✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

('मी' ची कहाणी )

प
प्रसाद गोडबोले यांनी
गुरुवार, 05/21/2015 - 21:18  ·  लेख
लेख
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो . मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले. मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड ! यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे. आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =)) mi - 'मी' अतिअवांतर : मीनिमॅलिझम
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
38506 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

अगागा... कहर आहे राव.

सतिश गावडे
गुरुवार, 05/21/2015 - 21:26 नवीन
अगागा... कहर आहे राव.
मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो .
हे तर रजनीकांत स्टाईलने बंदुकीच्या एका गोळीने दोन व्हिलनना आडवे करण्यासारखेच झाले.
  • Log in or register to post comments

विकिपेडीयावरुन गोळा केलेला

सुबोध खरे
गुरुवार, 05/21/2015 - 21:39 नवीन
विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे ? पण मला तर चौकोन दिसतो आहे.
  • Log in or register to post comments

हे घ्या हो.. __/\__

हाडक्या
गुरुवार, 05/21/2015 - 21:40 नवीन
हे घ्या हो.. __/\__
  • Log in or register to post comments

=)))))))

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/21/2015 - 21:43 नवीन
=)))))))
  • Log in or register to post comments

तुमचे कुठे क्लासेस , शिकवण्या

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 21:44 नवीन
तुमचे कुठे क्लासेस , शिकवण्या वगैरे असतात का हो? मला यायचे आहे .
  • Log in or register to post comments

मीचीलाल!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/21/2015 - 21:44 नवीन
मीचीलाल!!
  • Log in or register to post comments

७५ वाचने आणि ६ प्रतिसाद, वा.

चित्रगुप्त
गुरुवार, 05/21/2015 - 21:51 नवीन
७५ वाचने आणि ६ प्रतिसाद, वा.
  • Log in or register to post comments

लेखाचं नाव धरून फक्त १३ "मी"

अद्द्या
गुरुवार, 05/21/2015 - 21:56 नवीन
लेखाचं नाव धरून फक्त १३ "मी" ??? छे . .
  • Log in or register to post comments

प्रगोच्या मीनी बोटचेपेपणाचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/21/2015 - 21:57 नवीन
प्रगोच्या मीनी बोटचेपेपणाचं धोरणं घेतलयं बहुतेक. (डॉक हलकं घ्या हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हा ना . .

अद्द्या
गुरुवार, 05/21/2015 - 22:01 नवीन
हा ना . . हा तर चक्क आळशीपणा झाला राव . कमीत कमी ५० तरी आले पाहिजे होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

:D

मंदार दिलीप जोशी
Fri, 05/22/2015 - 09:46 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मघाशी प्रतिसाद देण्यासाठी लेख

सतिश गावडे
गुरुवार, 05/21/2015 - 22:01 नवीन
मघाशी प्रतिसाद देण्यासाठी लेख वरवर चाळला होता. आता व्यवस्थित वाचला. या लाल रंगाच्या चौकोनाला तुम्ही चित्र म्हणता? आणि त्याला "मी" असे नावही देता? तुम्हा हुच्चभ्रूंचे सगळेच वेगळे बुवा.
  • Log in or register to post comments

चित्र खूप आवडल्या गेले आहे,

खटपट्या
गुरुवार, 05/21/2015 - 22:34 नवीन
चित्र खूप आवडल्या गेले आहे, विक्रीसाठी असेल तर वीकतही घेतले जाईल. कुठे प्रदर्शन वगैरे भरवता का? पुढच्या चित्राच्या प्रतीक्षेत..
  • Log in or register to post comments

+१०००००००

अजया
गुरुवार, 05/21/2015 - 22:40 नवीन
चानच मस्तच कसं जमतं तुला हे मलाही सांग ना
  • Log in or register to post comments

रोमांचित कहाणीकडे दुर्लक्ष

रेवती
Fri, 05/22/2015 - 00:16 नवीन
रोमांचित कहाणीकडे दुर्लक्ष होत आहे, पुढील लेखन येण्याची वाट बघणार्‍यांवर हा अन्याय आहे. म्याडम तुमी हिकडे वेळ घाल्वू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हो ना ! मीही तेच सांगितले काल

प्रसाद गोडबोले
Fri, 05/22/2015 - 14:22 नवीन
हो ना ! मीही तेच सांगितले काल ! कशाला बै हिथं वेळ वाया घालवायचा , जळ्ळं मेलें लक्षण , ह्या प्रगो ना काही काम ना धंदा . उगाच नुसत्या चकाट्या मारत असतो . कोणी एकीने इतकी कलात्मकता दाखवुन इतके चान चान दागिने केले तरी त्याचं काही कौतुकच नै ! श्शी ! कार्तिकेयाचाच अवतार दिसतोय जणु हा प्रगो . =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अच्चं झालं तर =))

अजया
Fri, 05/22/2015 - 15:00 नवीन
कार्तिकेयाच्या चित्रात दागिने असतात ब्वा!त्याला महिषासूरमर्दिनींची अॅलर्जी आहे.दागिन्यांची नव्हती ऐकली बाई=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मस्त कलाक्रुती.....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/21/2015 - 22:46 नवीन
ह्या कलाक्रुतीचे रसग्रहण करण्यासाठी मनन आणि चिंतन करत आहे. आपल्या हातून अशाच उत्त्मोत्तम कलाक्रुती घडो, ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments

कसं काय सुचतं राव तुम्हाला हे

प्रचेतस
गुरुवार, 05/21/2015 - 23:02 नवीन
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं?
  • Log in or register to post comments

दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न

बॅटमॅन
गुरुवार, 05/21/2015 - 23:34 नवीन
दूऊऊऊऊष्ट मिपाकरांकडे लक्ष न देता लाल रंगाचा डब्बा संपवल्याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे =))
  • Log in or register to post comments

ब्याटमीन

आदूबाळ
गुरुवार, 05/21/2015 - 23:40 नवीन
ब्याटमीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नै हो, ब्याटम्यान साठी बॅट

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 00:02 नवीन
नै हो, ब्याटम्यान साठी बॅट अशी शेप्रेट रासच सुरू करावी अशी त्या फ्रॉडशास्त्रविशारदांकडे मागणी करावी म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ब्याटमीन मधला मीन संस्कृतमधला

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/22/2015 - 12:02 नवीन
=)) ब्याटमीन मधला मीन संस्कृतमधला की इंग्लिश्मधला ???!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लाल रंग हा डबा नसून ती एक

सतिश गावडे
गुरुवार, 05/21/2015 - 23:42 नवीन
लाल रंग हा डबा नसून ती एक प्रवृत्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्हाला मुद्दा कळलेला नाहीये

अद्द्या
गुरुवार, 05/21/2015 - 23:45 नवीन
तुम्हाला मुद्दा कळलेला नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दुरुस्ती: ते वाक्य "आपणास

सतिश गावडे
गुरुवार, 05/21/2015 - 23:50 नवीन
दुरुस्ती: ते वाक्य "आपणास मुद्दा कळलेला नाही" असं आहे. कृपया चुकीचे लिहून थोरामोठ्यांच्या सुवचनांचा अपमान करु नका. तुमचा अपमान केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मापी मापी हुजूर मापी

अद्द्या
गुरुवार, 05/21/2015 - 23:55 नवीन
मापी मापी हुजूर मापी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अर्रर्र... तुम्हाला अजून तीन

सतिश गावडे
Fri, 05/22/2015 - 00:04 नवीन
अर्रर्र... तुम्हाला अजून तीन सुवचने माहिती नाहीत. नाहीतर इतक्यात माफी न मागता ती सुवचने तोंडावर फेकून मारली असती तुम्ही. असो. तुमच्या सोयीसाठी चारही सुवचने पुन्हा लिहितो. व्यवस्थित नोट करुन ठेवा. || श्री तांब्याराम प्रसन्न || १. तो तुमचा समज आहे. २. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन ३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात ४. आपणास मुद्दा कळलेला नाही ही सुवचने (आपल्याकडे उत्तर नसले की) समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी याच क्रमाने वापरावीत. अतिशय प्रभावी अशी ही सुवचने असून आम्ही त्यांचा वापर करुन खात्री केली आहे. चौथे सुवचन हे ब्रम्हास्त्र आहे. मात्र तुम्ही ते पहिल्याच बाणावर आणि ते ही चुकीच्या पद्धतीने अभिमंत्रित केलेत त्यामुळे घोळ झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

चार आर्यसत्ये होती तशी ही चार

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 00:06 नवीन
चार आर्यसत्ये होती तशी ही चार 'अत्मसत्ये' आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अगदि अगदि.

