✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या नालायकांना अटकाव कसा करायचा

ग
गणा मास्तर यांनी
गुरुवार, 08/07/2008 - 08:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29261 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

येकदम

धमाल मुलगा
Fri, 08/08/2008 - 14:41 नवीन
येकदम शिवसेना ष्टाइल....
हे लय भारी :)
कानशीलं शेकवताना लाल फित नसते वाटतं.
तेव्हामात्र आडवी येत नाही..खाकी ची कृपा. त्यांच्याशी आधीच विचारविनिमय करुन पाऊल उचलल्यावर लाल फित आडवी येत नाही. आणि जर कुठे येण्याची शक्यता असेलच, तर आमच्या त्या गृपमधले २ वकील कायदेशीर बाबी सांभाळून कृती करायचे सल्ले देत.
तुमचे विचार चांगले असतील हो... पण तुमच्या पावलावर पाउल ठेवून आलेल्या स्वंयघोषीत संस्कृतीरक्षकांची जबाबदारी कोण घेणार. मी बोलेल तीच संस्कृती,मी बोलेल तेच योग्य...यापेक्षा वेगळे काय असेल?
पंकजराव, हे मात्र अगदी १०१% खरं. ह्याचाच त्रास व्हायला लागून पुढे आमची ही मोहीम आम्ही बंद केली. स्वतःला काडीचा फायदा नसताना, खिशातले पैसे घालुन पेट्रोल जाळून तिथे जायचं,आणि करुन सवरुन पुन्हा वर, स्वतःच्या पोटातलं पाणीही न हलवता शिव्यांची लाखोली वाहणार्‍यांच्या आणि आमच्या कामाचीही तुलना पुंडाईशी करणार्‍या संभावित पांढरपेशी 'आपल्याच' लोकांचा त्रास सहन करायचा ह्याला विटलो आणि सरळ डोळ्यावर कातडं ओढून घेतलं. आणि अंशतः कारवाई चालू झाल्यापासून ह्या फुकटच्या उस्तवारीशी फारकत घेतली. आता सरकार, दारुडे, जोडपी आणि अजुन कोणी असतील ते...जो गोंधळ घालायचा तो घालुदे... चुकुन माकुन कधी गेलोच गडावर, तर आम्हीही जे चाललंय ते मिटक्या मारत पाहू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

आपल्या जबाबदर्‍या

पंकज
Fri, 08/08/2008 - 16:11 नवीन
तेव्हामात्र आडवी येत नाही..खाकी ची कृपा. त्यांच्याशी आधीच विचारविनिमय करुन पाऊल उचलल्यावर लाल फित आडवी येत नाही. आणि जर कुठे येण्याची शक्यता असेलच, तर आमच्या त्या गृपमधले २ वकील कायदेशीर बाबी सांभाळून कृती करायचे सल्ले देत. खाकी आणि वकिल गडाच्या विकासाकरता मदत करत नाहीत हे बरेच झाले. असो. समजावून सांगणे वा समाजात जागृती करणे हे वेळखाउ पण परिणामकारक काम आहे. त्यामानाने कानशीलं शेकवणे हे तकलादू व तात्पुरता उपाय आहे असं मला वाटतं. आपल्या जबाबदर्‍या, आपले कर्त्यव्य व आपले हक्क काय याचे शिक्षण व प्रात्यक्षिक लहानपणापासून दिले गेले पाहिजे. "रस्त्यावर थुंकू नये" हे मी करू शकतो परंतू दुसरा कोणी थुंकत असेल तर त्याला तसे करू नको हे सांगण्याचे काम प्रत्येकानेच केले पाहिजे. "रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?" या प्रश्नाला कसे हाताळायचे याचे शिक्षण दिले गेले पाहिजे. Career guidance प्रमाणे असे वर्ग काढता येऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आता बदलून

