Skip to main content

श्री गणेश ले़खमाला

आरती संदर्भात काही शंका: माहिती हवी आहे

लेखक पामर यांनी शुक्रवार, 18/09/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सवात आपण रोज आरत्या म्हणतो. मला ह्या बाबती मधे काही प्रश्न आहेत, कदाचीत आपणासही हे कधी पडले असतील. कोणाला माहित असल्यास जरूर सांगा. १. आपल्याकडे गणपती उत्सवात आरती म्हणायची पध्दत आहे.आरती हा शब्द संस्कृत अरात्रिका शब्दावरुन आला आहे ज्याचा अर्थ होतो- दिव्यानी ओवाळणे. आपल्या बहुतेक आरत्या ह्या रामदास स्वामी, नामदेव आदी संतकवींनी १५-१६ शतकाच्या आसपास रचल्या असाव्यात.त्या आधी पुजेच्या वेळी काय म्हणायची पद्धत होती? २. ह्या सर्व आरत्यांचा स्त्रोत कोणता? कोणत्या पोथीत्,ग्रंथात,साहित्यात ह्या प्रथम सापड्ल्या/लिहिल्या गेल्या की ह्या मौखिकच प्रचलित झाल्या?