✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

ख
खटासि खट यांनी
Wed, 02/25/2015 - 13:52  ·  लेख
लेख
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ? ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?) ९. इतर शंका हळू हळू
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
25731 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

तुमचा अधिकार मोठा हे मान्य

खटासि खट
Fri, 02/27/2015 - 14:46 नवीन
तुमचा अधिकार मोठा हे मान्य करून पण म्हणावेसे वाटते की , फुर्र ..फुर्र ..फु हु हु हु हुश्श ! अनुभव घेतल्याशिवाय इतरेजनास बरंवाईट सांगता येतं का ? लिव्ह इन झाले की नव्यानेच येऊ घातलेले सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात वन नाईट स्टँड्चा सुद्धा विचार करावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

यू मीन एकनिशीपंथ?

बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 15:08 नवीन
यू मीन एकनिशीपंथ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

ष्ट्यांड राह्यला रे ब्याट्या!!

सूड
Fri, 02/27/2015 - 15:18 नवीन
एकनिशीउत्तिष्ठपंथ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाही. शब्दशः भाषांतर केले तर

बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 15:35 नवीन
नाही. शब्दशः भाषांतर केले तर वरील शब्दाचा अर्थ काही वेगळाच व्हायचा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मराठीदिनाच्या दिवशी खरी

संदीप डांगे
Fri, 02/27/2015 - 15:39 नवीन
मराठीदिनाच्या दिवशी खरी मराठीची सेवा तर इथे सुरु आहे.. जिओ मिपा... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक

बॅटमॅन
Fri, 02/27/2015 - 15:52 नवीन
तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक उगा दुर्लक्षानं मारतात अशा सेवेला. निष्काम सेवेची दखल घेतल्याबद्दल आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नवीन निष्काम कर्मयोगी तुम्हीच

टवाळ कार्टा
Fri, 02/27/2015 - 16:45 नवीन
नवीन निष्काम कर्मयोगी तुम्हीच बॅट्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

निष्काम. ह्म्म्म्म.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 17:28 नवीन
निष्काम. ह्म्म्म्म. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

निष्काम कर्म-योगी(????)

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/01/2015 - 11:17 नवीन
निष्काम कर्म-योगी(????) Image removed. या खाटुकाला हाणा रे सगळ्यांनी मिळून...काय लेकाचा एकेक कल्पना प्रसवतो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काय लेकाचा एकेक कल्पना

हाडक्या
Mon, 03/02/2015 - 05:48 नवीन
काय लेकाचा एकेक कल्पना प्रसवतो!
:)))) . :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

निष्काम कल्पनाप्रसव अ‍ॅवॉर्ड

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/02/2015 - 07:11 नवीन
निष्काम कल्पनाप्रसव अ‍ॅवॉर्ड चे विजेते हैत ब्रुस्वेण "खाटुक" गॉथमहळ्ळीकर... (अखिल मिपा मापंकाढे समिती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

असे नाहीये वो !! आत्ताच

खटपट्या
Fri, 02/27/2015 - 23:44 नवीन
असे नाहीये वो !! आत्ताच "एकनिशीउत्तिष्ठ" या शब्दावर एक तासाची अतिशय प्रतीभाशाली चर्चा झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

क्रांती!

एस
Sat, 02/28/2015 - 00:12 नवीन
हल्ली कुठल्याही 'रिलेशन' संबंधी धागा आला की तो सुसाट सुटतो. पूर्वीसारखा काड्यासारू, ज्वलंत विषयांवरचा धागा हल्ली दुर्लक्षाने मारला जातो. हे मराठी संस्थळांबाबत म्हणायचे झाले तर क्रांतीचेच एक प्रकारे लक्षण आहे. चांगलंय. तसल्या वांझोट्या चर्चा वाचून डोके उठायचे. आता मस्त करमणूक होते. लगे रहो!
  • Log in or register to post comments

ओहो...

