Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 05/14/2015 - 12:10
प्रिय समुद्रा, कश्या रे तुझ्या लाटा आंधळ्या पुढची कातळावर फुटलेली दिसतच नाही.. मागून येऊन पुन्हा त्याच कातळावर आदळतात कां? कशासाठी?? फुटण्यासाठी ?! ------ प्रिय समुद्रा, तुला चंद्राची खुपच ओढ म्हणे का त्याला तुझी? किती वर्षांची साथ रे तुमची? कधी एकत्र बसून गप्पा मारतांना पाहीले नाही तुम्हाला! अशी कशी रे हि दोस्ती? स्पर्शातित! ----- प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे.. ------ प्रिय समुद्रा, कसं वाटत रे? जेव्हा तुझ्याच किनार्‍याशी बसून तुला न विचारता, तुला साक्षीला ठेवून आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाका घेणार्‍या जोडप्यांकडे बघून? कसा पाहतोस तू त्यांच्याकडे? रागाने? करुणेने? कि वात्सल्याने? ------ प्रिय समुद्रा, एकदा माझ्या घरी येशील? खुप गप्पा मारु वादळाच्या, घनगंभीरतेच्या, बुडणार्‍या जहाजांच्या, रंगीबेरंगी जलचरांच्या, मोत्यांच्या, रत्नांच्या आणि तुझ्या उदरात गडप होऊन आयुष्य संपवणार्‍या जिवांच्या करुण कहाण्यांच्या? तू कसं सामावतोस त्यांना याबद्दल एक विचित्र कुतुहल आहे मला... येशील? ----- प्रिय समुद्रा, तू एकदा खुप रागावला होता म्हणे एक मोठ्ठी लाट जन्माला घातलीस आणि दिली धाडून गरीब भाबड्या जिवांवर कां रे? ना ती लाट जिवंत राहीली ना ते जिव... फक्त एक प्रश्न राहीला कां? ----- प्रिय समुद्रा, तुला माहितीये? तुझ्या माझ्यात एक साम्य आहे तू ही वेडा आणि मी ही एकही लाट जिवंत राहणार नाही हे माहीत असूनही तु एकामागे एक लाटा जन्माला घालत राहतोस आणि मी एकदाही 'ती' किनार्‍यावर येणार नाही हे माहित असूनही रोज एक आशा जन्माला घालत राहतो.. असं कां रे? ---- प्रिय समुद्रा, आज आलो खरा मी तुझ्याकडे... शांततेसाठी आलो होतो जिव निववायला आलो होतो पण जाऊ दे.. चलतो मी.. |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०५/२०१५)

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 05/14/2015 - 12:15

Permalink

छान !!! समुद्र हा त्याच्या

छान !!! समुद्र हा त्याच्या भौतिकतेसारखाच एक गहन विषय आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 05/14/2015 - 12:18

Permalink

सुरेख... :)

सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 05/14/2015 - 13:06

Permalink

वाचताना खुप सोप्प्या पद्धतीने

वाचताना खुप सोप्प्या पद्धतीने वाटतात ही मुक्तके.. पण कितीतरी खुप गहन प्रश्न दडलेले आहेत यात. मस्त वाटले वाचताना .. समुद्राला घरी येशिल म्हणणारे मुक्तक जास्त आवडले.. ---- शेवटच्या मुक्तकात गेलाच होता समुद्राकडे तर बोलायचे की जरा..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 05/14/2015 - 12:51

Permalink

जबराटच, हाय क्लास जियो

जबराटच, हाय क्लास जियो
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 05/14/2015 - 12:53

Permalink

मस्त

प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
हे विषेश आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 05/14/2015 - 14:14

In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

+१

आवडली !
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 05/14/2015 - 19:09

Permalink

वा वा

मिका ही कविता लिहून माझ्या मनांत अनेक वादळे जन्माला घातलीस रे पोरा ! खूप छान !
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/14/2015 - 15:14

Permalink

हे विशेष आवडलं....

प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 05/14/2015 - 15:16

Permalink

'मिका'क्लास कविता!

