** हा लेख म्हणा, किंवा मदतीचा हात मी मागितला नोव्हेंबरमध्ये. प्रथम मायबोलीवर लिहीला होता, तिथे भरपूर चांगले सल्ले मिळाले.इच्छुकांनी जरूर वाचावेत. मला खूपच आधार व उभारी मिळाली. नोव्हेंबरमध्ये हा लेख लिहीण्याअगोदर ३-४ महिने अजिबातच पॉझिटीव्ह राहायला जमत नव्हते. खूप काळजी, स्ट्रेस सतत. कोणाशी हसून खेळून बोलणं अगदीच बंद झाले होते. मात्र ही मदत मागितली, खुलेपणाने जवळच्या मैत्रिणी व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यासर्वांवर विचार करून, मी गेले दोन-तीन महिने सातत्याने पॉझिटीव्हच विचार करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात सार हेच, आपण आपल्या हातात जे आहे ते करत राहायचे. भविष्याच्या काळजीने हातपाय गाळले तर मुलाचेच नुकसान आहे. आता हा लेख तितका रिलेव्हंट वाटत नाही कारण मनाची तितकी वाईट अवस्था नाही. परंतू जितके वेगळे सल्ले व वेगळा पर्स्पेक्टीव्ह मिळेल तितकं माझ्यासाठी व मुख्यत्वेकरून मुलासाठी फायद्याचे असल्याने येथेही मदत मागते. :) **
_________________________________________________________________________________
मी आज कुठलेही ऑटीझमसंबंधित उपदेश करणार नाही तर मलाच थोडी मदत हवी आहे. आशादायी दृष्टीकोन ठेवण्यासाठी. कराल का?
झालंय असं, की मुलाच्या वय वर्षे २ पासून ऑटीझमशी झुंज देऊन जरा थकायला झाले आहे आता. हे सर्व किती दिवस चालणार, मुलगा कधी बोलणार अशा प्रश्नांनी आता २ वर्षं भंडावून सोडले आहे. आत्ता लिहीताना मला जाणवलं, २च वर्षं झाली या सगळ्याला? पण ७३० दिवस गुणीले २४ तास असं म्हटलं की जाणवते थकण्याची इंटेसिंटी.
दिवसाची सर्व कामे सुरळीत पार पडतातच, मुलाबरोबर हसतमुखाने दंगा केला जातोच, त्याचे जेवण-खाण आजारपण त्यात मी कुठेही कसूर होऊ देणार नाही. (बिलिव्ह मी, ऑटीझम आणि आजारपण = वर्स्ट काँबिनेशन! एरवी मुलं गृहीत धरतातच पालकांना परंतू माझा मुलगा आजारी पडला की माझी शब्दशः कसोटी असते. त्याची चिडचिड कमालीची वाढते व आपण शांत राहून त्याला काय होत असेल हे गेस करत राहणं = बॅटल.)
डोक्यात, मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला. परंतू बंद पडलेल्या गाडीला किकस्टार्ट देऊन जोमाने पळवायचे आहे. त्यासाठीच मदतीचे आवाहन.
आपण या पानावर आशादायी, ऑप्टीमिस्टीक, पेशन्स, जिद्द, हार्डवर्क इत्यादींबद्दल पोस्ट्स एकत्र करायच्या का? असं काहीतरी जे वाचून आमच्यासारख्या स्पेशल नीड्स मुलं असलेल्या पालकांना उभारी येईल. कारण पॉझिटीव्ह अॅटीट्युड हा एकच लाकडाचा ओंडका आम्हाला ऑटीझमच्या समुद्रात जरा तरंगत ठेऊ शकतो..आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे. जमल्यास आपण सर्वांनी मिळून तराफा बनवायचा का?
वाचने
6381
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हीच शेअर केलेल्या
(No subject)
In reply to तुम्हीच शेअर केलेल्या by अनन्त अवधुत
बर्याचशा गोष्टी मान्य....
मिपाकर व्हा, इथले एक-से बढ़कर एक लेख वाचा,
In reply to बर्याचशा गोष्टी मान्य.... by मुक्त विहारि
इतरांच्या अनुभवाचे माहीत नाही पण एक वैयक्तिक अनुभव सांगतो....
In reply to मिपाकर व्हा, इथले एक-से बढ़कर एक लेख वाचा, by अर्धवटराव
आमचे २ पैसे..
In reply to इतरांच्या अनुभवाचे माहीत नाही पण एक वैयक्तिक अनुभव सांगतो.... by मुक्त विहारि
तुम्ही म्हणता ते खरे आहे.
In reply to बर्याचशा गोष्टी मान्य.... by मुक्त विहारि
धन्यवाद. सर्व मराठी साईट्सवर
नामदेव ,गोरा कुंभार ,सावता
In reply to धन्यवाद. सर्व मराठी साईट्सवर by स्वमग्नता एकलकोंडेकर
ह्म.... काय टेन्शन लेने का नय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }तुम्ही जर भारताबाहेर रहात
अॅक्चुअली, मुलाची शाळा खूप
In reply to तुम्ही जर भारताबाहेर रहात by स्पंदना
हे त्याच फ्रस्ट्रेशन आणि अ
In reply to अॅक्चुअली, मुलाची शाळा खूप by स्वमग्नता एकलकोंडेकर
मलाही अगदी हेच आठवलं. अ
In reply to तुम्ही जर भारताबाहेर रहात by स्पंदना
मला ह्या क्षेत्रात थोडासा
हतबद्ध.
चित्रपटातले काही प्रसंग
सगळ्यांनी छान सल्ले दिले आहेत
तुमच्याकडे दिवसाकाठी सहा तास
मध्यंतरी आमच्या बाबतीत थोडी
सगळ्यात महत्त्वाचं
ऑटीझमबद्दलचे तुमचे प्रत्येक