✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छगनलालांचे सापळे (भाग ९)

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 02/20/2015 - 12:30  ·  लेख
लेख
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/29329 हा भाग शेवटचा,त्यामुळे छगनलाल विषयी काही गोष्टींचा फक्त उल्लेख करतो. छगनलाल आणि माझे संबंध हे मालक-नौकर ह्या पुरतेच मर्यादित असल्याने, खूद्द छगनरावांनी मला कधीच त्यांच्या बद्दल माहिती दिली नाही. किरण हा साहेबांचा प्रथम पत्नी पासून झालेला मुलगा. ह्याची आई जिवंत आहे का म्रुत, ह्याचा उलगडा मला झाला नाही आणि मी तो शोध घ्यायचा पण कधी प्रयत्न पण केला नाही. अशोक आणि साहेबांचे नक्की नाते काय? हे पण कधी समजले नाही,पण ह्या नात्यात साहेबच्या मेहूणीची काही-तरी भुमिका असावी हे नक्की. साहेबांची मेऊणी, ही आमच्यासाठी शेवटपर्यंत फक्त "साहेबांची मेहुणी" ह्याच नावाने वावरली. ========================= "मनांत हा विचार घोळवतच मी कामावर गेलो....आणि काय योगा-योग त्याच दिवशी हे काम लवकरांत लवकर सोडायचा निर्णय मला घ्यावाच लागला." त्या दिवशी नेहमी प्रमाणे कामाला सुरुवात केली.साहेब अहमदाबादलाच तळ ठोकून असल्याने आणि किरणची काहीच मदत नसल्याने, माझी जबाबदारी तशी वाढलेलीच होती. नेहमी प्रमाणे साहेबांचा सकाळी ९च्या सुमारास फोन आला होता आणि त्यावेळी कालचा रिपोर्ट सांगीतला आणि आजच्या कामाची रूपरेखा त्यांच्या बरोबर ठरवून पण झाली होती.आज कुठल्याही परिस्थितीत २० मशिन्स तयार करायची होती.दुपारी १च्या सुमारास साहेब परत एकदा फोन करणार होते.त्या वेळेपर्यंत निदान ७ मशिन्स तरी पुर्ण करणे भाग होते. मी ७वे मशिन टेस्टींग साठी हातात घेतले न घेतले, इतक्यात इनकम टॅक्स वाल्यांची धाड पडली. पहिल्या दिवसापासूनच माझे एक धोरण होते, की अनावश्यक कागदपत्रे साठवून ठेवायची नाहीत.त्यामुळे धाड पडली तरी मला दडपण आले नाही.कपाटाच्या आणि स्टोअरच्या किल्ल्या सरकारी अधिकार्‍यांना देवून मी गप्प बसलो.सकाळ पासून मी किरणची वाट बघत होतोच आता मात्र त्याची अनुपस्थिती ही इष्टापत्तीच वाटली. दुपारी २-३च्या सुमारास किरण आला.त्याने त्रयस्थ भुमिकेतून बाहेरूनच एकंदर आढावा घेतला आणि निघून गेला. सरकारी अधिकार्‍यांचे काम लवकर संपायची चिन्हे दिसेनात, त्यामुळे सरकारी अधिकार्‍याला विचारून सर्व कामगारांना घरी पाठवले.अनावश्यक गर्दी कमी झाल्याने आणि कागदपत्रे क्लियर असल्याने, अधिकारी पण जरा मोकळे झाले. रात्री ९-१०च्या सुमारास त्यांना एक फोन आला आणि आमच्या ऑफीसमधून काही कागदपत्रे घेवून ते निघुन गेले. ते गेल्यावर लगेच किरण आला.तो बहूदा पाळत ठेवूनच असावा.त्याने सांगीतले की अहमदाबाद आणि मुंबईच्या ऑफीसवर पण धाड पडली. किरणनेच ऑफीस बंद केले आणि चाव्या पण त्याच्याच कडे दिल्या. घरी आलो आणि बायकोला सगळे सांगीतले.तिने दुसरी नौकरी शोधायचा सल्ला दिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच किरणची गाठ घेतली.त्याने अजून २ आठवडे तरी ऑफीस बंदच राहील असे सांगीतले.नशीबाने पुढच्याच आठवड्यात वापीला नौकरी मिळाली आणि आम्ही आमचे बस्तान पण वापीला हलवले. वापीला जाण्यापुर्वी परत एकदा किरणची भेट घेतली.त्याला सगळी परिस्थिती सांगीतली.त्याने पण माझ्या भावना ओळखून मला छगनराव आणि कंपनीतून मुक्त केले. पुढे ३-४ महिने मी आणि किरण भेटत होतो.धाडीतून छगनराव सुटले, हे पण मला किरण कडूनच समजले.छगनरावांनी दमणच्या ऑफीसचा चार्ज किरणकडॅच दिला अणि ते मुंबईला निघून गेले. पुढे मी पण वापी-अतुल-चिपळूण-कल्याण-आसनगांव आणि गल्फ अस भटकत राहिलो. ह्या प्रवासात कधी संकटे आली किंवा अडचणी आल्या तर मार्ग मात्र नक्कीच मिळत गेला. नाही म्हटले तरी छगनरावांचे, विपरित परिस्थितीला आटोक्यात कसे आणायचे आणि वेळीच निर्णय घेवून ते अंमलात आणायचे संस्कार, ह्या जन्मात तरी पुसले जाणार नाहीत.

Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग ९)

  • ‹ छगनलालांचे सापळे (भाग ८)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10331 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

आवडेश. मालिका आटोपती

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 13:26 नवीन
आवडेश. मालिका आटोपती घेतल्यासारखी वाटली. आणि संन्यास नं घेता किमान चक्कर टाकुन २-४ खर्डी तरी टाकतं चला :)
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Fri, 02/20/2015 - 20:13 नवीन
शेवट आटोपटता घेतलात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अनपेक्षित शेवट

श्रीरंग_जोशी
Fri, 02/20/2015 - 20:43 नवीन
पूर्वीच्या सर्व भागांत जी उत्कंठा निर्माण झाली होती ती तशीच शिल्लक ठेऊन कथामालिका संपली. प्रत्यक्ष आयुष्यात असे होत असल्याने विचित्र मात्र वाटले नाही. सापळ्यांतून मुक्त झाल्याबद्दल कथानायकाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

शेवट जरा गडबडीत केलात !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 23:14 नवीन
शेवट जरा गडबडीत केलात ! मालिका मात्र चित्तवेधक होती. मोकळा वेळ मिळाला की परत पहिल्यापासून वाचली जाईल. आता नविन लेखनाच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

छान!

रुपी
Sat, 02/21/2015 - 03:24 नवीन
संपूर्ण लेखमाला एकदम वाचली. आवडली!
  • Log in or register to post comments

मालिका

मन१
गुरुवार, 05/12/2016 - 15:48 नवीन
आख्खी मालिका पुन्हा एकदा वाचून काढली. लोकांच्याही वाचणयत यावी म्हणून हा अंक वरती काढत आहे.
  • Log in or register to post comments

उगीच

नमकिन
Sun, 05/15/2016 - 19:10 नवीन
समाजसेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

सीरिज शेवटपर्यंत एकदम वाचली.

गवि
Tue, 08/07/2018 - 15:48 नवीन
सीरिज शेवटपर्यंत एकदम वाचली. फार मजा आली.
  • Log in or register to post comments

संपूर्ण लेखमाला वाचली. भन्नाट

चौथा कोनाडा
Tue, 08/07/2018 - 16:22 नवीन
संपूर्ण लेखमाला वाचली. भन्नाट अनुभव !!
  • Log in or register to post comments

आयला काय पण एकेक माणसे असतात

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 08/07/2018 - 18:44 नवीन
साहेब म्हणजे एक नमुनाच वाटला !! पी एम पी, एम एस इ बी यांचे काँट्रॅक्टरपण असेच असतील का? रस्त्यावर बस बंद पडल्या, ब्रेक फेल झाले , रस्त्यावरच्या दिव्यांचे स्विच खराब झाले, तरी यांचे धंदे मस्तपैकी चालुच. बाकी मालिका मस्त!!पुलेशु
  • Log in or register to post comments

गेल्याच आठवड्यात व्हाअ‍ॅवर

पाषाणभेद
Fri, 12/13/2019 - 15:04 नवीन
गेल्याच आठवड्यात व्हाअ‍ॅवर झालेल्या चर्चेत या धाग्याचा उल्लेख होता. रात्रीच्या रात्री सारे भाग एकापाठोपाठ वाचून काढले. खूप छान लिहीले आहे. फक्त घाईत लिहील्यासारखे वाटले. सापळ्यातून बाहेर आलात ते बरे केलेत.
  • Log in or register to post comments

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. ..

मुक्त विहारि
Fri, 12/13/2019 - 15:27 नवीन
धन्यवाद. ..
  • Log in or register to post comments

काका मुवींचे सर्वोत्कृष्ट लिखाण

जॉनविक्क
Fri, 12/13/2019 - 16:55 नवीन
असेच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वा !

हेमंतकुमार
Fri, 12/20/2019 - 17:26 नवीन
भन्नाट अनुभव !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा