पण आई म्हणते की..............
ते तुझे नशीले डोळे
त्या तुझ्या नखरेल अदा
वर हसताना गालावर पडणारी
खळी " हाईट " आहे
असं वाटतं की................
चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून
पण आई म्हणते की..........
चोरी करणे " वाईट " आहे
तुझ्या ओढीने बरसणारा तो........
अन त्याच्यासवे धुंद भिजणारी तु.......
तुझी ओलती शहारणारी काया पाहुन
आता त्या पावसाचीही हालत थोडीशी " टाईट " आहे
असं वाटतं की................
चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून
पण आई म्हणते की..........
चोरी करणे " वाईट " आहे
तुझ्यासाठी रात्रभर जागणारा तो.....
अन चांदण्यांच्या दुलईत शांत निजणारी तु.....
झोपेत तुझ्या ओठांवर खुलणारी स्माईल पाहून
आता तो चंद्रही फुल्ल टू " डिलाईट " आहे
असं वाटतं की................
चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून
पण आई म्हणते की..........
चोरी करणे " वाईट " आहे
तुला नजरेत साठवून क्षितिजावर मालवणारा तो....
अन उगवणाऱ्या चांदण्यांत उद्याची स्वप्ने रंगवणारी तु..........
अलगद विरणाऱ्या सावलीवर माझ्या
आता पसरला तुझ्या स्वप्नांचा झगमगता " लाईट " आहे
असं वाटतं की................
आजही पहावीत तुझीच स्वप्ने
पण आई म्हणते की..........
लहान डोळी मोठी स्वप्ने पहाणे " वाईट " आहे
सुंदर!!! अगदी फुलासारखी
वा वा!
अतिशय सुंदर बांधकाम बोकोबा!
क्या बात है!
तुझ्या विलक्षण बुद्धिशी आता
हलकीफुलकी कविता आवडली.
तुझ्या मनाची खोली अन
मस्तच अभ्याराजे!!!
अभ्या!! गिलावा चांगलाच बसलाय!
वाह!!!
जबरदस्त
मस्तं कविता. खूप आवडली.
मस्त
देईन बरं मी प्रतिसाद तुला....
हा हा हा.........
हाहाहा!
हाईट आहे..
मस्त आहे कविता :)
धन्यवाद
कविता आणि प्रतिसाद एकदम
:)
हो ना
छान