गुंडोपंत
Fri, 08/08/2008 - 11:49 नवीन
चर्चा वाचली. आता 'या' नालायकांना अटकाव कसा करायचा असे शीर्षक द्या! कारण हे खरे ना लायक! यांनी नको तिथे जावून मारामार्‍या केल्या. भलत्याच लोकांना हाणले ते पण त्यांना वाचवणारे तेथे कुणी नसतांना! वर अशा ठिकाणांची शांतता घालवून म्हणणार की पावित्र्य टिकवले? पावित्र्य टिकवायला तुम्ही कोण आले पवित्र? काय पात्रता? मी पण लै पाहिलेत असले वीर! एकदा हे असलेच संस्कृती रक्षक (!) पांडवलेण्याला पोरा पोरींना कोपर्‍यात गाठून सकाळी सकाळी त्रास देत होते. मी मध्ये पडलो तर मला म्हणतात "आय टकल्या, तुला माज आला का?" मी म्हंटलं "हो! खाऊन खाऊन माजलेलोच आहे." आणि हाणले एका संस्कृती रक्षकाला धरून. तर बाकीचे वीर चक्क पळून गेले! ती पोरगी पण असली जबरी! तीने त्यांच्या मागे धावून एकाला धरले आणि अजून दोन कानफटात दिल्या. त्या तो संस्कृती रक्षक अचानक पणे तीचा भाऊ बनून "नको ना ताई आता परत नै ना!" "तुमी कदी पन या ना इकडे, आमी आता कदीच येनार नै ना!" वगैरे करायला लागला. मी म्हंटलं चल आता देतो तुला अंबड पोलिस स्टेशन जमा करून. अक्षरश: माझ्या त्या पोरीच्या आणि पोराच्यापण पाया पडला तो आणि पळून गेला. त्या युगुलाला विचारलं कसं काय आहे सगळं ते. दोघे ही चांगले होते. इंदिरा नगर ला रहायचे आणि सकाळी सकाळी रोज चालायला म्हणून पांडवलेण्याला यायचे. यात कसले पावित्र्य भंग होत होते? अरे एकट्या दुकट्याला गाठून कसले मारता रे? असले तर हे संस्कृती रक्षक वीर! त्रंबकचा पण एक किस्सा आहे, तो सांगेन कधी तरी नंतर. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

गुंडोपंत,

धमाल मुलगा
Fri, 08/08/2008 - 15:17 नवीन
गुंडोपंत,
नको तिथे दारू पिवून धिंगाणा करणार्‍यांना, मुली बायकांना त्रास देणार्‍यांना मात्र धम्याचाच मार्ग योग्य आहे. आणि त्याला माझा १००% पाठिंबा आहे आणि राहिल.
धन्यवाद. आता वळुया तुमच्या दुसर्‍या प्रतिसादाकडे.
एकदा हे असलेच संस्कृती रक्षक (!) पांडवलेण्याला पोरा पोरींना कोपर्‍यात गाठून सकाळी सकाळी त्रास देत होते.... ...असले तर हे संस्कृती रक्षक वीर!
हे खरे संस्कृतीरक्षक होते की कातडं पांघरलेले संस्कृतीभक्षक बुभुक्षित लांडगे? हाताची पाचही बोटं सारखी असतात का? नाही ना? मध्ये बर्‍याच बातम्या यायच्या, "खडकवासला धरणापाशी पोलीस असल्याचे भासवून जोडप्यांना लुटले", "पुणे विद्यापीठात पोलीस असल्याचे भासवून बलात्कार" इ.इ. मग हे खरे पोलीस होते का? नाही ना?
यांनी नको तिथे जावून मारामार्‍या केल्या. भलत्याच लोकांना हाणले ते पण त्यांना वाचवणारे तेथे कुणी नसतांना!
माझा वरचा प्रतिसाद बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की, भलत्याच लोकांना मारलेले नाही. नको तिथे जाऊन मारामार्‍या ह्या शेवटचा पर्याय म्हणून कराव्या लागल्या.
पावित्र्य टिकवायला तुम्ही कोण आले पवित्र? काय पात्रता?
किमान, ज्या अयोग्य गोष्टी आपण करत नाही आहोत त्या रोखण्याची पात्रता असु शकत नाही काय? आता योग्य आणि अयोग्य हे कोणि ठरवायचे असाही प्रश्न उद्भवू शकतोच. तर सारासार विचारशक्तीला साक्षी ठेऊन सद्सदविवेकबुध्दीला जे खटकतं ते अयोग्य. आपल्या बरोबर असलेल्या माय बहिणींना ज्या उघड गोष्टींमुळे लाजेने मान खाली घालावी लागेल ते अयोग्य. आपल्या अनुभवातले 'संस्कृतीरक्षक' जर योग्य हेतुने फिरत असते, तर नक्कीच हे घडले नसते. काय त्यांच्याबरोबर ह्या कामासाठी कॉलेजात शिकणार्‍या मुली, काही विवाहित स्त्रियाही फिरत होत्या? आमच्या बरोबर नेहमी असायच्या. त्यामुळे जरी कोणाला तुमच्या वरच्या अनुभवाप्रमाणे करावसं वाटलंच तरी ते करणं, म्हणजे आपल्याच सोबत्यांकडून मार खाणं हे माहित असल्याने आणी मुळातच तसे हेतु मनात नसल्याने अशा प्रकारच्या गोष्टी होत नसत, ह्याची नोंद घेण्यासारखी. गल्लीतल्या गुंडगिरीचा फायदा घेऊन / राजकिय पक्षाच्या आशिर्वादाने ह्या कामास सुरुवात करुन त्याला घॄणास्पद रुप देणारे हे देहान्त प्रायश्चित्त देण्याच्या लायकीचे आहेत असं माझं वैयक्तिक (आणि टोकाचं म्हणा हवंतर) मत आहे. आम्हालाही व्यक्तिस्वातंत्र्याचा पुर्ण आदर आहेच, पण सार्वजनीक ठिकाणी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असा अर्थ जर ध्वनीत होत असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

