आरती संदर्भात काही शंका: माहिती हवी आहे
गणेशोत्सवात आपण रोज आरत्या म्हणतो. मला ह्या बाबती मधे काही प्रश्न आहेत, कदाचीत आपणासही हे कधी पडले असतील. कोणाला माहित असल्यास जरूर सांगा.
१. आपल्याकडे गणपती उत्सवात आरती म्हणायची पध्दत आहे.आरती हा शब्द संस्कृत अरात्रिका शब्दावरुन आला आहे ज्याचा अर्थ होतो- दिव्यानी ओवाळणे. आपल्या बहुतेक आरत्या ह्या रामदास स्वामी, नामदेव आदी संतकवींनी १५-१६ शतकाच्या आसपास रचल्या असाव्यात.त्या आधी पुजेच्या वेळी काय म्हणायची पद्धत होती?
२. ह्या सर्व आरत्यांचा स्त्रोत कोणता? कोणत्या पोथीत्,ग्रंथात,साहित्यात ह्या प्रथम सापड्ल्या/लिहिल्या गेल्या की ह्या मौखिकच प्रचलित झाल्या? नित्य पुजनामधे ह्या आरत्या प्रचलित करायचे श्रेय कोणाला द्यावे?
३. आपल्या घरघुती आरतीच्या चालीचे छंद व वृत्त कोणते आहे?
४. घालीन लोटांगण..ह्या रचनेचा समावेश आरती संग्रहात कधी करण्यात आला? ह्याचा स्त्रोत कोणता व रचनाकार कोण ? ह्याचे फक्त पहिले कडवे मराठी असुन बाकिची रचना ही संकृत आहे असं का असाव?
५. मंत्रपुष्पांजली ही खरतर चार वेगवेळ्या ग्रंथांच्या श्लोकांची भेळ आहे..चार श्लोकांच्या ह्या प्रार्थनेत पहिला श्लोक हा ऋग्वेद (मन्ड्ल १) व अथर्व वेदातला (खंड ७) आहे, दुसरा तैतरीय अरण्यकातला (प्रपाठक १) आहे, तिसरा ऐतरेय ब्राह्मणातला (पंचीका ८ खंड १५) आहे तर चौथा परत ऐतरेय ब्राह्मणातला (पंचीका ८ खंड २१). ह्यात यज्ञ,कुबेर,मरुतगण व महाभिषेक विधीनी काय पुण्य मिळेल ह्याची वर्णन आहेत, तर मग ही प्रर्थना आपण फक्त गणपतीच्या आरती नंतर का म्हणतो?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
घालीन लोटांगण
म्हणे नमा ऐवजी म्हणे नामा
मला वाटतं.
सरांचा प्रतिसाद आवडला
असे बरेच प्रश्ण आहेत...
धन्यवाद.
काही माहिती विकि प्रमाणे