✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आरती संदर्भात काही शंका: माहिती हवी आहे

प
पामर यांनी
Fri, 09/18/2015 - 00:23  ·  लेख
लेख
गणेशोत्सवात आपण रोज आरत्या म्हणतो. मला ह्या बाबती मधे काही प्रश्न आहेत, कदाचीत आपणासही हे कधी पडले असतील. कोणाला माहित असल्यास जरूर सांगा. १. आपल्याकडे गणपती उत्सवात आरती म्हणायची पध्दत आहे.आरती हा शब्द संस्कृत अरात्रिका शब्दावरुन आला आहे ज्याचा अर्थ होतो- दिव्यानी ओवाळणे. आपल्या बहुतेक आरत्या ह्या रामदास स्वामी, नामदेव आदी संतकवींनी १५-१६ शतकाच्या आसपास रचल्या असाव्यात.त्या आधी पुजेच्या वेळी काय म्हणायची पद्धत होती? २. ह्या सर्व आरत्यांचा स्त्रोत कोणता? कोणत्या पोथीत्,ग्रंथात,साहित्यात ह्या प्रथम सापड्ल्या/लिहिल्या गेल्या की ह्या मौखिकच प्रचलित झाल्या? नित्य पुजनामधे ह्या आरत्या प्रचलित करायचे श्रेय कोणाला द्यावे? ३. आपल्या घरघुती आरतीच्या चालीचे छंद व वृत्त कोणते आहे? ४. घालीन लोटांगण..ह्या रचनेचा समावेश आरती संग्रहात कधी करण्यात आला? ह्याचा स्त्रोत कोणता व रचनाकार कोण ? ह्याचे फक्त पहिले कडवे मराठी असुन बाकिची रचना ही संकृत आहे असं का असाव? ५. मंत्रपुष्पांजली ही खरतर चार वेगवेळ्या ग्रंथांच्या श्लोकांची भेळ आहे..चार श्लोकांच्या ह्या प्रार्थनेत पहिला श्लोक हा ऋग्वेद (मन्ड्ल १) व अथर्व वेदातला (खंड ७) आहे, दुसरा तैतरीय अरण्यकातला (प्रपाठक १) आहे, तिसरा ऐतरेय ब्राह्मणातला (पंचीका ८ खंड १५) आहे तर चौथा परत ऐतरेय ब्राह्मणातला (पंचीका ८ खंड २१). ह्यात यज्ञ,कुबेर,मरुतगण व महाभिषेक विधीनी काय पुण्य मिळेल ह्याची वर्णन आहेत, तर मग ही प्रर्थना आपण फक्त गणपतीच्या आरती नंतर का म्हणतो?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8100 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

घालीन लोटांगण

पैसा
Fri, 09/18/2015 - 00:37 नवीन
घालीन लोटांगण मधे म्हणे नामा असा उल्लेख आहे. त्या अर्थी नामदेवाची रचना दिसते. मात्र सगळ्या आरत्या नामदेवांच्या नावावर नाहीत. विष्णुदास नामा हा वेगळा होता. त्याच्याही आरत्या खूप लोकप्रिय आहेत. आरत्या प्रचलित होण्यापूर्वी बहुधा मंत्रपुष्पांजली, "आवाहनं न जानामि", "त्वमेव माता च पिता त्वमेव" सारख्या काही प्रार्थना म्हणत असतील.
  • Log in or register to post comments

म्हणे नमा ऐवजी म्हणे नामा

रमेश आठवले
Fri, 09/18/2015 - 02:49 नवीन
पैसाताई यांच्याशी सहमत. पामर यांना पडलेल्या प्रश्नाचे कारण बहुधा हे असावे-बहुतेक मंडळी हा श्लोक म्हणताना नामा असा उच्चार करण्या ऐवजी नमा असा उच्चार करतात.
  • Log in or register to post comments

मला वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/18/2015 - 06:19 नवीन
>>>>> आरती हा शब्द संस्कृत अरात्रिका शब्दावरुन आला आहे ज्याचा अर्थ होतो- दिव्यानी ओवाळणे आर्त (आर्तता) भावनेनी म्हटली जाणारी ती आरती. बाकी आरती चे जनक कोणी तरी आहेच. बाकी, आरतीचे क्रम , प्रार्थना, फळ या विषयावर माझा पास. हा फक्त स्माधानाचा आणि आनंदाचा भाग आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सरांचा प्रतिसाद आवडला

अजया
Fri, 09/18/2015 - 10:21 नवीन
सरांचा प्रतिसाद आवडला.अरात्रिका माहित नव्हता शब्द.
  • Log in or register to post comments

असे बरेच प्रश्ण आहेत...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/18/2015 - 10:52 नवीन
पण तुमच्या या प्रश्नाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी प्यारे गुरुजींनी काही आरत्यांचे सुरेख विवेचन केलेलं होते ते आठवले. सुखकर्ता दुखहर्ता - एक विचार दुर्गे दुर्घट भारी... एक विचार त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 12:03 नवीन
धन्यवाद. बाकी आम्ही गुरूजी नाही. गुरूजी एक पूजा वाले आणि एक काहीही हां श्री आणि एक असेच अर्धे मुर्धे. पुनश्च आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काही माहिती विकि प्रमाणे

पैसा
Fri, 09/18/2015 - 12:18 नवीन
Aarti (Hindi आरती),(Tamil ஆரத்தி), also spelled arathi, aarthi (from the Sanskrit word "आरात्रिक" with the same meaning) is a Hindu religious ritual of worship, a part of puja, in which light from wicks soaked in ghee (purified butter) or camphor is offered to one or more deities. Aartis also refer to the songs sung in praise of the deity, when lamps are being offered. It is also part of Sikh Worship,The Ardās (Punjabi: ਅਰਦਾਸ) - and carried out at Hazur Sahib, Patna Sahib and various Nihang's Gurdwaras. Though, Aarti of Hindus is before Idol, Sikhs do Ardaas. Aarti of Divine Wisdom in form of Guru Granth Sahib. Arati is derived from the Sanskrit word Aratrika, which means something that removes Ratri, darkness (or light waved in darkness before an idol). Another word from which Arati is thought to be derived is the Sanskrit word Aaraartikyam(Sanskrit:आरार्तिक्यं). A Marathi language reference says it is also known as Mahaneeranjana(Sanskrit:महानीराञ्जना) Aarti is said to have descended from the Vedic concept of fire rituals, or homa.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा