राधाबाई
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही !
नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई !
अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा !
पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा !
गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका !
वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका !
आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास !
अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस !
मरणासन्न होऊनी पडलीस, प्रसंग बाका बाई !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
ऐकून काक वचन राधिका हासलीसे मंद !
पिया मीलन ची आस ही इतूकि ह्या डोळ्यांचा छंद !
आर्जव इतुके नेत्र सोडूनी बाकि सारे खाई !
राधाबाईचं आता खरच काही खरं नाही !!!
:-प्रशू
चांगली आहे कविता
काही कन्सेप्ट समजल्या नाहीत.
कविता खरेच छान आहे. म्हणून
अरेच्चा! साठ नव्हे! सोळा
काव्य खरोखर छान आहे.