नमस्कार
या काही ट्राईड अँड टेस्टेड वेट लॉस टिप्स आहेत ज्या फार प्रभावी आहेत. वेल; माफ करा. इथे 'वेट लॉस' बद्दल काहीही नाही. पण एका 'ग्रेट लॉस' बद्दल आहे जो आपण आज ना उद्या अनुभवणार आहोत. पावसाचा लॉस; पाण्याचा लॉस, पर्यावरणाचा लॉस.
'वेट लॉस' हे शब्द वाचून ज्या तत्परतेने लोकं पुढचा मजकूर वाचतील त्या तत्परतेने इतर कुठलंही शीर्षक वाचून वाचणार नाहीत, म्हणून ही चखलाशी केली. ही बाब आपल्या प्राधान्यक्रमाविषयी बरंच काही सांगते, पण असो; इथे तो मुद्दा नाही.
पाऊस गेल्यावर्षी आणि या वर्षीही वाईट झालाय. पुढेही फार होईल अशी चिन्हं नाहीत. राज्यात, देशात अनेक भागांत दुष्काळ पडलाय. शेतकरी हतबल आहे. धरणं ५०% पेक्षाही कमी भरलेली आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई अटळ आहे.
आपण काय करू शकतो? आपण पाणी सांभाळून वापरू शकतो, वाचवू शकतो. खाली दिलेल्या गोष्टी नवीन नाहीत, आपण या जाणतो. पण आपण त्याप्रमाणे वागत नाही. तेंव्हा, आपण जर तसं वागलो, तर आपण पाणीबचतीत आपला खारीचा वाटा उचलू शकू, आणि पाणीटंचाई जरी टाळू शकलो नाही तरी त्यासाठी सज्ज होऊ शकू.
१) शॉवर ला आवर घालणे. अंघोळीसाठी बादली वापरणे.
२) टब बाथ नकोच
३) दाढी करताना एका मगात पाणी घेऊन तेवढंच वापरणे; नळ चालू न ठेवणे.
४) गाडी/स्कूटर धुवायला जेट स्प्रे, पाईप न वापरता बादलीभर पाणी वापरणे. किंबहुना आठवड्यातून एकदाच जरी गाडी/स्कूटर धुतली तरी हरकत नाही. ती इतकी वाईट नक्कीच दिसणार नाही जितका तुमचा चेहरा दिसेल, जर तो धुवायला एक दिवस पाणी नसेल.
५) झाडांना दिवसातून एकदा दिलेलं पाणी पुरतं. ते द्यायलाही स्प्रे/पाईप टाळणे.
६) हवं तितकं पाणी घेतल्यावर नळ तत्परतेने बंद करणे; घरातल्या कामवालीलाही तसं बजावणे.
७) थोडा विचार केला तर असे अजून अनेक मार्ग तुम्हाला सुचतील.
८) हा मेसेज जमल्यास, वाटल्यास शेअर करणे.
९) झाडे लावणे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना किमान 'पाऊस' काय असतो हे तरी बघायला मिळावं.
१०) प्रार्थना करणे, की पाऊस पडू दे. भरपूर पडू दे.
'होऊ दे खर्च' म्हणत टँकर बिंकरचा माज करणा-यांना ऑल द बेस्ट. त्यांनी वरील सल्ले मनावर घेऊ नयेत.
वी नीड टू थिंक अबाउट अवर क्रॉप
वी नीड टू थिंक अबाउट ईच ड्रॉप
वी मे नॉट नो व्हेअर टू स्टार्ट
बट वी नीड टू नो व्हेअर टू स्टॉप
- अपूर्व ओक
[हा मेसेज इंग्रजीत माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला आहे. त्याचा दुवा हा.]
वर्गीकरण
वाचने
6936
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहा!
वा आवडले. खरं तर वेट लाॅस
+१
In reply to वा आवडले. खरं तर वेट लाॅस by मांत्रिक
ही क्रूर थट्टा आहे हो.......
पाणी
खूप छान लेख. मस्तं टिप्स.
मी राहतो त्या सोसायटीत दोन
जल साक्षर होण्याची गरज
यांना कोणीतरी जल साक्षर
In reply to जल साक्षर होण्याची गरज by pradnya deshpande
सहमत
In reply to जल साक्षर होण्याची गरज by pradnya deshpande
बाकी सर्व गोष्टी पटल्या. पण
आमच्या गावी २००३ मधे इतकी
रोज पाणी