छंद, मात्रा, गण, वृत्त इत्यादीविषयी माहिती कोठे मिळेल

कहर's picture
कहर in काथ्याकूट
8 Jul 2015 - 2:22 pm
गाभा: 

हल्ली अनेक लोक कविता किंवा तत्सम काही तरी लिहित असतात (अस्मादिक तयातिल एक ) (काही जिलब्या पण पाडतात ) पण कधी कधी "कविता या छंदात आहे", "इथे मात्र चुकली" वगैरे (जाणकारांची ) वाक्ये कानावर पडतात. एक माहिती आणि कलाकृतीत सुधारणा आणण्यासाठी याबाबतीत अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पण आंतर जालावर विशेष काही हाती लागले नाही (कदाचित कोणता कळशब्द शोधता न आल्याने)

नुकतीच मिपा च्या एका कवितेवर " मात्रा मोजल्या, बरोबर आहेत असा प्रतिसाद पाहिला" आणि पुन्हा एकदा याबाबतची उत्सुकता जागी झाली

प्रिय मिपा जाणकार मंडळी
काव्यातील छंद, मात्रा, गण, वृत्त इत्यादीविषयी सोदाहरण माहिती देऊ शकाल का ? कोठे मिळेल ? काही आंतर जालिय दुवा किंवा पुस्तक वगैरे ची माहिती मिळेल का ?

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

8 Jul 2015 - 2:30 pm | dadadarekar
कंजूस's picture

8 Jul 2015 - 2:47 pm | कंजूस

तुमचा शोध असा केला-
"
मराठी विकि : काव्यातील छंद, मात्रा, गण, वृत्त"
बरेच लिखाण दिसतंय.

कंजूस's picture

8 Jul 2015 - 2:53 pm | कंजूस

काव्य शोध इथे आहे .

इयत्ता सातवी ते दहावीची बालभारतीची पुस्तके!!

जेव्हा त्या वयाचा होतो तेव्हा तिकडे लक्ष दिले नाही. नंतर ती पुस्तके मिळवायचा प्रयत्न केला पण त्यात १२-१५ वर्षाच्या मुलांच्या मानाने माहिती होती. समाधान झाले नाही.

चित्रगुप्त's picture

8 Jul 2015 - 5:24 pm | चित्रगुप्त

'छंदोरचना' हा कवि माधव ज्युलियन यांनी रचलेला ग्रंथ हा या विषयावरील सर्वोत्कृष्ट आहे.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4...

मशारनिल्हे ग्रंथ जालावर उपलब्ध असून त्याचे प्ड्फ देखील अवतरित करता येते. दुवा मिळाल्यास देईनच.

अख्ख छंदोरचना मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात https://mr.wikisource.org/wiki/अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu वाचण्यासाठी उपलब्ध आहेच आणि त्याला युनिकोडात जमेल तेवढे टंकण्याची विशेष व्यवस्था पण उपलब्ध आहे.

कहर's picture

8 Jul 2015 - 5:35 pm | कहर

धन्यवाद

मित्र हो,
वरील विषय वाचून जुन्या घाग्यातील एक प्रतिसाद सादर करावाया वाटला. संदर्भ दूरस्थ आणि जुना असला तरी ...
....
नाडी ग्रंथ म्हटले की काहींची नाके मुरडायला लागतात. पण...
कुटलिपी तज्ञ श्री. हैयोंच्या कूटलिपीच्या लेखानंतर मिपावर श्री. घाटपांडेंनी आमच्या मते नाडी ग्रंथ हे लोकसाहित्य आहे असे मत व्यक्त केलेले आहे.
नाडीपट्टींमधले साहित्य हे "साहित्य" ह्या अर्थाने काव्यरुप साहित्य आहे हे माझेही मत आहे. त्यामुळे मी श्री. हैयोंना असे सुचवीन की नाडीग्रंथातील काव्याच्या अभ्यास करून नाडी ग्रंथ साहित्यातील विविध वैशिष्ठ्ये व बारकावे मिपाच्या चतुर व गुणग्राही वाचकांना सादर करावेत.
अनेकांना माहित असेल की नाडी ग्रंथातील प्राचीन तमिळ काव्य आहे. नाडी वाचक ते काव्य गाऊन सांगतात. गायनात जसे बारकावे असतात तसेच अनेक बारकावे या काव्यात असून एका बाजूला स्वर तर दुसऱ्या बाजूला शब्द माधुर्य, लय, प्रासादिकता साधून व्यक्तीला अनुलक्षून त्याचे अचुक वर्णन करणारी शब्दरचना, एका शब्दातून अनेक अर्थांची रेलचेल व अतिकमी अक्षरात सुचक वा गहन अर्थ ठासून भरून ठेवलेला आहे.
सध्याच्या काळात प्रचलित संकल्पनांना अचुक शब्दांनी काव्याच्या मालेत गुंफून, अलंकार, उपमा, रुपकामधून जातकापर्यंत पोचवताना त्यांनी दाखवलेली कमाल यथावकाश श्री हैयो उकलून दाखवतील तर काय बहार येईल? .

या माझ्या विनंतीला मान देऊन हैयोंनी नाडी ग्रंथातील सिदुपा यमक प्रकाराचा नमुना एका वेगळ्या लेखातून सादर केला होता. नव्या सदस्यांच्या माहितीसाठी तो नंतर सादर करीन