कुमारी मैत्री विश्वास आठवणी
लेखनविषय:
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली
ऑफिसची वेळ; नव-याचा डबा...
पोरांची शाळा; boss चा चेहरा..
आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े...
थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवल तिच हिरमुसण फुगण...
पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण
संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली..
'कळत ग मला तुझ्या असण्याच महत्व...
सुटत नाही पण हे संसाराच देण'--
तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटल;
Station आल म्हणून स्वतःला आवरल.
ती हसली ... समजूतदार आहे पट्ठी
तिच हो ती...
कुमारी मैत्री विश्वास आठवणी
वाचने
2514
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
एक लिंबू झेलू बै........
In reply to एक लिंबू झेलू बै........ by प्रचेतस
=))
In reply to एक लिंबू झेलू बै........ by प्रचेतस
आगोबाच्या डोक्यावर
शिर्षक वाचुन गोंधळात पडलो...
(No subject)
टांगा पलटी घोडे फरार!;)
मी तुमची फ्यान !
मला वाटल कुमार विश्वास वर आहे
आता गोंधळ दुर झाला.
आमास्नी फकस्त पेप्रातलं नंदुरबारचं कुमारी माता प्रकरन ठावं हाय.
देवा...
अरेच्चा!