"धागाप्रसवचळ",अर्थात जिल्बिकंडशमनमठ्ठाझल
आत्ताच आलो मिपावर,अंगात आहे कळ !
उडी मारली ज्या धाग्यावर तो माझाच होई !
होती बरीच रद्दी थोपु+ब्लॉगात !
कुठे न बघता,येथे टाकत राही !
उरले न आता काही,ठेविले जे मागे !
ते माझे मलाच वाचवत नाही !
फेकुनी देई झमेला,या नव्या त्रांगड्यात !
सुट्टे ना जे मिळाले मोजूनी आता पाही !
उघडून पाह्तो धागा,प्रतीसाद एक नाही !
वाचनांची संख्या वाढत मात्र राही !
काही करू तरी जिल्बीकंड शमेना !
वाहव्वाच्या भुलथापेत मी चूर राही !
रोज नवे धागे प्रसवीत मीच आहे !
वाचक पकला तरी निराश मी नाही !
टाकला धागा पहिला,लॉगिन झालो तेव्हा !
चावेल का मला कोणी, वाचेल तो जेंव्हा !
उमजून घेण्या थोडे,उगा रूजवात करावी !
फक्त कुणाशी, याची खबरबात नाही !
नाहीजात
आमची उबळ
आणि गेल्या पंधरा दिवासात आलेली जिल्बी ताटे.
विडंबन खूप छान जमलंय, आवडले
माझ्याकडून काही(ही)
बाब्बौ!
आसन क्रमांक 3 चाखिव! ;-)
@ नाखु आणि झंप्या : दोन्हीही
+13
उन्हाळ्यात जिलेबी वर थंड गोड