✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जादूगार डाइनमो

क
कंजूस यांनी
Mon, 12/08/2014 - 13:35  ·  लेख
लेख
ब्रैडफॉर्ड इंग्लडचा लोकप्रिय जादूगार DYNAMO याचे जादूचे प्रयोग HISTORY TV CHANNEL 18 वर दाखवतात. युट्युबवरही पाहता येतात. आतापर्यँत चौदा मोठे शोज झाले आहेत. त्याच्या गाजलेल्या जादूंमध्ये या आश्चर्यकारक ठरल्या आहेत: १)थेम्स नदीवर चालणे. २)कागदाची फुलपाखरे जिवंत करणे. ३)रिओ डि जाने मध्ये हवेत उडणे. ४)टाईम्स स्क्वेअरमध्ये एकाच वेळी एकाच नंबरवरून शेकडो लोकांना कॉल येणे. ५)कारंज्याचा पाण्याचा बर्फ करणे. तुम्ही या डाइनमोचे कार्यक्रम पाहिलेत का ? मागच्या वर्षी तो वाराणसी आणि धारावीत येऊन गेला होता . आता क्रिसमसला नवीन शो दाखवतील असे वाटते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12659 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

वाराणसी आणि धारावी? काय रेंज

बोका-ए-आझम
Mon, 12/08/2014 - 14:08 नवीन
वाराणसी आणि धारावी? काय रेंज आहे बा प्रेक्षका!
  • Log in or register to post comments

हो बघिलेत आणि भारतात (वाराणसी

प्रमोद देर्देकर
Mon, 12/08/2014 - 14:10 नवीन
हो बघिलेत आणि भारतात (वाराणसी/धारावी) आलेला तेव्हा ऊदबत्ती काडेपेटी शिवाय पेटवली होती ते पाहिले. काही प्रयोग हातचलाखी तर काही रासायनीक अभिक्रिया (आग लावणे) प्रकार वाटतात.
  • Log in or register to post comments

थक्क करणाऱ्या ट्रिक्स असतात

प्रसाद प्रसाद
Mon, 12/08/2014 - 14:12 नवीन
थक्क करणाऱ्या ट्रिक्स असतात डायनॅमोच्या. घरात आवर्जून हा कार्यक्रम पाहिला जातो.
  • Log in or register to post comments

DYNAMO याचे जादूचे प्रयोग ह्या अर्ध्या कॅमेरा ट्रिक्स असतात

निखिल_जाधव
Mon, 12/08/2014 - 17:10 नवीन
DYNAMO याचे जादूचे प्रयोग ह्या अर्ध्या कॅमेरा ट्रिक्स असतात, खूप कमी तो आक्चुयल ट्रिक्स करतो, बाकी लोक वीडियो ट्रिक्स जास्त आहेत,बाकी मार्केटिंग छान आहे as a professional in magic field मला त्या पेक्षा इंडियन मेजीशियन च्या ट्रिक्स जास्त आवडतात. खूप दिवसा पासून मी पा वाचतो, पण कधी live disscuession मधे भाग घेतला नाही. हा विषय माझा जिवाल्या आहेय म्हणून प्रतिसाद, मराठी जास्त नाही टाइप करत, so got some mistakes , सो शमस्व
  • Log in or register to post comments

पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला

कंजूस
Mon, 12/08/2014 - 18:55 नवीन
पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला आहे का ?
  • Log in or register to post comments

पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला ????

निखिल_जाधव
Mon, 12/08/2014 - 19:14 नवीन
आपल्या कडे जास्त मॅजिक शो हे स्टेज मॅजिक शो असतात. out of india जास्त लोक हे स्ट्रीट मॅजिक ह्या प्रकारात इंट्रेस्टेड असतात. walking on water हा स्ट्रीट मॅजिक ह्या प्रकारात मोडतो. भारतात हा प्रकार काही लोक करतात, बाकी जास्त लोक हे स्टेज मॅजिक ला प्रेफरेन्स देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अहो एक जोक आठवला मला वाटत रामक्रुष्ण परमहंसांचा आहे

मारवा
Mon, 12/08/2014 - 19:26 नवीन
एका योग्याने पाण्यावर चालुन काहितरी दाखवल म्हणे बरीच वर्ष तपस्या करुन साधना वगैरे मग गंगेच्या इकडुन तिकडे कायतरी गेला मग राप म्हणाले दोन रुपयात ( आता भाव माहीत नाही तेव्हाचा समजा) नावाडि पार करतो मग काय इतकी वर्ष घालवायची सहज आठवल जादुगारांविषयी लय आकर्षण आहे पी.सी.सरकार ने ट्रेन गायब केल्याच आठवतय कुठेतरी वाचलेल तोहि बंगालीच
  • Log in or register to post comments

डाइनमोने वाराणसीत गंगेची आरती

कंजूस
Mon, 12/08/2014 - 21:01 नवीन
डाइनमोने वाराणसीत गंगेची आरती (पाण्यात शेकडो दिवे पेटवून दाखवले )करून दाखवली मी म्हणतो की घ्या पाचपन्नास हाईटेक व्हिडिओ कैमरे ,टेक्निशन आणि दाखवा करून ही जादू. करमणूक करायची आहे अध्यात्म ठेवू थोडा वेळ बाजूला. आणा आपलं पुष्पक विमान. लावा आपले आइआइटीचे एंजिनिअर कामाला. होऊन जाऊ दे धमाल.
  • Log in or register to post comments

नाय ना राव....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/08/2014 - 21:08 नवीन
च्यायला, डायनमो उर्फ स्टीव्हन फ्रेन याने भारतातही धुमाकुळ घातलाय. एक पणती पाण्यात सोडुन असंख्य पणत्या पाण्यावर तेवत दिसणे हा प्रयोग मला भन्नाट वाटला. आता कसं काय वगैरे, आपल्याला काय करायचं म्हणुन सोडून दिलं. पण, खरंच ही जादू तो कसं करतो हे कोडं कोणी उलगडून दाखवलं तर ते समजुन घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काही काळा पूर्वी पाहिलेला

मदनबाण
Mon, 12/08/2014 - 22:08 नवीन
काही काळा पूर्वी पाहिलेला खालील व्हिडीयो :- बाकी Darcy Oake's चा खालील व्हिडीयो देखील पाहिला विसरु नका :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Why The U.S. Won’t Give Germany Their Gold Back
  • Log in or register to post comments

व्हिडिओ ट्रिकच्या आक्षेपाला

कंजूस
Mon, 12/08/2014 - 22:17 नवीन
व्हिडिओ ट्रिकच्या आक्षेपाला उद्देशून आहे की होऊन जाऊ द्या एक स्ट्रीट शो. काय वाटेल ती साधने वापरा आणि येऊ द्या हव्वा.
  • Log in or register to post comments

जादूगार आणि जादू...

मुक्त विहारि
Mon, 12/08/2014 - 22:37 नवीन
खरे तर हातचलाखीच. पण माणसे भुलतातच. "प्रेस्टीज" असू दे किंवा "हॅरी पॉटर" किंवा "अल्लाउद्दीनचा दिवा". असो, माझ्या मते जादू बघायची आणि मनोरंजन करायचे आणि सोडून द्यायचे.जादूच्या मागचे रहस्य समजले की, जादूची मजा गेली. बाद्वे, आमची बायको ह्या जगातील सगळ्यात मोठी जादूगार. कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे काय चमकावते, अचानक आमच्या कपाळावर टेंगूळे काय उगवतात, मनातले सुप्त भाव ओळखण्यात तर तिचा फार हातखंडा आहे.
  • Log in or register to post comments

कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर

मारवा
Mon, 12/08/2014 - 23:35 नवीन
कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे काय चमकावते, अचानक आमच्या कपाळावर टेंगूळे काय उगवतात, मनातले सुप्त भाव ओळखण्यात तर तिचा फार हातखंडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुक्त विहार करतांना कल्पनेच्या विश्वात म्हणतोय मी

मारवा
Mon, 12/08/2014 - 23:39 नवीन
मनातले सुप्त भाव ओळखण्यात तर तिचा फार हातखंडा आहे. मला तुमच्याविषयी सहानुभुती दाटुन आलीय मुवि जी कारण अस जर असेल तर मुक्त विहार करतांना (कल्पनेच्या विश्वात म्हणतोय मी ) किती अडचणी येत असतील तुम्हाला याची मला कल्पना देखील करवत नाही.\ प्रचंड सहानुभुती मुवि तुमच्याविषयी वाटतेय भगवान दुष्मन के साथ भी एसा ना हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

बाय द वे तुमची आवडती गाणी कदाचित हि असतील का ?

