' करणं कठीण असतं.) (टारझनचं ठीक आहे - तो 'बघायला' न जाताही गुलाबजाम खाऊन आला - =)) ) -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 09/02/2008 - 16:09 नवीन

गुलाब जाम

गुलाब जाम खाने के लिये हम कुछ भी कर सकते है :) तात्या आणि टारु दोघांचे अनुभव भारीच रे. आम्हाला असला अनुभव नाय मिळाला प्रे वी मुळे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/01/2008 - 12:49 नवीन

तात्या

तात्या, तुझे एकंदरीत व्यक्तिमत्व बघता, तुझे लग्न होणे नाही. वाटल्यास धोंडोपंतांना विचार. उगाच का त्या मुलींना आणि त्यांच्या बापांना त्रास देतोस ? -- सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/01/2008 - 14:41 नवीन

मस्त....

तात्या, अनुभवकथन मस्त आहे. वांगी भाताचे मलाही आश्चर्य वाटले. सहसा अशा कार्यक्रमात 'चहा-पोहे'च असतात. असो. त्यांनी नविन प्रथा सुरू केली असेल. पण ती चांगली आहे. मुलीला चांगले पोहे करता येण्या पेक्षा चांगला 'वांगी भात' येतो हे नवरदेवाच्या मनात ठसविले की ती जेवण उत्तम बनवत असेल असा अंदाज बांधता येतो. 'वांगी भाता'सारखी तुलनात्मक दृष्ट्या कठीण पाककृती येणार्‍या मुलीस पोह्यांसारखी साधी पाककृती येतच असणार. पण चांगले पोहे केले म्हणजे उत्तम स्वयंपाक जमेलच असे सांगता येत नाही. असा विचार त्यांनी केला असावा. नको नको म्हणता दोनपाच नारळाच्या वड्याही झाल्या होत्या! दोनपाच नारळांच्या वड्या की नारळाच्या दोनपाच वड्या? आयला मला फार आवडतात बुवा. टारझन ह्यांचा अनुभवही 'रोमहर्षक' आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा