मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खटाटोप

Yash · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सरत चालली संध्याकाळ, कामातून निघत नाही वेळ... कसा काढावा येथून पळ, घरी वाट बघे छोटा बाळ... ही सांज भारी खट्याळ, पुढे सरकत नाही घड्याळ... पोटासाठी चालली सर्व धावपळ, झाला चैनीच्या वस्तूंचा सुकाळ... आप्तजनांशी नाही मेळ, कसा हा सर्व खेळ... गणित चुकले जीवनाचे.. नाही कसला ताळमेळ, अंधारातून चालतो आहे.. कधी होईल सकाळ..!!

वाचने 2963 वाचनखूण प्रतिक्रिया 17

विवेकपटाईत Mon, 12/08/2014 - 20:27
मस्त आवडली. कार्यालयातून परतताना, ट्रफिक मध्ये बस अडकलेली, घरी उशीर होणार, त्या वेळी स्त्रियांची आपल्या छोट्या पिल्लांना भेटण्याची तळमळ त्यांच्या डोळ्यांत दिसते.