Skip to main content

पण आई म्हणते की..............

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 30/08/2015 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
ते तुझे नशीले डोळे त्या तुझ्या नखरेल अदा वर हसताना गालावर पडणारी खळी " हाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुझ्या ओढीने बरसणारा तो........ अन त्याच्यासवे धुंद भिजणारी तु....... तुझी ओलती शहारणारी काया पाहुन आता त्या पावसाचीही हालत थोडीशी " टाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुझ्यासाठी रात्रभर जागणारा तो..... अन चांदण्यांच्या दुलईत शांत निजणारी तु..... झोपेत तुझ्या ओठांवर खुलणारी स्माईल पाहून आता तो चंद्रही फुल्ल टू " डिलाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुला नजरेत साठवून क्षितिजावर मालवणारा तो.... अन उगवणाऱ्या चांदण्यांत उद्याची स्वप्ने रंगवणारी तु.......... अलगद विरणाऱ्या सावलीवर माझ्या आता पसरला तुझ्या स्वप्नांचा झगमगता " लाईट " आहे असं वाटतं की................ आजही पहावीत तुझीच स्वप्ने पण आई म्हणते की.......... लहान डोळी मोठी स्वप्ने पहाणे " वाईट " आहे
लेखनविषय:

वाचने 4121
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

माझ्या डोळ्यांसमोर येतेस तू आपल्या रिलेशनशिपचे फ्यूचर ब्राईट आहे तुला तुझ्या बिल्डिंगच्या गच्चीवर बघून काटला गेला माझ्या हृदयाचा काईट आहे गेल्या त्या सगळ्या हेवी डिप्रेस्ड भावना विरून डोके माझे आता एकदम लाईट आहे माझ्या मनावर घातलास तू डाका तुला नाही वाटतं सांगितलं तुझ्या आईने की चोरी करणं वाईट आहे? (तुमच्या कवितेच्या ताजमहालाला आमच्या पण चार विटा!)

तुझ्या विलक्षण बुद्धिशी आता आयुष्यभर 'फाइट' आहे. तुझ्या बुद्धिला मी विलक्षण म्हणणे हिसुद्धा एक 'हाइट' आहे. तुझ्यासोबतचे आयुष्य ही काळीभोर 'नाइट' आहे. तु म्हणजे काय बँकॉकला जाणारी 'फ्लाइट' आहे? जरा पलिकडं सरकुन झोप, ही माझी 'साइट' आहे. (आमचंबी थोड चिपटाबर शिमेंट)

तुझ्या मनाची खोली अन विचारांची ऊंची.... लाम्बवर धावणारी तुझी नजर.... तू म्हणजे अगदी एनए न केलेली साइट आहे.... तुझी आई म्हणते ते एकदम राइट आहे. उताऱ्या शिवाय साठेखत करणे फार वाइट आहे. (माझापण गिलावा. गिलाव्यासाठी वापरा फ़क्त बिरला वाइट)

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादासाठी आभार. बोका-ए-आजम, जव्हेरगंज आणि अभ्या साहेब माझ्या मुळ बांधकामावर मोलाची भर टाकुन कवितेचा F.S.I वाढवल्याबद्दल मनपुर्वक आभार. मस्त होत्या तिन्ही extension.

मस्त आवडली कवित

हाहाहा! सध्या इतुकेच. नंतर सवडीने रंगरंगोटी करणेत येईल.

फारच आज्ञाधारक हो तुम्ही ..

In reply to by मनीषा

हो ना अगदी "बालवाडी"पासून......