कणकेचा शिरा
साहित्य : कणीक १ वाटी
तूप अर्धी वाटी
गूळ पाऊण वाटी
वेलचीपूड, जायफळपूड, सुकामेवा अावडीनुसार.
कृती :
चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचे कढईत गरम करावे. त्यात कणीक गुलाबी लाल होईपर्यंत भाजावी. लाडू करताना बेसन भाजतो तसे तुप्पट दिसले पाहिजे ;)
एकीकडे पाणी उकळावे.
आता आच कमी करून उकळते पाणी हळूहळू कणकेत घालावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कणकेचा छान गोळा व्हायला लागला की त्यात किसलेला गूळ घालावा. लगेचच वेलची जायफळ सुकामेवा घालून नीट मिसळावे. वरून चमचाभर तूप कडेने घालावे. एक वाफ आली की शिरा तयार!
हा शिरा आमच्याकडे सर्वांना आवडतो. प्रसादासाठी नेहमी केला जातो. कोणत्या तरी उपासानंतर मावशी असा शिरा न पुरी करायची. आजेसासुबाईंचा तर हा फेवरिट 'नवेद्य'! माझी लेक हा चाकलेटी शिरा रोज खाऊ शकते!
एकदा एका सिंधी मित्राकडे दिवाळीचा प्रसाद. म्हणून हा शिरा होता. तो गरम असतानाच हातावर घ्यायचा. त्यातून तूप निथळत असतानाच तोंडात टाकायचा म्हणे! काकूंना विचारलं असं का तर उत्तर मिळालं, "बेटा, प्रशादको दात नही लगाते ना! इसलिए!!
नक्की बघा हं करून हा सोपा नॆवेद्य! !

याद्या
11711
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच लागतो, खाल्लाय मी हा
भन्नाटच दिसतोय! कणकेचा अजून
मस्त दिसतोय अगदि.खमंग लागतो
उद्याच करतो.
हो हो 'साजूक' लिहायचं राहिलंच
In reply to उद्याच करतो. by प्रभाकर पेठकर
मस्तच.
वावा..
अगदी अगदी!
In reply to वावा.. by स्वाती दिनेश
आहा! मस्तं यम्मि दिसतोय शिरा.
सुरेख ! मी हा प्रकारच
छान दिसतोय शिरा...
अतिशय आवडता प्रकार.
अतिशय आवडता शिरा आहे हा. थंडी
वा!
तोंपासु पाकृ!
श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा
छान दिसतोय. एकदा एका
ज्या प्रसादाचा अज्जिब्बात कधी
पाणी गरम करत त्यात गुळ
आयड्या चांगली आहे. प्रयोग
In reply to पाणी गरम करत त्यात गुळ by अविनाशकुलकर्णी
रव्यापेक्शा छान लागतो आणि
अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक
झककास....बघतेच करुन..
सुरेख
माझा गणेशा झालाय.