विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;)
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
तुझे चक्रमी हासणे ते अवेळी
जसे नासिकेचे अकाली बरसणे
तुझे काहिही बरळणे ते अवेळी
लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने
तुझे वीग शाकारणे ते अवेळी
नको आप्त, वीकांत हा फक्त माझा
तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी?
नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो
तुझे रातचे घोरणे ते अवेळी
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे हालती पाळणे ते अवेळी!!
'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा
वृत्त : भुजंगप्रपात
-चतुरंग
काव्यरस
वाचने
7035
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
लैभारी
+11111 होऊन जाऊंदे
In reply to लैभारी by ज्ञानोबाचे पैजार
अगागागागागागा! :-D
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens=))
धन्य जाहलो. ___/\___
वाह!!!!
लै भारी
लै भारी !...
=))
अगागागा!!=))
झकास. रंगाकाका फार वर्षानी
ह्याचं विडंबन झालच पायजे!
+१
In reply to ह्याचं विडंबन झालच पायजे! by रातराणी
जबराट... लै भारी जमलय राव !
In reply to +१ by नाखु
=)). या गं बाब्बौ! =))
=))
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं
होय तर! तेवढाच उद्योग आहे काय
In reply to वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं by सूड
असं कसं? असं कसं?
In reply to होय तर! तेवढाच उद्योग आहे काय by रेवती
शोभता हो..... ;)
In reply to असं कसं? असं कसं? by एस
कहर आहे
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
खरतनाकच येकच नंबर !!
झकास
अप्रतिम!
दंडवत स्वीकारा...! __/\__