शिवजयंती हायजँक ????
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्ही बरोबर आहात.
बरं बरं
पिंक नको पण
त्या तुम्हाला काका म्हणत आहेत
अस्वथामा म्हणजे महाभारतातील
मी हे तुम्ही माझ्या धाग्यात
हा हा हा..;)
मी हे तुम्ही माझ्या धाग्यात
अस्वस्थामा साष्टांग नमस्कार.
अरे वा ! म्हणजे Undo करणे शक्य आहे हे
मी पण तुम्हाला अश्वत्थामाच
ओ
पैल्या धा
गोनिदा म्हणजे "दांडेकर" ना?
शिवचरित्रमाला मध्ये
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकातून
ज्योतिराव फुल्यांना महात्मा
कृपया
शंभूमहादेव हे ठिकाण कोठे आहे ?
बहुतेक
ओह ओके तुम्ही म्हणता ती
मला वाटतं तेच असावं. आमच्या
मराठी विकिपीडियावरील सध्याची
टिळक किंवा फुले
सहमत आहे
सहमत
हे खरंच पटलं
लैच अपेक्षा तुमच्या.
हेच हेच अगदी हेच्च …
छान प्रतीसाद,महाराष्ट्रातल्या
अहो फूल्ल थ्रो टल्ल …
वाहवा
पंत
राजकारणी जिथं तिथं राजकारण
नंतर टिळक आले आणि त्यांनी
शिवसमाधी टिळकांनी पुन्हा एकदा
पुरावे फेका
मित्रांनो भांडू नका.
>>> महात्मा फुले यांनी
श्रीगुरुजी उपरोधानी लिहिताय
माहितगार म्हणजे माहितीने
बरोब्बर आहे
बर्याचदा गार पडतो हे खरे !
एकदुम बरोबर, पण त्याअगोदर.......
काहीही नानासाहेब/माईसाहेब / हितेश / दादा दरेकर / फुजि
ते
अरेरे!
अति अवांतर
उच्चार
एक संदर्भ ग्रंथ