'मिका'क्लास कविता! भारीच्च! कसं सुचतं ओ ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 05/14/2015 - 15:59

Permalink

+१

'मिका'क्लास कविता! धागा उघडल्याचं चीज झालं!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/14/2015 - 17:05

Permalink

व्रुताच्या

जोखडातून मुक्त आणि अर्थ्-भोवरे देणारी कवीता. जियो एक "मिका टच" म्हणतात तो हाच !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 05/14/2015 - 17:43

Permalink

छान निबध्ध !

छान निबध्ध !
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on गुरुवार, 05/14/2015 - 18:05

Permalink

वा

क्या बात है!
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 05/14/2015 - 21:34

Permalink

आवडली कविता. माझ्या पोटात ही

आवडली कविता. माझ्या पोटात ही वादळे गड गड करत राहतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/14/2015 - 23:26

Permalink

मि.का. ,बस्स! नाम ही काफी है

मि.का. ,बस्स! नाम ही काफी है|
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/14/2015 - 23:35

Permalink

मिकाटच...अप्रतिम.

मिकाटच...अप्रतिम.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Fri, 05/15/2015 - 20:47

Permalink

अप्रतिम. आवडली.

अप्रतिम. आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sat, 05/16/2015 - 10:20

Permalink

अप्रतिम!

अप्रतिम!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 05/16/2015 - 13:40

Permalink

मिका

"हाडाचा" कवी आहे ही नम्र नोंद कवीशी समक्ष भेट झालेला वाचक नाखु.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Sat, 05/16/2015 - 13:48

In reply to मिका by नाखु

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sat, 05/16/2015 - 17:33

Permalink

अतिशय उत्कृष्ट.मिका सिग्नेचर

अतिशय उत्कृष्ट.मिका सिग्नेचर स्पष्ट उमटलेली सुंदर रचना..
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 05/16/2015 - 18:33

Permalink

हे बेस्ट!

प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Mon, 05/18/2015 - 19:05

Permalink

लै भारी

  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Mon, 05/18/2015 - 19:05

Permalink

लै भारी

  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Mon, 05/18/2015 - 19:06

Permalink

लै भारी

  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Mon, 05/18/2015 - 19:07

Permalink

लै भारी

मस्त रे... तुझ्या लेखणीत तरल आणि आशयघन असं जबराट काॅम्बिनेशन आहे. खास मिका स्टाईल
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 05/18/2015 - 22:02

Permalink

अप्रतिम!

समुद्राला विचारलेले प्रश्न त्याच्या लाटांसारखेच विरून जाणार आहेत अनुत्तरित!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्व on Wed, 05/20/2015 - 15:15

Permalink

प्रिय समुद्रा,

प्रिय समुद्रा, एकदा माझ्या घरी येशील? खुप गप्पा मारु वादळाच्या, घनगंभीरतेच्या, बुडणार्‍या जहाजांच्या, रंगीबेरंगी जलचरांच्या, मोत्यांच्या, रत्नांच्या आणि तुझ्या उदरात गडप होऊन आयुष्य संपवणार्‍या जिवांच्या करुण कहाण्यांच्या? तू कसं सामावतोस त्यांना याबद्दल एक विचित्र कुतुहल आहे मला... येशील?
काहीतरी खास आहे या ओळीत.. समद्रासारखच घनगंभीर आणि पोटात खोल खोल अर्थ दडवलेलं
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Mon, 05/25/2015 - 17:11

Permalink

हे कस काय रहिल वाचायच

सही. एक्दम मिका स्टाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by फिझा on Tue, 04/19/2016 - 12:27

Permalink

मस्तच

खूप मस्त !! आवडली कविता !!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 04/19/2016 - 21:08

Permalink

आवडली!

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 04/19/2016 - 21:09

Permalink

आवडली!

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 04/19/2016 - 21:09

Permalink

आवडली!

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Tue, 04/19/2016 - 21:34

Permalink

सुंदर काव्य आहे... अप्रतिम...

सुंदर काव्य आहे... अप्रतिम...
  • Log in or register to post comments

Submitted by उल्का on Tue, 04/19/2016 - 21:38

Permalink

अप्रतिम!

अप्रतिम! समुद्राकडे बघितल्यावर हे असेच काहिसे प्रत्येकाच्या मनी उमटत असावे जे तुम्ही खूप सुन्दरपणे शब्द्बद्ध केलय.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6250 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com