✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छंद, मात्रा, गण, वृत्त इत्यादीविषयी माहिती कोठे मिळेल

क
कहर यांनी
Wed, 07/08/2015 - 14:22  ·  लेख
लेख
हल्ली अनेक लोक कविता किंवा तत्सम काही तरी लिहित असतात (अस्मादिक तयातिल एक ) (काही जिलब्या पण पाडतात ) पण कधी कधी "कविता या छंदात आहे", "इथे मात्र चुकली" वगैरे (जाणकारांची ) वाक्ये कानावर पडतात. एक माहिती आणि कलाकृतीत सुधारणा आणण्यासाठी याबाबतीत अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पण आंतर जालावर विशेष काही हाती लागले नाही (कदाचित कोणता कळशब्द शोधता न आल्याने) नुकतीच मिपा च्या एका कवितेवर " मात्रा मोजल्या, बरोबर आहेत असा प्रतिसाद पाहिला" आणि पुन्हा एकदा याबाबतची उत्सुकता जागी झाली प्रिय मिपा जाणकार मंडळी काव्यातील छंद, मात्रा, गण, वृत्त इत्यादीविषयी सोदाहरण माहिती देऊ शकाल का ? कोठे मिळेल ? काही आंतर जालिय दुवा किंवा पुस्तक वगैरे ची माहिती मिळेल का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7770 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

हे वाचा.

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 14:30 नवीन
http://www.maayboli.com/node/21889
  • Log in or register to post comments

तुमचा शोध असा केला-

कंजूस
Wed, 07/08/2015 - 14:47 नवीन
तुमचा शोध असा केला- " मराठी विकि : काव्यातील छंद, मात्रा, गण, वृत्त" बरेच लिखाण दिसतंय.
  • Log in or register to post comments

काव्य शोध इथे आहे .

कंजूस
Wed, 07/08/2015 - 14:53 नवीन
काव्य शोध इथे आहे .
  • Log in or register to post comments

इयत्ता सातवी ते दहावीची

सूड
Wed, 07/08/2015 - 15:20 नवीन
इयत्ता सातवी ते दहावीची बालभारतीची पुस्तके!!
  • Log in or register to post comments

जेव्हा त्या वयाचा होतो तेव्हा

कहर
Wed, 07/08/2015 - 17:32 नवीन
जेव्हा त्या वयाचा होतो तेव्हा तिकडे लक्ष दिले नाही. नंतर ती पुस्तके मिळवायचा प्रयत्न केला पण त्यात १२-१५ वर्षाच्या मुलांच्या मानाने माहिती होती. समाधान झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

http://nvgole.blogspot.in/2014/03/blog-post.html#links

नरेंद्र गोळे
Wed, 07/08/2015 - 16:40 नवीन
http://nvgole.blogspot.in/2014/03/blog-post.html#links
  • Log in or register to post comments

'छंदोरचना'

चित्रगुप्त
Wed, 07/08/2015 - 17:24 नवीन
'छंदोरचना' हा कवि माधव ज्युलियन यांनी रचलेला ग्रंथ हा या विषयावरील सर्वोत्कृष्ट आहे. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE मशारनिल्हे ग्रंथ जालावर उपलब्ध असून त्याचे प्ड्फ देखील अवतरित करता येते. दुवा मिळाल्यास देईनच.
  • Log in or register to post comments

अख्ख छंदोरचना मराठी विकिस्रोत

माहितगार
Mon, 07/27/2015 - 23:49 नवीन
अख्ख छंदोरचना मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात https://mr.wikisource.org/wiki/अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu वाचण्यासाठी उपलब्ध आहेच आणि त्याला युनिकोडात जमेल तेवढे टंकण्याची विशेष व्यवस्था पण उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धन्यवाद

कहर
Wed, 07/08/2015 - 17:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

नाडी ग्रंथाच्या साहित्यमूल्याबाबत चर्चा

शशिकांत ओक
Mon, 07/27/2015 - 23:38 नवीन
मित्र हो, वरील विषय वाचून जुन्या घाग्यातील एक प्रतिसाद सादर करावाया वाटला. संदर्भ दूरस्थ आणि जुना असला तरी ... .... नाडी ग्रंथ म्हटले की काहींची नाके मुरडायला लागतात. पण... कुटलिपी तज्ञ श्री. हैयोंच्या कूटलिपीच्या लेखानंतर मिपावर श्री. घाटपांडेंनी आमच्या मते नाडी ग्रंथ हे लोकसाहित्य आहे असे मत व्यक्त केलेले आहे. नाडीपट्टींमधले साहित्य हे "साहित्य" ह्या अर्थाने काव्यरुप साहित्य आहे हे माझेही मत आहे. त्यामुळे मी श्री. हैयोंना असे सुचवीन की नाडीग्रंथातील काव्याच्या अभ्यास करून नाडी ग्रंथ साहित्यातील विविध वैशिष्ठ्ये व बारकावे मिपाच्या चतुर व गुणग्राही वाचकांना सादर करावेत. अनेकांना माहित असेल की नाडी ग्रंथातील प्राचीन तमिळ काव्य आहे. नाडी वाचक ते काव्य गाऊन सांगतात. गायनात जसे बारकावे असतात तसेच अनेक बारकावे या काव्यात असून एका बाजूला स्वर तर दुसऱ्या बाजूला शब्द माधुर्य, लय, प्रासादिकता साधून व्यक्तीला अनुलक्षून त्याचे अचुक वर्णन करणारी शब्दरचना, एका शब्दातून अनेक अर्थांची रेलचेल व अतिकमी अक्षरात सुचक वा गहन अर्थ ठासून भरून ठेवलेला आहे. सध्याच्या काळात प्रचलित संकल्पनांना अचुक शब्दांनी काव्याच्या मालेत गुंफून, अलंकार, उपमा, रुपकामधून जातकापर्यंत पोचवताना त्यांनी दाखवलेली कमाल यथावकाश श्री हैयो उकलून दाखवतील तर काय बहार येईल? . या माझ्या विनंतीला मान देऊन हैयोंनी नाडी ग्रंथातील सिदुपा यमक प्रकाराचा नमुना एका वेगळ्या लेखातून सादर केला होता. नव्या सदस्यांच्या माहितीसाठी तो नंतर सादर करीन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा