आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध
तुम्ही यात विकिपीडियाला कशी मदत करू शकता ?
१) एखाद्या आडनावाला लेखक असेल तर त्या आडनावाचा मराठी विकिपीडियावर लेख चालू करून, संबधीत आडनाव लेखात लेखकाचे नाव नोंदवणे. अशा आडनाव विषयक लेखांचे मराठी विकिपीडियावर [[वर्ग:मराठी आडनावे]] या वर्गाने वर्गीकरण केले जाते. आणि वर्ग:मराठी आडनावे या वर्ग पानावरच सध्या आपल्याला हव्या असलेल्या आडनावचा लेख आधी पासून आहे की नाही हे ही पहाता येते. सहज गंमत म्हणून तुमच्या आडनावाचा लेख आधी पासून असेल तर त्यातील सध्याची उल्लेखनीय व्यक्तींची नावे तपासता येऊ शकतील. शिवाय ज्यांना आपल्या आडनावा बद्दल मराठी विकिपीडियावर लेख असावा असे वाटते त्यांनी आडनावा बद्दल लेख चालू करता येऊ शकेल. अशा आडनाव विषयक लेखात संबंधीत आडनाव कसे पडले जसे की व्यवसाय/गाव इत्यादी, काही इतिहास उपलब्ध असल्यास त्याबद्दल संक्षीप्त माहिती देता येऊ शकते.
उदाहरण १
अत्रे लेखात
* प्रल्हाद केशव अत्रे - मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी, चित्रपटदिग्दर्शक. अशी नोंद असते
* प्रभा अत्रे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका.
यात प्रभा अत्रेंचे पूर्ण नाव आलेले नाही याचा अर्थ त्यांच्या उर्वरीत व्यक्तीगत माहितीतही कमतरता आणि उणीवा शिल्लक असण्याची शक्यता अधीक.
उदाहरण २
इनामदार
प्रकाश इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. हे नाव अधीक परिचीत आहे.
प्रकाश इनामदार" "द येस फॅक्टर" पुस्तकाचे अनुवादक - हि माहिती अपूरी आहे. अशा अपुर्या माहितीमुळे सर्वसाधारणपणे गल्लत होऊन अधिक परिचीत असलेले अभिनेते प्रकाश इनामदार यांनाच पुस्तकाचे लेखक समजले जाण्याची गल्लत सहजपणे होऊ शकते. मराठी विकिपीडियावर अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या कन्येने स्वतः कल्पना दिल्यामुळे दोन्ही प्रकाश इनामदार वेगळे आहेत हे कळाले. प्रकाश विठ्ठल इनामदारांची स्वतःची मुलगी त्यांचे छायाचित्र विकिपीडियावर चढवते तेव्हा कॉपीराइट मुक्तते बाबत अधीक नि:शंक राहता येते.
"द येस फॅक्टर" पुस्तकाचे अनुवादक प्रकाश इनामदार यांच्या बद्दल आंतरजालावर काहीच माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून इनामदार आडनावाचा लेख असेल तर कधीना कधी कुणी लेखक इनामदारांच्या एखाद्या परिचीताचे लक्ष जाऊन अधीक माहिती मिळण्याचा संभव वाढतो
यासाठी पूर्ण नाव, जन्म (एखाद्या लेखकाचा मृत्यू झाला असल्यास), निकटचे आप्त जसे कि आई, वडील, मुले माहिती मिळाल्यास लेखातील माहितीत जोडणे. ज्यामुळे प्रताधीकार विषयक साहाय्य मिळवणे दोघांनाही विकिपीडियास आणि लेखकाच्या वंशजांना सोपे होते.
अशी माहिती का हवी असते ?
बरेच लेखक, साहित्यिक त्यांचे लेखन केवळ नावांची अद्याक्षरे+आडनाव अथवा केवळ पहिले नाव आणि आडनाव, एवढे लिहूनच करतात. विकिपीडियावर सदर लेखकांची माहिती पूर्ण करण्यासाठी, एकसारख्या नावाच्या एका लेखकाच्या माहितीची दुसर्या लेखकाच्या माहितीत सरमिसळ टाळण्यासाठी, ज्या लेखकांच्या नावावर कॉपीराईट चालू आहे त्यांचा कॉपीराइटची काळजी घेणे आणि ज्यांचा कॉपीराइट संपला आहे त्यांचे लेखन विकिप्रकल्पात आणण्यासाठी लेखकांची वरील प्रकारची माहिती पूर्ण करण्यात साहाय्यची गरज असते.
सध्या काही लेखकांबद्दल अथवा आडनावां माहिती हवी आहे का ?
होय या यादीत अधिक माहिती हव्या असलेल्या लेखकांची नावे जोडत राहीन. हे लेखक आताच्या काळात कुणाला माहित असतीलच असे नाही पण प्रयत्न करून माहिती मिळवणे हे एक काम आहे.
* लेखक: तळवलकर गोपीनाथ, पुस्तकः अनुराधा, प्रकाशन वर्ष: १९४६ प्रकाशक: विद्वांस गो
: हवी असलेली माहिती पुढील पैकी कोणतीही+अधिक : जन्म दिनांक/वर्ष, (मृत्यू झाला असल्यास दिनांक/वर्ष), जन्म स्थळ रहिवास, व्यक्तीगत जीवन-आप्त, शिक्षण, कारकीर्द, साहित्यिक कारकीर्द आणि इतर लेखन, टिका झाली असल्यास त्याबद्दल माहिती.
तसेच खालील आडनावांच्या व्यक्ती बद्दल माहिती हवी आहे
* टिळक
* केळकर
* बाबर सरोजिनी
* कवलगीकर रामचंद्र
*
या धागालेखातील प्रतिसादांचा विकिप्रकल्पातून उपयोग होऊ शकणार असल्यामूळे आपले या धागा लेखास आलेले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिसादांसाठी आणि अनुषंगीका व्यतरीक्त अवांतरचर्चा टाळण्यासाथी आभार
वर्गीकरण
लेखकसूचि
In reply to लेखकसूचि by राही
लेखक/लेखीकांची पूर्ण नावे
टायपो?
In reply to टायपो? by सुनील
टायपो ! तुमचे बरोबर आहे. मी
कमलिनी (कृष्णा) देसाई / कमलिनी प्रभाकर दामले
टिळक आडनावाच्या खालील व्यक्तींची माहिती हवी - १
टिळक आडनावाच्या खालील व्यक्तींची माहिती हवी - २
केळकर आडनावाच्या खालील विवीध व्यक्तींची माहिती हवी
In reply to केळकर आडनावाच्या खालील विवीध व्यक्तींची माहिती हवी by माहितगार
उत्तरा केळकरांची सुद्धा पूर्ण
In reply to केळकर आडनावाच्या खालील विवीध व्यक्तींची माहिती हवी by माहितगार
अर्थतज्ज्ञ विजय केळकरांचे
In reply to अर्थतज्ज्ञ विजय केळकरांचे by आदूबाळ
हो रँडम माहिती सुद्धा चालेल
In reply to केळकर आडनावाच्या खालील विवीध व्यक्तींची माहिती हवी by माहितगार
गिरिजाबाई केळकर
आजगावकर
In reply to आजगावकर by माहितगार
आजगावकर
गोपीनाथ तळवलकर
In reply to गोपीनाथ तळवलकर by वाचक्नवी
पूर्ण नाव गोपीनाथ गणेश