Skip to main content

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 25/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ? ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?) ९. इतर शंका हळू हळू
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25884
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
तुम्ही अजून प्रेषित प्रगो यांच्या पोप संप्रदायाचे सदस्य झालेले दिसत नाही आहात? लौकर दिक्षा घ्या म्हणजे वरिल दोन्ही प्रश्न चटकन सुटतील. मग पुढच्या प्रश्नांची काही आवश्यकता वाटणार नाही कारण पुढची उत्तरे आपोआप निर्माण होतात.

एकदा सर्व ठरले की लि.री.चा बस्ता मात्र लिरिल सारीज अ‍ॅड कटपीस सेंटर, लाजरा रोड, अंमळनेस या ठिकाणीच. तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.

In reply to by गवि

तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.
१.या तीन पिढ्या लिइरि मधून जन्मलेल्या पुण्यफळांच्या का? २.कधीही तुटू शकतं हा लिइरिचा विश्वास आहे. तो तुमच्याकडे अतूट कसा काय?

In reply to by खटासि खट

अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक आहे हो.. आशीर्वाद आहेतच. बिलातही सूट देऊ. लिरीचे ठरले की जोडीने या.

नवे गाणी " निघाले आज.....लिव्हीन च्या घरी " " लेक लाडकी या घरची.होणार लिव्हीन मी त्या घरची "

In reply to by विजुभाऊ

मग तिची आई हे गाणं म्हणेल, ओटीत घातली मुलगी लिव्हिण बाई!

In reply to by तिमा

हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला पाह्यजे असं काही नाही ना. फक्त, 'लाडकी लेक ही माझी पहिली वहिली, भाग्येच तियेच्या ??? आपली झाली'

आणखी एक. नेसली....ईईईईईईईईईई लिव्हीन ची साडी.......

बरं अजून एक आठवले जर लग्न गावाकडे किंवा मुलीच्या घरी झाले तर शहरात पोहोचल्यावर रिसेप्शन द्यावे लागते का ? मंगळागौर, हळदीकुंकू करावे लागते का ? झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?

In reply to by खटासि खट

झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?
डोहाळजेवण चांदण्यातलं करायचं!! दोघांनीही पांढरे कपडे घालायचे. पदार्थही पांढरे...उकडीचे मोदक, दहीभात, दूधभात. नारळीभात, बासुंदी केली तरी त्यात केशर घालायचं नाही. मुळा, पांढरा कांदा हे भाजीत वापरायचं आणि सगळी चांदण्याशी संबंधित गाणी ऐकत बसायचं!! ;)

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे मार्गदर्शन ला हसवाफसवी मधला शब्द "मागल दर्शन " वापरून लिहा आनि मग बघा.... कशी रांग लागेल. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . दर्शन नव्हे सल्ला देणार्यांची..

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
यात सगळ्यात मोठी अडचण आहे जागा. एकदा का 'खोली' गावली का नाय मंग पार्टनर मिळुनच जायेल!
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
कुठेही चालेल. आजकाल मुंबईत यासाठी लोकलचे डब्बे, बसमधील फुडल्या शीटांची पाठ यांची फुल्ल चलती हाय. जरा वेगळ्या प्रकारचे पार्टनर हवे असतील तर सार्वनजिक मुतार्‍यांच्या भितीही ट्राय करू शकता.
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
नाय बा! काय कल्पना नाय!
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
हात साला! जे काय करायचा हाय त्याला खोली पुरते. उंगाच कशाला होल बिल!
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
तुझ्या षौकावर डिपेन् हाय! नैतर हव्वी ती लाँज्री नाय म्हनून पन मानापमान होतात म्हने!
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे
नकोच ते.. ते मदे मदे येत अस्नार! पोशाक टांगायला खिल्ला पण पुरतो, नैरत र्‍हावू दे की जमिनीवर!
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
कोनाकोनाच्या?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
लिव्ह मंजी र्‍हाणे, इन म्हंजी आत नी रिलेशनशिप म्हंजी संबंद आसं मास्तुराने शिकवलेला! म्हणून मी तरी वरची माहिती "आत राहून (ठेवलेल्या) संबंधा"ची दिलेली हाय!! बरुबर अर्थय ना!?

In reply to by काळा पहाड

=)) उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला असता हो. पण काय करणार युज अँड थ्रो वृत्ती नाही. :)

In reply to by यमगर्निकर

तुमचा अधिकार मोठा हे मान्य करून पण म्हणावेसे वाटते की , फुर्र ..फुर्र ..फु हु हु हु हुश्श ! अनुभव घेतल्याशिवाय इतरेजनास बरंवाईट सांगता येतं का ? लिव्ह इन झाले की नव्यानेच येऊ घातलेले सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात वन नाईट स्टँड्चा सुद्धा विचार करावा म्हणतो.

In reply to by संदीप डांगे

तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक उगा दुर्लक्षानं मारतात अशा सेवेला. निष्काम सेवेची दखल घेतल्याबद्दल आनंद वाटला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

निष्काम कर्म-योगी(????) http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-cartoon-022.gif या खाटुकाला हाणा रे सगळ्यांनी मिळून...काय लेकाचा एकेक कल्पना प्रसवतो! =))

In reply to by हाडक्या

निष्काम कल्पनाप्रसव अ‍ॅवॉर्ड चे विजेते हैत ब्रुस्वेण "खाटुक" गॉथमहळ्ळीकर... (अखिल मिपा मापंकाढे समिती)

In reply to by बॅटमॅन

असे नाहीये वो !! आत्ताच "एकनिशीउत्तिष्ठ" या शब्दावर एक तासाची अतिशय प्रतीभाशाली चर्चा झाली...

हल्ली कुठल्याही 'रिलेशन' संबंधी धागा आला की तो सुसाट सुटतो. पूर्वीसारखा काड्यासारू, ज्वलंत विषयांवरचा धागा हल्ली दुर्लक्षाने मारला जातो. हे मराठी संस्थळांबाबत म्हणायचे झाले तर क्रांतीचेच एक प्रकारे लक्षण आहे. चांगलंय. तसल्या वांझोट्या चर्चा वाचून डोके उठायचे. आता मस्त करमणूक होते. लगे रहो!

तर मुळात मिपाचे पण "व्हाट्अप" होतोय तर... :(

सेम प्रश्न माझे पण . फक्त ६ आणि ७ मध्ये जरा बदल आहेत ६. अंगठ्या सोन्याच्याच असाव्यात का ? त्यांचा खर्च कोण करणार ७. पतीस कल्पना द्यावी का ? ;-)

" ली अ री " प्रकाराबद्दल अंमळ कन्फ्युजन आहे तरीही इथल्या धुरिणांनी टिंगल न उडवता खालील काही प्रश्नांची उत्तरे देवून हि संकल्पना समजण्यासाठी मदत करावी हि विनंती. - समजा आपला "ली अ री " जोडीदार आपल्याला परपुरुषाच्या बाहुपाशात आढळला किंवा आपण अचानक घरी आलो असता ती तिच्या एखाद्या मित्रासोबत नको त्या अवस्थेत रंगे हात सापडल्यास आपले रक्त खवळले पाहिजे कि डोके तरीपण थंडच राहिले पाहिजे? कारण समजा काही जाब विचारलाच तर " मी काही तुझी बायको नाही" असे उत्तर मिळू शकते. किंवा कसे? - जर "ली अ री " मध्ये असे काही बंधन नसतीलच तर हे म्हणजे एक भिन्न लिंगी रूम- पार्टनर सोबत राहिल्यासारखेच नाही का ? - थोडक्यात जर दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकमेकांच्या फक्त रूम पार्टनर असतील तर त्यांनाहि "ली अ री " कपल म्हणता येईल काय?

In reply to by डायवर

डायवरभौ, गल्लीत खेळलेलं क्रिकेट डोळ्यांसमोर आणा. त्यात कसे खेळाडूंच्या सोईनुसार एक टप्पा औट,डावीकडच्या भिंतीला दोनरन्स, मुळीकांच्या घरात गेला तर औट वगैरे नियम बनवलेले असतात. आता हेच नियम असेच्या असे दुसऱ्या गल्लीत चालतील का? तर हे लि इ री. नाय तर मग डैरेक पांढरे कपडे घालून टेस्ट म्याच खेळा.

In reply to by संदीप डांगे

काही जण त्याला गाजराची पुंगी म्हणतात खखो माहीत नाही.

लेईरीतज्ञजिंक्य्वीद्यापीठाधीशनुभवसिद्ध्योगीपुरूष यमगर्नीकर महाराज श्रोता-भावीक संघ


४.लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?>. अगदीच बाळबोध प्रश्न . अस कस व्ह ?

ही ईन्द्राणी बै ८७ साली लि ई री मध्ये होती म्हणतेय.... म्हंजे आटरा वर्स जूना कंसेप्ट आपण चघळत बसलोय.