सतिश गावडे
Fri, 05/22/2015 - 00:07 नवीन
अगदि अगदि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धागे बुकमार्क होतात तसे

अद्द्या
Fri, 05/22/2015 - 00:15 नवीन
धागे बुकमार्क होतात तसे प्रतिसाद करावे लागतील आता बहुतेक =]]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आजार्‍याच्या तोंडून शेवटच्या

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/22/2015 - 00:19 नवीन
आजार्‍याच्या तोंडून शेवटच्या श्टेपमधे लक्षणांसह रोगच बोलू लागतो.. असे आमचे माणसशास्त्राचे काढे आभासक ..आपलं ते हे गाढे अभ्यासक , ब.घा. नेहमी म्हणतात..त्याची आज आठ्वण झाली. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आणि हो.. त्यांच्या(च)

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/22/2015 - 00:21 नवीन
आणि हो.. त्यांच्या(च) म्हणण्या नुसार अश्यांना 'कुठचं कुठे?आणि किती आणावं? ' याचं भान नसतं.. हे एक बे सीक लक्षण..असतं म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. :

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 00:04 नवीन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. :/ ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

म ला चि त्र क ले त ल का ही च

त्रिवेणी
गुरुवार, 05/21/2015 - 23:35 नवीन
म ला चि त्र क ले त ल का ही च क ळ त ना ही. प ण त री ही चि त्र चां ग ले वा ट ते आ हे. आ णि क ल र ही ए क द म कु ल वा प र ला आ हे.
  • Log in or register to post comments

ह्हा ह्हा...ह्ही ह्ही!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/21/2015 - 23:49 नवीन
ह्हा ह्हा...ह्ही ह्ही! बे रंग_होशी - पीठ कोणी चाळलय पेक्षा ते कोणी मळलय याला महत्व देणारा ... ;-) (सर्वमान्य व बरा घट्ट जिल्बिकर दंगा) मूळ तांब्यातला पिठ्ठू आवडले तरी एकंदरीत बारिक घाणे वाटले. मिपावर स्वतःला किती घाणे तळले याचा विचार करण्याऐवजी आपण किती फेकां'ना जिल्ब्या देऊ शकलो किंवा स्वार्थपूर्ण अवांतर करावे या पंथाचा मी आहे (या पंथाचा इतरांवर आग्रह नाही).
  • Log in or register to post comments

मेलो मेलो

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/21/2015 - 23:55 नवीन
मेलो मेलो, हसून हसून मेलो.... अरे कुणीतरी सिपिआर द्या रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन

सतिश गावडे
Fri, 05/22/2015 - 00:05 नवीन
सिपिआर काय असतं? पेपर नॅपकीन का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नाही हो

श्रीरंग_जोशी
Fri, 05/22/2015 - 00:12 नवीन
सिपिआर असा देतात... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्यवाद !!

सतिश गावडे
Fri, 05/22/2015 - 00:17 नवीन
मायो क्लिनिकच्या वेबसाईटवर सविस्तर दिले आहे. निवांत वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

एवढी सुंदर तरुणी सीपीआर देणार

खटपट्या
Fri, 05/22/2015 - 10:19 नवीन
एवढी सुंदर तरुणी सीपीआर देणार असेल तर मी मरायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शीपीआरची पुढली श्टेप जास्त

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 10:31 नवीन
शीपीआरची पुढली श्टेप जास्त चांगली असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

श्वास चालु करायचाय परत...

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 06:24 नवीन
श्वास चालु करायचाय परत....शेंबुड पुसायचा असेल तर पेपर नॅपकिन ठिके =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/22/2015 - 00:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

=]]]]]]]]]]]]]]

अद्द्या
गुरुवार, 05/21/2015 - 23:57 नवीन
=]]]]]]]]]]]]]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अग्ग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 00:05 नवीन
अग्ग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गा =)) =)) =)) विडंबू आत्मूस ऑन फायर =)) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लोळ!

जुइ
Fri, 05/22/2015 - 01:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुंदर आहे चित्र. wikipedia वर

सतिश गावडे
Fri, 05/22/2015 - 00:10 नवीन
सुंदर आहे चित्र. wikipedia वर पाहिलंय collection . लाल रंगापासून इतकं सुंदर चित्र बनवता येत हेच नवल .
  • Log in or register to post comments

अय्या !!

संदीप डांगे
Fri, 05/22/2015 - 00:49 नवीन
अय्या !! अय्या कित्ती छान आहे हे चित्रं ! मला बनवाल का शिकवायला !!
  • Log in or register to post comments

ते कंसातलं स्वसंपादित राहिलं

रुपी
Fri, 05/22/2015 - 02:14 नवीन
ते कंसातलं स्वसंपादित राहिलं ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा