Skip to main content

पावसाची परी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 15/08/2008 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

कुठे लपलीस सरी
दु:खी पावसाची परी
सरी बसल्या लपून
परी गाल फुगवून

ये ग सरी ये ग सरी
गाते पावसाची परी
सरी आल्या भरभरून
परी हसली खळखळून

नको सरीवर सरी
चिंब पावसाची परी
बुडे घरे दारे सारी
परी जा ग तुही घरी

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1948
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मनोहर साहेब,
तालात म्हणावी अशी सुंदर कविता आहे.
लिहित राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे