बस्स इतकेच..
तुझ्यापासून दूर होऊन
अमाप काळ लोटला
दु:ख हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच..
----
आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला
तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं
फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत
जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले
बस्स इतकेच..
----
परवा अलमारी उचकतांना
तुझे एक पैंजण हाताला लागले
छन्न झालं एकदम
आपल्या जोडीदाराअभावी
एकाकी,केविलवाणे वाटले
बस्स इतकेच..
----
तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला
'त्या' तस्बिरीतले
तुझे डोळे
आणि त्या डोळ्यातले ते काजळ..
बघता बघता कां कोण जाणे
टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम
बस्स इतकेच..
----
तुझी आठवण आजही येते
अगदी नित्यनेमाने
काही ठोके चुकतात
परत मार्गी लागतात
बस्स इतकेच..
पण तू गेलीस तेव्हाचे चुकलेले
चुकार ठोके अजुनही परतलेले नाहीत
बस्स इतकेच..
----
हम्म.. दु:ख हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच.. इतकेच...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१०/१२/२०१४)
अप्रतिम !
क्या बात है मिका.
हेच म्हणतो !
अप्रतिम
अप्रतिम
छळ मेल्या छळ!
मि.का. .... बस्स इतकेच!
छान जमलीय
तुझ्यापासून दूर होऊन
मदनबाण.....
आजची बदलेली स्वाक्षरी :- Chamak Cham Cham... { Sitaron Mein Tu Hi :-Yesudas }+१११११
एकदम मस्त आहे भावकाव्य
मस्त...
अगदी मनातलं मांडलंत !!
आवडली .
+१
सहमत!
आवडली रे, बर्याच दिवसांनी एक
मिक्स!!!
फार सुंदर..
क्या बात हे
मिका अगदी खरं...
मस्त रे मिका
सुरेख!
अप्रतिम!बस्स इतकंच.
छे छे..
मिका रॉक्स,
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा
कविता आवडली.
छान ... आवडली कविता
सुंदर कविता
उत्कृष्ट !!