मारवा
Mon, 12/08/2014 - 23:47 नवीन
एक आपला अंदाज लावतोय बसल्या बसल्या १- तेरा जादु चल गया... २- आखो से तुने जो क्या कह दिया ३- मेरे दिल मे आज क्या है तु कहे तो मै बता दु ( याची बहुधा गरजच पडत नसावी ) अजुन एक शंका समजा तुम्ही हे गाण मनातल्या मनात गुणगुणत असाल तर काय होइल ? म्हणजे तुम्ही कधी चिडुन मनातल्या मनात हे गाण गुणगुणतात का ? समजा एक प्रत्युत्तर म्हणुन संताप म्हणुन कई बार यूँ भी देखा हैं ये जो मन की सीमा रेखा हैं, मन तोड़ने लगता हैं अनजानी प्यास के पीछे , अनजानी आस के पीछे, मन दौड़ने लगता हैं ह्.घ्या मुवि सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

ह्.घ्या मुवि सर

मुक्त विहारि
Tue, 12/09/2014 - 00:30 नवीन
अहो, अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात.निदान मी तरी घेत नाही. आणि क्रुपया मला "मुवि"च म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

डेव्हीड ब्लेन एक आहे जबरदस्त जादुगार

मारवा
Mon, 12/08/2014 - 23:08 नवीन
पण जादुगार पेक्षा एन्ड्युरन्स आर्टीस्ट म्हणुन तो जास्त आहे जादु पण करतो पण स्ट्रीट मॅजिक करतो हलक्या फुलक्या फार ग्रेट जादुगार नाही पण ग्रेटेस्ट एन्ड्युरन्स आर्टीस्ट म्हणता येइल. म्हणजे जे काय केल आहे ते मला वाटत भुतलावर अजुन कोणी केल नसाव १- फ्रोजन इन टाइम मध्ये बर्फाच्या आत सलग ६३ तास २- एका १०० फुट उंचीच्या पिलरवर ३५ तास सलग उभा राहुन मग जंप ३-४४ दिवस सलग अन्ना विना फक्त पाण्यावर एका ग्लास च्या कॅबिन मध्ये (थेम्स नदिवर टांगलेल्या) फक्त साडेचार लीटर पाणी रोज प्यायचा एक वेबकॅम सर्वांसमोर बिलकुल ओपन ४-एकदा इलेक्ट्रीफाइड चा एक शो केला कीतीतरी व्होल्ट्स च्या इलेक्ट्रीक फिल्ड मध्ये फारच भयंकर मनुष्य याची डिटेल खुप आहेत इथे वाचा http://en.wikipedia.org/wiki/David_Blaine#Street_Magic_and_Magic_Man
  • Log in or register to post comments

रॉय बॉमिस्टर च्या पुस्तकात ब्लेन वर एक छान प्रकरण आहे

मारवा
Mon, 12/08/2014 - 23:33 नवीन
रॉय एफ़ बॉमिस्टर या प्रख्यात संशोधकाच एक पुस्तक वाचल होत विलपॉवर- रीडिस्कव्हरींग द ग्रेटेस्ट ह्युमन स्ट्रेंथ नावाच. यात विलपॉवर वरील अत्यंत सायंटीफ़ीक रीसर्च दिलेल आहे. त्यात त्यांनी डेव्हीड ब्लेन च एक विश्लेषण दिलेल आहे त्याची फ़िलॉसॉफ़ी त्याने दिलेली आहे. त्याच एक कोट आहे: द मोअर द बॉडी सफ़र्स द मोअर द स्पीरीट फ़्लॉवर्स : ते त्याने कॊणा संताच आहे त्यावरुन घेतलय त्या पुस्तकात एक्स्ट्रीमली इंटरेस्टींग वर्णन आहे तो कस करतो हे सर्व साध्य बॉमिस्टर ने त्याच्याशी चर्चा केली होती खुप इन्सपायरींग मोटीव्हेटींग आहे. पण अर्थात हा मॅजिशियन म्हणुन ग्रेट नाही. धाग्याचा मुख्य विषय जो जादुगार आहे त्यात याला फ़ारस स्थान नाही. थोडा वेगळा टाइप आहे. पण या माणसाच एन्ड्युरन्स हिच एक जादु वाटते मला एन्ड्युरन्स ला चांगला मराठी शब्द म्हणजे सहनशीलता किंवा सहनसीद्धि कसा वाटतो.?
  • Log in or register to post comments

नवीन चांगल्या लिंक मिळताहेत

कंजूस
Tue, 12/09/2014 - 06:56 नवीन
नवीन चांगल्या लिंक मिळताहेत कालच एका माणसाने अनाकोंडा सापाकडून खाववून घेतले आणि एक तासाने बाहेर आला ऐकलं सगळं शूट केलंय आता इकडे भारतात लग्नानंतर 'अनाकोंडा'च्या विळख्यात आयुष्यभर अडकूनही किती हसतमुख राहतात ,गाणी गातात ,अनाकोंडाची
  • Log in or register to post comments

अजगर एखाद्याला गिळल्यावर

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 08:31 नवीन
अजगर एखाद्याला गिळल्यावर शरिराचे वेटोळे करुन खाल्लेल्या प्राण्याची हाडे मोडतो...१ तासाने माणूस बाहेर येऊच शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अजगर आणि अ‍ॅनागोंडा...