ब़जरबट्टू
Mon, 03/02/2015 - 10:35 नवीन
तर मुळात मिपाचे पण "व्हाट्अप" होतोय तर... :(
  • Log in or register to post comments

अच्चं होतयं तल!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/02/2015 - 23:11 नवीन
अच्चं होतयं तल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

ते "अच्चा अच्च जालं तल" असे

टवाळ कार्टा
Tue, 03/03/2015 - 11:30 नवीन
ते "अच्चा अच्च जालं तल" असे आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हैती आहे बे...मी मुद्दाम

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/03/2015 - 11:43 नवीन
म्हैती आहे बे...मी मुद्दाम बदललं आहे थोडं>.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सेम प्रश्न माझे पण . फक्त ६

तुडतुडी
Tue, 08/04/2015 - 14:28 नवीन
सेम प्रश्न माझे पण . फक्त ६ आणि ७ मध्ये जरा बदल आहेत ६. अंगठ्या सोन्याच्याच असाव्यात का ? त्यांचा खर्च कोण करणार ७. पतीस कल्पना द्यावी का ? ;-)
  • Log in or register to post comments

" ली अ री " प्रकाराबद्दल

डायवर
Sun, 08/16/2015 - 12:35 नवीन
" ली अ री " प्रकाराबद्दल अंमळ कन्फ्युजन आहे तरीही इथल्या धुरिणांनी टिंगल न उडवता खालील काही प्रश्नांची उत्तरे देवून हि संकल्पना समजण्यासाठी मदत करावी हि विनंती. - समजा आपला "ली अ री " जोडीदार आपल्याला परपुरुषाच्या बाहुपाशात आढळला किंवा आपण अचानक घरी आलो असता ती तिच्या एखाद्या मित्रासोबत नको त्या अवस्थेत रंगे हात सापडल्यास आपले रक्त खवळले पाहिजे कि डोके तरीपण थंडच राहिले पाहिजे? कारण समजा काही जाब विचारलाच तर " मी काही तुझी बायको नाही" असे उत्तर मिळू शकते. किंवा कसे? - जर "ली अ री " मध्ये असे काही बंधन नसतीलच तर हे म्हणजे एक भिन्न लिंगी रूम- पार्टनर सोबत राहिल्यासारखेच नाही का ? - थोडक्यात जर दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकमेकांच्या फक्त रूम पार्टनर असतील तर त्यांनाहि "ली अ री " कपल म्हणता येईल काय?
  • Log in or register to post comments

डायवरभौ, गल्लीत खेळलेलं

आदूबाळ
Sun, 08/16/2015 - 12:52 नवीन
डायवरभौ, गल्लीत खेळलेलं क्रिकेट डोळ्यांसमोर आणा. त्यात कसे खेळाडूंच्या सोईनुसार एक टप्पा औट,डावीकडच्या भिंतीला दोनरन्स, मुळीकांच्या घरात गेला तर औट वगैरे नियम बनवलेले असतात. आता हेच नियम असेच्या असे दुसऱ्या गल्लीत चालतील का? तर हे लि इ री. नाय तर मग डैरेक पांढरे कपडे घालून टेस्ट म्याच खेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डायवर

फक्त _/\_, ;-)

संदीप डांगे
Mon, 08/17/2015 - 00:14 नवीन
फक्त _/\_, ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+१

नाखु
गुरुवार, 08/27/2015 - 16:30 नवीन
काही जण त्याला गाजराची पुंगी म्हणतात खखो माहीत नाही.

लेईरीतज्ञजिंक्य्वीद्यापीठाधीशनुभवसिद्ध्योगीपुरूष यमगर्नीकर महाराज श्रोता-भावीक संघ

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

५. यात मानपानाचे कसे काय

सुजल
Tue, 09/01/2015 - 01:52 नवीन
<<४.लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?>. अगदीच बाळबोध प्रश्न . अस कस व्ह ?
  • Log in or register to post comments

आयला आपण नवीन समजतोय

अकिलिज
गुरुवार, 09/03/2015 - 20:38 नवीन
ही ईन्द्राणी बै ८७ साली लि ई री मध्ये होती म्हणतेय.... म्हंजे आटरा वर्स जूना कंसेप्ट आपण चघळत बसलोय.
  • Log in or register to post comments

गणित नापास झालतंस काय रे

प्यारे१
गुरुवार, 09/03/2015 - 20:44 नवीन
गणित नापास झालतंस काय रे अक्या? १९८७ पस्नं २०१५ आटरा हुत्यात व्हय? -कोल्लापुरी ट्रॉय प्रेमी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज

गडबडीत हुतं.

अकिलिज
गुरुवार, 09/03/2015 - 21:06 नवीन
M3 उडलाता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा