पावसात जळाया लागलो...
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
१०० झाल्याबद्दल सगाचा सत्कार
पातळविजयम असतं तर वरती हाहाहा