नक्षीची दुसरी बाजू..
नक्षीची दुसरी बाजू.
महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे.
त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!!
आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा
होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा
आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले
काया रापली जराशी, जरा गाल आत गेले
मागे माघारीण उभी, होती उगा त्रासलेली
प्रेयसीच की पूर्वीची आता जरा सुटलेली
एक शाळेला गेलेले, एक घेई कडेवरी
हाती कामांची घे यादी, झाली कावरीबावरी
संपे भांड्यांचा रगाडा फोटोफ्रेम पुसू लागे
गप्पा सप्ताहभराच्या सांगे, फिरे मागे मागे
फ्रेम पाहुनिया एक जरा मनी थबकला
होता तोच की पूर्वीचा, आता पार हरवला
उभा संसार ओढता कसे नाकी नऊ आले
जरा स्थिर होतो तोच तीन दोनाचे की झाले
भूतकाळ आठवूनि खिन्न हसला मनाशी
घाव लपवून सारे, रेखे संसाराची नक्षी
+१
+१०००
काय झक्कास षटकार ठोकला आहेस
अगायायायायायाया
एक मिनिट...
प्रचंड अनुमोदन..
बाकी खेद, राग वगैरे काही नाही
मूळ कविता आणि त्यावर होणारी
अजून एक मिनिट
'माणूस' म्हणून असणारी
अजुन दोन मिनिटं घ्या..
सर्व अनाहितांना माझा सादर
चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही.
आत्ता पर्यंत ३ प्रतिप्रतिसाद
.
सचिनच्या डोळ्याना सुखावना-या फटक्यांची आठवण झाली
आता जुन/जुलै मधे .... पहिला
स्रुजा,अगदी हेच लिहायचं होतं
अनुमोदन जरुर द्या . पण स्वतचा
हीन प्रतिसाद
++११
???
अरे अन्या
+१
@ सूड सुटला , प्रगो अडकला>>
@ सूड कविता आवडली. स्तुत्य
मला काय म्हणायचंय हे समजून
"काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल
ख्याक
(No subject)
सूडराव
छान
मिळूनी साऱ्याजणी "मौक़ाss मौक़ा
मस्त रे सूड
स्त्री पुरुष समानता म्हणुन
सल्युट कॅप्टन.
चिमणराव
तर्कनिष्ठतेची योग्यायोग्यता.
+++१११
यु सेड इट !!
+१
Pagination