वरिल एका

मराठी_माणूस
Fri, 08/08/2008 - 12:25 नवीन
वरिल एका प्रतिसादात असे म्हटले आहे अशी काही स्थळे आहेत ज्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यांचा आदर करायलाच हवा. हे म्हणणे एकदम बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की अशा जागा मधे काहि जागा राजकारणा मधिल पण आहेत. ह्या जागी स्वातंत्र्या पुर्वी आणि नंतर पण काहि वर्षे फार चांगलि, त्यागी , लोकाबद्दल कळकळ असलेलि माणसे होति , त्या जागेवर आज कोण आहेत आणि ते काय चाळे करत आहेत ते दिसत नाहि का ? त्याना शिक्षा करण्याचे धाडस का होत नाहि ? आणखी एक , ह्या नेत्यांचे मोठेपण म्हणजे , त्यांच्या एका शब्दाखातर लोक काहिहि करायला तयार व्हायचे आणि तेहि कोणत्याहि धाकट धपशाविना. प्रबोधन हे मारहाणि मुळे होणार नाहि, ज्याना मारहाण झालि त्याना पश्चाताप होण्या ऐवजि आपला अपमान झाला असे वाटेल. संधि मिळालि तर ते उट्टे काढण्याचा प्रयत्न करतिल न कि चुकिचि माफि मागण्याचा
  • Log in or register to post comments

धमाल्या

पक्या
Fri, 08/08/2008 - 13:05 नवीन
धमाल्या, प्रेमीयुगुलांना मारहाण करून गडाचे पावित्र्य कमी करण्यास तुम्हीही हातभार लावलात की रे. दारू पिऊन धिंगाणा घालणे, इतरांना नाहक त्रास देणॅ , गडावर कचरा करणे अशावेळी संस्कृतीरक्षकांनी जरूर पुढे यावे. आणि त्यावेळी स्वसंरक्षणार्थ तुम्ही अवलंबवलेला मार्ग योग्य. पण प्रेमीयुगुलांनी एकांतात चार दोन प्रेमाच्या गोष्टी केल्यास काय बिघडले त्यात? हा त्यात सार्वजनिक ठिकाणी (मग तो गड असो वा कुठलीही बाग ) इतरांना (बघणार्‍याला ) अश्लील वाटतील असे चाळे करणे हे अयोग्यच. त्याचेही भान या प्रेमीजनांनी ठेवायला हवे. मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्‍यांना अटकाव करावा. गड किल्ल्यांवर गणवेषातील प्रशिक्षित रेंजर्स असावेत. रेंजर्स चे कामच असते त्यांच्या अखत्यारीतील भागाचे रक्षण करणे आणि त्या भागाला भेट देणार्‍या पर्यटकांचेही रक्षण करणे. अर्थात हे सूचना म्हणुन चांगले वाटले तरी प्रत्यक्षात अमलात आणणे अवघड आहे. पण अशक्य मात्र नाही. बाकी लोकांच्या मनात मुळातच इतिहासाविषयी , महाराजांबद्द्ल, गड किल्ल्यांबद्द्ल अभिमान , आदर असायला हवा. आणि तो नसेल किंवा बोथट झालेला असेल तर ते योग्य प्रबोधनानेच घडू शकेल्...मारहाणी मुळे नाही.
  • Log in or register to post comments

कदाचित

धमाल मुलगा
Fri, 08/08/2008 - 13:49 नवीन
कदाचित माझी भुमिका मला पहिल्या प्रतिसादात योग्य प्रकारे मांडता आली नाही. पण वाईट इतकंच वाटलं, की सगळ्यांनी जी बोटं रोखली, ती फक्त प्रेमी युगुलांना विरोध करण्यावरुन. मान्य आहे त्यांना एकांत हवा असतो, आणि बरंच काही.आम्हीही गेलोय त्या काळातून. पण जेव्हा एखाद्या रविवारी सकाळी तुम्ही बायको मुलांना घेऊन सिंहगडावर जाता आणि असले प्रकार नजरेला पडतात तेव्हा काय करता? सरळ ठरवता ना की बास झालं, हे आलो हे शेवटचं? ईच्छा नसल्यास नका मान्य करु, पण आम्ही गडावर फिरुन तिथे आलेल्या लोकांशी संवाद साधून मगच हे पाऊल उचललंय. ह्या जोडप्यांच्या अशा अनिर्बंध वागण्याला विरोध करायला जेव्हा पुण्यात विजयानगर कॉलनीची बाग, डेक्कनचे पूल आणी नदीकाठ ह्या ठिकाणी "खबरदार" वगैरे प्रकारचे फलक लावले गेले तेव्हा ते योग्यच होते ना? मग हाच नियम गडावर का नाही लागु होत? दुसरी एक गोष्ट, जेव्हा ही जोडपी आपल्याच विश्वात रममाण झालेली असतात, तेव्हा कदाचित त्यांचा तोल सुटत असेलही, मान्य. पण ह्याची दुसरी बाजु पाहिलीये कोणि? त्यांचा भावनांचा 'उत्सव' चालू असताना, जर एखादा टवाळ कंपू आला तर त्या मुलीला हा एकटा प्रेमवीर वाचवू शकेल? आता तुम्ही म्हणाल ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं? उत्तर आहे "काहीच नाही". पण संभाव्य धोका टाळल्याच एक समाधान.
प्रेमीयुगुलांना मारहाण करून गडाचे पावित्र्य कमी करण्यास तुम्हीही हातभार लावलात की रे.
:) पक्याशेठ,
आणी ऊठसुठ प्रत्येक जोडीची कानशीलं आम्ही शेकायचो असा काहीसा गैरसमज इथं झालेला दिसतोय. जे व्यवस्थित फिरतात त्यांना कोणिही त्रास देत नाही. उलट सुरुवातीला जेव्हा आम्ही दारुड्यांना समजवायचो तेव्हा एखादं जोडपं जर दारुडे बसलेल्या ठिकाणापासून जात असेल, तर त्या जोडप्याला आमच्यातले काहीजण सोबतही करायचो. पण जेव्हा तुम्ही एखादं जोडपं, ज्या तानाजी मालुसर्‍यांनी पोराचं लग्न बाजुला ठेऊन स्वतःचा जीव देऊन गड काबीज केला, त्या तानाजींच्या अर्धपुतळ्याचा आडोसा पकडून अश्लील चाळे करताना पाहता, तेव्हा त्याचं तुम्हाला काहीच वाट्त नाही? आश्चर्य आहे !
गड म्हणजे साबरमतीचा आश्रम नव्हे ना? :) जेव्हा झुडपात खसफसतं आणि तुम्ही आवाज देता "कोण आहे रे तिकडं? येऊ का?" तेव्हा एखादी मुलगी तोंड ओढणीनं झाकून कमरेची सलवार एका मुठीत आवळून पळून जाताना पाहिली ना की मग लक्षात येतं, काय करायला हवं आणि काय नाही!
मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्‍यांना अटकाव करावा.
पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात.
  • Log in or register to post comments