मुक्त विहारि
Tue, 12/09/2014 - 10:05 नवीन
हे दोन वेगळे वेगळे सर्प जमातीतले प्राणी असावेत... (मोगँबो खूष हुवा....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अ‍ॅनाकोंडा ही अजगर

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 10:07 नवीन
अ‍ॅनाकोंडा ही अजगर प्रजातीतलीच १ शाखा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पण....

मुक्त विहारि
Tue, 12/09/2014 - 10:09 नवीन
अजगर म्हणजे अजगरच... त्याला अ‍ॅनागोंडाची सर (आपली शरीरयष्टी...आपले ते कात....) कुठून येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

स्तुती करतात Unsung Heros एक

कंजूस
Tue, 12/09/2014 - 06:59 नवीन
स्तुती करतात Unsung Heros एक दुर्लक्षित जमात(जामात).
  • Log in or register to post comments

जादू ची रहस्य सांगितली की त्याची मजा निघून जाईल

निखिल_जाधव
Tue, 12/09/2014 - 13:50 नवीन
जादू ची रहस्य सांगितली की त्याची मजा निघून जाईल. भूलवते ती जादू. अर्थात ज्याना हवे ते गूगलून बघू शकतात. revelaed secrets सर्च केले की मिळेल सगळे.
  • Log in or register to post comments

इंडियन रोप ट्रिक

सिरुसेरि
Tue, 12/09/2014 - 20:10 नवीन
द ग्रेट इंडियन रोप ट्रिक ही तर कितीतरी काळापासून फक्त भारताची मक्तेदारी आहे . पाश्चात्य लोकांना त्याचे खुप कुतूहल आहे .
  • Log in or register to post comments

द ग्रेट इंडियन रोप ट्रिक

कपिलमुनी
Wed, 12/10/2014 - 11:43 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

या चित्रफितीमधे १:२३ ला

खटपट्या
Wed, 12/10/2014 - 12:24 नवीन
या चित्रफितीमधे १:२३ ला जादुगाराचा सहाय्यक गारूडी काय करतो ते बघा. तो ती मोठी टोपली मैदानाच्या मध्यावर आधीच केलेल्या छीद्रावर ठेवतो. ते छीद्र आधी दीसू नये म्हणून त्यावर फुले ठेवलेली असतात जी तो बाजूला करतो.आणि पटकन त्यावर टोपली ठेवतो. आणि मग पुढे काय होते ते तुम्ही पाहीलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

काय म्हणता ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/10/2014 - 19:49 नवीन
जमीनीतून कोणी वर हा बांबू ढकलतोय हे मात्र तितकं स्पष्ट होत नै ये ना ? अजून उलगडा केला पाहिजे या ट्रीकचा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नक्कीच कोणीतरी खालून ढकलत

खटपट्या
Wed, 12/10/2014 - 23:03 नवीन
नक्कीच कोणीतरी खालून ढकलत असणार. जमीनीच्या ज्या भागाला कुंपण घातलंय त्या भागातील मातीचा रंगही वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान धागा !

धर्मराजमुटके
Wed, 12/10/2014 - 11:55 नवीन
छान धागा ! जादूची आवड असलेल्यांसाठी The Prestige (2006) हा इंग्रजी चित्रपट आवर्जून बघावा असे सुचवेन. चित्रपट संथ आहे आणि जादूच्या फार काही ट्रिक्स नाहियेत. पण एका जादूगाराची मानसिकता त्यात फार सुंदर रितीने उलगडून दाखविलेली आहे.
  • Log in or register to post comments

http://www.imdb.com/title

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 12:12 नवीन
http://www.imdb.com/title/tt1670345/ हा पण मस्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

धन्यवाद

धर्मराजमुटके
Wed, 12/10/2014 - 13:04 नवीन
आजच बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ही सुचविलेला चित्रपट पाहिला

धर्मराजमुटके
Wed, 12/10/2014 - 17:13 नवीन
तुम्ही सुचविलेला चित्रपट पाहिला. एकदम जबरा. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 19:29 नवीन
\m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

आता मुख्य मुद्द्याकडे वळतो

कंजूस
Wed, 12/10/2014 - 12:18 नवीन
आता मुख्य मुद्द्याकडे वळतो -याच जादू करणारा भारतात असता आणि त्याने स्वत:ला अवतार रूपात लोकांसमोर सादर केले असते तर काय उलथापालथ झाली असती!
  • Log in or register to post comments

पहिला हवा हा शो काहीतरी वेगळे

निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/11/2014 - 02:00 नवीन
पहिला हवा हा शो काहीतरी वेगळे पाहण्यास बरे वाटेल. अनेकोंडा चा स्टंट पाहिला. जबरी आहे/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा