Skip to main content

खटाटोप

लेखक Yash यांनी रविवार, 07/12/2014 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
सरत चालली संध्याकाळ, कामातून निघत नाही वेळ... कसा काढावा येथून पळ, घरी वाट बघे छोटा बाळ... ही सांज भारी खट्याळ, पुढे सरकत नाही घड्याळ... पोटासाठी चालली सर्व धावपळ, झाला चैनीच्या वस्तूंचा सुकाळ... आप्तजनांशी नाही मेळ, कसा हा सर्व खेळ... गणित चुकले जीवनाचे.. नाही कसला ताळमेळ, अंधारातून चालतो आहे.. कधी होईल सकाळ..!!
लेखनविषय:

वाचने 2968
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मस्त लिहलय !!!

मला कायम रगडा त्याला मात्र भेळ त्याला तेवढा आंबा मला मात्र केळ?? :( -षेश.

मस्त आवडली. कार्यालयातून परतताना, ट्रफिक मध्ये बस अडकलेली, घरी उशीर होणार, त्या वेळी स्त्रियांची आपल्या छोट्या पिल्लांना भेटण्याची तळमळ त्यांच्या डोळ्यांत दिसते.

सत्य परिस्थिती वर्णन केली आहे. "हिरकणी" च आठवली मला.