मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमारी मैत्री विश्वास आठवणी

ज्योति अळवणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली ऑफिसची वेळ; नव-याचा डबा... पोरांची शाळा; boss चा चेहरा.. आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े... थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली... निघून गेली दुसरीकडे... जाणवल तिच हिरमुसण फुगण... पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली.. ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती; मी हसले... तशी ती पण हसली... पटकन् जवळ येउन कुशीत शिरली.. 'कळत ग मला तुझ्या असण्याच महत्व... सुटत नाही पण हे संसाराच देण'-- तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटल; Station आल म्हणून स्वतःला आवरल. ती हसली ... समजूतदार आहे पट्ठी तिच हो ती... कुमारी मैत्री विश्वास आठवणी

वाचने 2514 वाचनखूण प्रतिक्रिया 12

जेपी 07/02/2015 - 05:33
शिर्षक वाचुन गोंधळात पडलो... मंजे कुमारी (पद) मैत्री (मुलीचे नाव-आजकाल काय सांगता येत नाय) विश्वास(तिर्थरुप/नवर्याचे नाव) आठवणी (आडनाव) ... *biggrin*

पैसा 09/02/2015 - 15:48
मला कुमार विश्वास माहीत आहेत. हे नवीन काय म्हणून धागा उघडला!