✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(तुझे पाशवी बोलणे ते अवेळी)

च — चतुरंग, Sun, 09/13/2015 - 05:19
विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;) तुझे पाशवी बोलणे ते अवेळी तुझे चक्रमी हासणे ते अवेळी जसे नासिकेचे अकाली बरसणे तुझे काहिही बरळणे ते अवेळी लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने तुझे वीग शाकारणे ते अवेळी नको आप्त, वीकांत हा फक्त माझा तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी? नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो तुझे रातचे घोरणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे हालती पाळणे ते अवेळी!! 'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा वृत्त : भुजंगप्रपात -चतुरंग

प्रतिक्रिया द्या
7011 वाचन

💬 प्रतिसाद (29)

हा हा हा

एक एकटा एकटाच
Sun, 09/13/2015 - 09:01 नवीन
हा हा हा मस्त जबरदस्त आवडेश.......
  • Log in or register to post comments

लैभारी

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 09/13/2015 - 09:14 नवीन
मस्त जबरदस्त पण मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे हालती पाळणे ते अवेळी!! हे काय आहे? हा प्रश्न आहे? तक्रार आहे? आव्हान आहे? का माघार आहे? पश्चातापाचे बोल आहेत? का अभिमानाने सांगणे आहे? का आगतिकता आहे? की हे सगळे एकत्र आहे? विशेष म्हणजे प्रत्येक अर्थ कवितेत चपखल बसत आहे हे कवीचे मोठे यश आहे. आता लागे हाथो "लाघवी" पण होउन जाउदे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+11111 होऊन जाऊंदे

दमामि
Sun, 09/13/2015 - 10:22 नवीन
+11111 होऊन जाऊंदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अगागागागागागा! :-D

एस
Sun, 09/13/2015 - 09:42 नवीन
अगागागागागागा! :-D
  • Log in or register to post comments

तुझे पाशवी बोलणे ते अवेळी

मदनबाण
Sun, 09/13/2015 - 09:49 नवीन
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी तुझे चक्रमी हासणे ते अवेळी जबरा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sun, 09/13/2015 - 09:55 नवीन
=)) इस्कूभी जवाब आएगा!!
  • Log in or register to post comments

धन्य जाहलो. ___/\___

प्यारे१
Sun, 09/13/2015 - 10:10 नवीन
धन्य जाहलो. ___/\___
  • Log in or register to post comments

वाह!!!!

दमामि
Sun, 09/13/2015 - 10:21 नवीन
वाह!!!!
  • Log in or register to post comments

लै भारी

चाणक्य
Sun, 09/13/2015 - 10:30 नवीन
वृत्त पण भारी. अगागा अगागा....
  • Log in or register to post comments

लै भारी !...

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/13/2015 - 10:37 नवीन
लै भारी !... हहाहा हहाहा हहाहा हहाहा हहाहा हहाहा हहाहा हहाहा
  • Log in or register to post comments

=))

जेपी
Sun, 09/13/2015 - 10:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments

अगागागा!!=))

अजया
Sun, 09/13/2015 - 10:55 नवीन
अगागागा!!=))
  • Log in or register to post comments

झकास. रंगाकाका फार वर्षानी

विजुभाऊ
Sun, 09/13/2015 - 11:22 नवीन
झकास. रंगाकाका फार वर्षानी बरसले.
  • Log in or register to post comments

ह्याचं विडंबन झालच पायजे!

रातराणी
Sun, 09/13/2015 - 12:30 नवीन
ह्याचं विडंबन झालच पायजे! शेवटच्या दोन ओळी निळून देते :) लावली रम: अरारा अरारा अरारा अरारा वृत्त: तिकडेचबसा :)
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Tue, 09/15/2015 - 09:15 नवीन
कवीला सुप्तावथेतून जागं करण्याची पद्धात आवडली. सवालाला "जवाब" वाचण्यास उत्सुक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

जबराट... लै भारी जमलय राव !

विशाल कुलकर्णी
Tue, 09/15/2015 - 12:13 नवीन
जबराट... लै भारी जमलय राव ! असावे कसे ते विडंबन कवीते चतूरंग सांगे नसे हे अवेळी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

=)). या गं बाब्बौ! =))

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/13/2015 - 15:43 नवीन
=)). या गं बाब्बौ! =))
  • Log in or register to post comments

=))

माहितगार
Sun, 09/13/2015 - 15:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!

चतुरंग
Mon, 09/14/2015 - 23:01 नवीन
-रंगा
  • Log in or register to post comments

वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं

सूड
Mon, 09/14/2015 - 23:42 नवीन
वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं प्रत्युत्तर येईल बहुधा!! ;)
  • Log in or register to post comments

होय तर! तेवढाच उद्योग आहे काय

रेवती
Tue, 09/15/2015 - 17:47 नवीन
होय तर! तेवढाच उद्योग आहे काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असं कसं? असं कसं?

एस
Tue, 09/15/2015 - 18:23 नवीन
असं कसं? असं कसं? प्रत्त्युत्तर आलेच पाहिजे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शोभता हो..... ;)

प्यारे१
Tue, 09/15/2015 - 18:42 नवीन
शोभता हो..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कहर आहे

कहर
Tue, 09/15/2015 - 09:23 नवीन
कहर आहे
  • Log in or register to post comments

तुझे पाशवी बोलणे ते अवेळी

पद्मावति
Tue, 09/15/2015 - 14:07 नवीन
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी तुझे चक्रमी हासणे ते अवेळी
..आई ग......फिस्स्कन हसू आलं...
  • Log in or register to post comments

खरतनाकच येकच नंबर !!

प्रसाद गोडबोले
Tue, 09/15/2015 - 19:04 नवीन
खरतनाकच येकच नंबर !!
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे हालती पाळणे ते अवेळी!!
=))
'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा वृत्त : भुजंगप्रपात
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
  • Log in or register to post comments

झकास

टिवटिव
Tue, 09/15/2015 - 20:05 नवीन
भन्नाट विडंबन !
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

दीपा माने
Tue, 09/15/2015 - 21:07 नवीन
जसा भुजंग प्रपात कोसळे भुवरी बुध्दीभेद करी रंग रंगात भारी! अजब मती कल्पना स्रवती कवनातूनी मतीच गुंग झाली हो, ती पळभरी! आम्ही कोण कशास काय पुसता यमकांचे खिळे जोडणारे खिळारी!
  • Log in or register to post comments

दंडवत स्वीकारा...! __/\__

राघव
गुरुवार, 01/21/2016 - 20:28 नवीन
दंडवत स्वीकारा...! __/\__ बाकी तुमच्या विडंबनामुळे नजरेतून सुटलेली चांगली गझल वाचायला मिळाली.. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा