✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

देवस्थाने आणि भटजी....

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 01/23/2015 - 01:15  ·  लेख
लेख
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव. आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत. आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.) आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते. लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?" असो, पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली. भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर." मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही." गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे." जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती. एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला. गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो. जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली. दक्षिणा विचारली. भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?" मी,"हो." भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील." योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे. डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
44950 वाचन

💬 प्रतिसाद (204)

प्रतिक्रिया

वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे

बॅटमॅन
Wed, 01/28/2015 - 15:12 नवीन
वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तेवढेच का?

पैसा
Wed, 01/28/2015 - 15:41 नवीन
मी तर देवळावरची शिल्पे आणि आतली रचना बघण्यासाठी जाते. त्र्यंबकेश्वरला ते सुद्धा बघायला दिलं नाही दळभद्री लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का?

अर्धवटराव
Wed, 01/28/2015 - 22:53 नवीन
पब्लीकने तेव्हढा कॉमनसेन्स वापरला असता तर त्यातल्या "कॉमन" शब्दावर किती उपकार झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

व्यवहारात कॉमन नसतो कॉमन

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/30/2015 - 11:59 नवीन
व्यवहारात कॉमन नसतो कॉमन सेन्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा