Skip to main content

पावसाची परी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 15/08/2008 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे लपलीस सरी दु:खी पावसाची परी सरी बसल्या लपून परी गाल फुगवून ये ग सरी ये ग सरी गाते पावसाची परी सरी आल्या भरभरून परी हसली खळखळून नको सरीवर सरी चिंब पावसाची परी बुडे घरे दारे सारी परी जा ग तुही घरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1919
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मनोहर साहेब, तालात म्हणावी अशी सुंदर कविता आहे. लिहित राहा.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे