Skip to main content

नक्षीची दुसरी बाजू..

लेखक सूड यांनी बुधवार, 18/03/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षीची दुसरी बाजू. महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे. त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!! आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले काया रापली जराशी, जरा गाल आत गेले मागे माघारीण उभी, होती उगा त्रासलेली प्रेयसीच की पूर्वीची आता जरा सुटलेली एक शाळेला गेलेले, एक घेई कडेवरी हाती कामांची घे यादी, झाली कावरीबावरी संपे भांड्यांचा रगाडा फोटोफ्रेम पुसू लागे गप्पा सप्ताहभराच्या सांगे, फिरे मागे मागे फ्रेम पाहुनिया एक जरा मनी थबकला होता तोच की पूर्वीचा, आता पार हरवला उभा संसार ओढता कसे नाकी नऊ आले जरा स्थिर होतो तोच तीन दोनाचे की झाले भूतकाळ आठवूनि खिन्न हसला मनाशी घाव लपवून सारे, रेखे संसाराची नक्षी
लेखनविषय:

वाचने 13393
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by अजया

हेच म्हणतेय प्रतिसादाचा निषेध @ सुड कविता आवडली.

In reply to by सानिकास्वप्निल

निषेध करण्याइतका प्रच्चंSSSSSSSSSड वाईटपणा प्रगोंच्या प्रतिसादात नक्की कुठे आहे हे उमगलं नाही. असो. @सूड, मस्त कविता.

In reply to by अन्या दातार

सूड सुटला , प्रगो अडकला

In reply to by स्पा

अनाहिताज् जस्ट वॉना हॅव फन!

मला काय म्हणायचंय हे समजून घेतल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!! बाकी गिर्जाकाकाचा प्रतिसाद खोचक असेल, सार्क्यास्टिक असेल, पण हीन नाही. अर्थात हे माझं मत आहे, तुम्हाला हीन वाटू शकतं आणि तुमच्या या वाटण्याचा आदर आहे.
"काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल वरुन बघाव्या लागतात, केवळ स्त्री-पुरुष म्हणुन नाही.. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की "नेहमीच" स्त्री, पुरुष स्वत:च वेगळेपण सोडून केवळ माणुस ह्या एका पातळीवर असतील.
पिरातैंच्या या वाक्यामुळे हा प्रतिसाद वास्तववादी वाटला आणि प्रचंड आवडला. पुन्हा सर्वांचे आभार!! :)

In reply to by सूड

"काहीवेळा" गोष्टी हाय लेव्हल वरुन बघाव्या लागतात, केवळ स्त्री-पुरुष म्हणुन नाही.. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की "नेहमीच" स्त्री, पुरुष स्वत:च वेगळेपण सोडून केवळ माणुस ह्या एका पातळीवर असतील.
एकूण प्रतिसादाशी तुलना करून पाहता हे वाक्य म्हणजे भांगेत तुळस आहे.

कविता आवडली.

मिळूनी साऱ्याजणी "मौक़ाss मौक़ा.. मौक़ाss मौक़ा" गाणे गात फेर धरून नाचताहेत ऎसे चित्र डोळ्यासमोर येऊन ड्वोळे पानावले

स्त्री पुरुष समानता म्हणुन कितीही जरी आरडाओरडा केला तरी ते निसर्गनियामाप्रमाणे कधीही शक्य नाही. शारिरिक आणि मानसिक पातळीवरच्या प्रो आणि कॉन्स ला एका समान पातळीवर आणणं कधीही शक्य नाही. वैचारिक पातळीवर एकमेकांना समसमान दर्जा देणं आणि एकमेकांचा एक माणुस म्हणुन आदर करणं हे सहजशक्य आहे किंबहुना तेच अपेक्षित आहे. तेवढं करायचा प्रयत्न केला तरी बरेच वाद मिटतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सल्युट कॅप्टन. हेच सांगायच आहे सर्वांना, दुसरं काही नाही. मानसिक पातळीवर आपण एकमेकाला आदराने वागवु शकतो, आणि त्याचीच अपेक्षा आहे. थँक्स अ टन चिमणराव!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणराव एकदम खिळ्यावर डोकं हाणलं. आपलं ते डोक्यावर खिळा हाणला. आपला ते हातोड्याच्या डोक्यावर खिळा हाणला. जाऊ द्या तुम्हाला समजलं ना? एकदम परफेक्ट

तर्काचं एक वैशिष्ठ्य असं आहे की तर्काला जर विवेकबुद्धीची जोड नसेल तर तर्काचे रूपांतर कुतर्कात व्हायला वेळ लागत नाही. अजून काय बोलणे!

सूडराव मस्त "काटा" छापा वाचलाच नव्हता. धुळवडीतले "चिमणबोल" वाचले. (आणि वाचवले)