बाप्पाचा नैवेद्य : कणकेचा शिरा

मितान's picture
मितान in पाककृती
25 Sep 2015 - 9:31 am

कणकेचा शिरा
साहित्य : कणीक १ वाटी
तूप अर्धी वाटी
गूळ पाऊण वाटी
वेलचीपूड, जायफळपूड, सुकामेवा अावडीनुसार.
कृती :
चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचे कढईत गरम करावे. त्यात कणीक गुलाबी लाल होईपर्यंत भाजावी. लाडू करताना बेसन भाजतो तसे तुप्पट दिसले पाहिजे ;)
एकीकडे पाणी उकळावे.
आता आच कमी करून उकळते पाणी हळूहळू कणकेत घालावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कणकेचा छान गोळा व्हायला लागला की त्यात किसलेला गूळ घालावा. लगेचच वेलची जायफळ सुकामेवा घालून नीट मिसळावे. वरून चमचाभर तूप कडेने घालावे. एक वाफ आली की शिरा तयार!
.

हा शिरा आमच्याकडे सर्वांना आवडतो. प्रसादासाठी नेहमी केला जातो. कोणत्या तरी उपासानंतर मावशी असा शिरा न पुरी करायची. आजेसासुबाईंचा तर हा फेवरिट 'नवेद्य'! माझी लेक हा चाकलेटी शिरा रोज खाऊ शकते!
.
.
एकदा एका सिंधी मित्राकडे दिवाळीचा प्रसाद. म्हणून हा शिरा होता. तो गरम असतानाच हातावर घ्यायचा. त्यातून तूप निथळत असतानाच तोंडात टाकायचा म्हणे! काकूंना विचारलं असं का तर उत्तर मिळालं, "बेटा, प्रशादको दात नही लगाते ना! इसलिए!!
नक्की बघा हं करून हा सोपा नॆवेद्य! !

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

25 Sep 2015 - 9:56 am | कविता१९७८

मस्तच लागतो, खाल्लाय मी हा प्रसाद

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 9:57 am | मांत्रिक

भन्नाटच दिसतोय! कणकेचा अजून केला नाही पण रव्याचा कायम करतो. त्यात अगदी मऊ पिकलेली वसईची केळी कुस्करुन घालतो. झक्कास फ्लेवर येतो.

मस्त दिसतोय अगदि.खमंग लागतो हा शिरा.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2015 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

ओह! माझा (अजून एक) आवडता पदार्थ. माझी आजी आणि आई (सासू-सून) हा शिरा बनविण्यात आणि मी खाण्यात एक्स्पर्ट. तुमच्या पाककृतीत 'तुप' ह्या ठिकाणी 'साजूक तुप' (त्यातून घरचे असेल तर उत्तम) असं पाहिजे, तुम्ही साजूक तुपच वापरत असणार (त्याशिवाय भन्नाट चव येत नाही) पण टंकताना 'साजूक' हा पवित्र शब्द राहून गेला असावा.

हो हो 'साजूक' लिहायचं राहिलंच :))

पदम's picture

25 Sep 2015 - 11:41 am | पदम

माझा एक सिन्धी कलिग आणतो. खुप छान लागतो. आता मि ही करेन घरी.

स्वाती दिनेश's picture

25 Sep 2015 - 11:49 am | स्वाती दिनेश

मस्त मस्त!
असा तूपात निथळलेला अमृतसरच्या सुवर्णमंदिरातला द्रोणातला प्रसाद आठवला..
स्वाती

बोका-ए-आझम's picture

26 Sep 2015 - 8:58 am | बोका-ए-आझम

करहा प्रशाद म्हणतात तो! अप्रतिम असतो. हा करुन बघायला पाहिजे. तोंपासु!

पद्मावति's picture

25 Sep 2015 - 1:46 pm | पद्मावति

आहा! मस्तं यम्मि दिसतोय शिरा.

पियुशा's picture

25 Sep 2015 - 2:23 pm | पियुशा

सुरेख ! मी हा प्रकारच पहिल्यादा पाहतेय मी पण करुन बघतेच आता :)

नीलमोहर's picture

25 Sep 2015 - 2:35 pm | नीलमोहर

खूप दिवस झाले ही पाककृती हवी होती.
धन्यवाद :)

मधुरा देशपांडे's picture

25 Sep 2015 - 2:43 pm | मधुरा देशपांडे

अतिशय आवडता प्रकार. पाण्यासोबत थोडे दुध घालुनही छान होतो. आमच्या घरी कणकेचा शिरा हे नवर्‍याचे पेटंट आहे, त्यामुळे मी फक्त खाते, करत नाही. :)

सानिकास्वप्निल's picture

25 Sep 2015 - 2:45 pm | सानिकास्वप्निल

अतिशय आवडता शिरा आहे हा. थंडी पडायला लागली की आमच्याकडे हा तूपाने थबथबलेला कणकेचा शिरा हमखास बनतो. लहानपणी शीख मैत्रिणीसोबत अनेकदा गुरुद्वारेत गेलेय तिथे लंगर असला की हा प्रसादाचा "आटे का हलवा" देत असे, आठवणी जाग्या झाल्या.

छान दिसतोय शिरा, फोटो बघून तोंपासू :)

पैसा's picture

25 Sep 2015 - 3:35 pm | पैसा

मस्त दिसतोय!

अजया's picture

25 Sep 2015 - 4:28 pm | अजया

तोंपासु पाकृ!

श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा आवडता नैवेद्य

रेवती's picture

25 Sep 2015 - 5:33 pm | रेवती

छान दिसतोय. एकदा एका नातेवाईकांकडे खाल्ला होता. त्यावेळी फर आवडला, नंतर एकदा घरी करून बघितला होता. आता पुन्हा करायलाच हवा.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Sep 2015 - 9:40 pm | अत्रुप्त आत्मा

ज्या प्रसादाचा अज्जिब्बात कधी कंटाळा आला नाही..त्यापैकी एक हा. दत्तसंप्रदायातल्या काही विशिष्ट पूजांमधे हाच प्रसाद असतो.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Sep 2015 - 9:44 pm | अविनाशकुलकर्णी

पाणी गरम करत त्यात गुळ विरघवला तर चालते का?

आयड्या चांगली आहे. प्रयोग करून बघेन !

रव्यापेक्शा छान लागतो आणि त्रास हि होत नाहि .मस्त् च

नूतन सावंत's picture

26 Sep 2015 - 9:02 am | नूतन सावंत

अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पाककृती,बऱ्याचदा होतो.पण फोटो नाही काढले कधी.फोटो मस्त.

Maharani's picture

26 Sep 2015 - 12:15 pm | Maharani

झककास....बघतेच करुन..

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:44 pm | दिपक.कुवेत

माझाहि आवडता आहे हा शीरा. अतीशय खमंग लागतो. फोटो फारच कातील आलेत.

सूड's picture

7 Oct 2015 - 2:51 pm | सूड

माझा गणेशा झालाय.