धमाल

पक्या
Fri, 08/08/2008 - 21:41 नवीन
धमाल मुला, नाण्याची दुसरी बाजू (गडाचे पावित्र्य, अश्लील चाळे, दारू पिऊन धिंगाणा, स्वसरक्षण) पाहिली तर तुमचे वागणे पटते. दारू पिवून धिंगाणा करणार्‍यांना, मुली बायकांना त्रास देणार्‍यांना फटकेच बसले पाहिजेत. फक्त ते (प्रेमी) पोरा-पोरींना मारहाण करणे ही एकदम टोकाची भूमिका वाटली म्हणून वरील प्रतिसाद लिहीला. बाकी बघणार्‍याला अश्लील वाटतील असे चाळे गड काय इतरत्र करणॅ अयोग्यच ...हे मी आधीच लिहीले आहे. >> मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्‍यांना अटकाव करावा. पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात. हे अगदी योग्य. इतर गडांवर पण हे व्हायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हे सगळे

लबाड मुलगा
Fri, 08/08/2008 - 14:33 नवीन
हे सगळे ठीक आहे हो पण रोजच्या जीवनात रोज रस्त्यावरुन जाता येता जे पौपकोर्न खाणे चाललेले आहे ते पाहुन शरम वाटते ब्राच्या पट्या दाखवित बनियन चड्डी घातलेल्या पोरी ( मागुन आतील चड्डीचा ब्रैड पण वाचता येतो) मोटारसायकल वर पुढील पोराच्या पाठिवर चढुन बसलेल्ञा ललना (सीट मोकळे) रात्री ७ पासुनच पार्क करुन ठेवलेल्या कार ज्या मधुनच आपोआप हालतात परत परत धरबंदच उरला नाही या शहरात ..... छ्या
  • Log in or register to post comments

तुमी कश्याला

गुंडोपंत
Fri, 08/08/2008 - 14:38 नवीन
पन मला कलत नाय, तुमी कश्याला पाह्यला जाता जवळून बनियन चड्डी घातलेल्या पोरींच्या चड्डीचे ब्रँड? आपन आप्लं सरळ बगून का चालू नाय? आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा

तुमास्नी

लबाड मुलगा
Fri, 08/08/2008 - 19:26 नवीन
तुमास्नी का दाताखाली खडा लाग्ला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

आगायायायाया

टारझन
Sat, 08/09/2008 - 01:47 नवीन
गुंडोपंत आणि पक्या डेंजर ... =)) =)) =)) हसून हसून मेलो आहे. (१० मिनीटांनी) हुस्श्श्श्श्श.... जबराट ... दारुड्यांपासून कबुतरांकडे गेलेला टॉपिक तुम्ही अचानक चड्ड्यांच्या ब्रांड कडे नेलात .. जबरा =)) बाकी धमू शेटचं दारुड्यांना फटकवणे (स्वरक्षणार्थ) अति योग्य ... मला पण बोलव रे धमु... आणि ते तु म्हणालास ना की चाळे करणारांना कोणी टोळीने त्रास दिला तर ... अरे .. ही टोळी नुसते हातात हात घालून एकांतात फिरणारांना पण त्रास देते ना राव. ह्या टोळ्यांना तर अजुनच फटकवलं पाहीजे. मी तर म्हणतो एक एकाच्या चड्ड्या काढून (आणी ब्रांड बघून ;) ) ताशाच्या काड्यांनी नरम केलं पाहीजे. बाकी दस्तुरखुद्द महाराजांनी पण गडावर प्रेम करायला बंदी नव्हती रे केली. नाही तर स्वराज्य ऊभे करणारे मावळे कसे पैदा झाले असते? (अर्थात त्याचा अर्थ तिथे आता मावळे पैदा करा असा नाही) झुडपं हलवणार असतिल तर पोलीस.. योग्य मार्ग. म्हणजे हे दिवे त्यांच्या घरच्यांना पण कळतील. मग काहींच तेरी लग्न लाऊन दिलं जाईल मग ते गड नाही शोधणार. पण मी काय म्हणतो धम्या ... गडांवरची झुडपं काय आणि माळरानावरची झुडपं काय ? असे धंदे दिसले की पोलीस आणी घरवाले हे योग्य चाप देऊ शकतात एकदम ईफेक्टीव्हली. आणि पोर्‍या सन्नी देओल की दाखवायला लागला की त्याला प्रेम चोपडा करूयात. तुझा हेतू वाईट(राजकिय->शिवसेना) नाहीये हे वाचून बरं वाटलं -- ( टारझन ऊर्फ खवीस )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा

बरोबर आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/08/2008 - 15:17 नवीन
बरोबर आहे गुंडोपंतांचं! तुम्हाला कोणी सांगितलं तर ... साहेबी कपडे बंद आणि सरळ धोतर, बंडी असा वेषच परीधान करायचा! आणि मग साडी नेसल्यावर कंबर दिसते ते चांगलं का वाईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा

साडी

लबाड मुलगा
Fri, 08/08/2008 - 19:31 नवीन
साडी नेसल्यावर कंबर दिसते ते चांगलं का वाईट? फक्त कंबरच दिसते चड्ढी घातल्यावर काय काय दिसते हे पहायचे असेल तर सिग्नलला बाजुला उभ्या राहुन पहाच काय दिसते ते..... लाज वाटेल तुम्हालाच सरळ धोतर, बंडी असा वेषच परीधान करायचा! काय वाईट आहे त्या वेशात जरा आभाळातुन डोळै काढुन बघा भारतात ८० टक्के पुरुष हाच वेश परिधान करतात च्यायला आजकाल लोकांचा भारताशी संबंधच तुटत चाललाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चड्ढी

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/08/2008 - 20:20 नवीन
चड्ढी घातल्यावर काय काय दिसते हे पहायचे असेल तर सिग्नलला बाजुला उभ्या राहुन पहाच काय दिसते ते..... लाज वाटेल तुम्हालाच मनात वाईट विचार नसतील तर लाज वाटायचं कारणंच काय? आणि फक्त कंबरच दिसते तर ते चांगलं का वाईट हे कोण ठरवणार? आपल्या देशात हे दाखवतात म्हणून तुमची नजर मेली आहे, एवढंच मी म्हणू शकते. मी त्यापेक्षा बरंच जास्त जग पाहिलं आहे, आणि माझी नजर पूर्णच मेली आहे म्हणा हवं तर! आणि मला काहीही गैर वाटत नाही स्वतः असे कपडे घालण्यात! साडी नेसून सायकल चालवण्यापेक्षा छोटी चड्डी आणि टॉप घालून सायकल चालवणं सोप जातं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा

पावसाळ्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/08/2008 - 14:34 नवीन
पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात. बेश्टच! डोंगरांवर वाट चुकल्याचं नाही पण, गुटख्याच्या पाकिटांनी रस्ता दाखवल्याचं वाईट वाटायचं.
  • Log in or register to post comments

marathi bhashikanchi tirth kshetre

प्रसाद आरोसकर
Fri, 08/08/2008 - 16:15 नवीन
Namaskar mitrano lihitana english cha vapar karit aahe karan mi ajun marathi typing madhye far slow aahe. kahi mudde tatdine mandanyachi garjechi vatali mhanun ha patra prapanch. Gad kille, itihasik thikane hya nusatya vastu navhet tar tirth kshetre aahet. tya mule tumachya tithalya vavara varati bandhane yenarach ani ti asalich pahijet. mandira madhye, masjidi madhye ... ekhadya pavitra thikani tumi daru piun jal , cigareti odhat, preyasichya bahupashat jal ka ? ani jat asal tar kay bolnar tumachya vishayi !! shivaji maharajansarakha raja , rajan sathi talhatanvar shir gheun ladhaleli manase hi tyanchya karma mule daivpada la pohachali aahet. tyanchya vishayi aadar balagane sarv marathi janateche kartavya aahe. kahi patranmdhye ase vachale ki tikadache vatavaran agadi chochi madhye choch ghalun basanya sarakhe asate ... arrey kay he ...arrey murkha sinhgadavar - tanaji malusarenchi samadhi aahe ... raigada var pratyaksha shivaji maharajanchi samadhi aahe .. ani tithe tumhi asale prakar karanar ? arrey aaplya sarvancha baap aahe re to !! maharaj, tanaji malusare, bajiprabhu kay lok hote te !! gada var sahkutumb yeun maja karane madhye ethalya nisargacha aanand ghene basat nahi ka ? mast zunka bhakar, kandabhaji khane basat nahi ka ? agadi tumachya preyasi sobat tumhi chhan gappa maru shakat nahi ? nahi tar kay mhanave tumachya premala ... aani he asalya goshti karayala gad kille ha ekach paryay aahe ?? aata hyana adavanar kon ? kahitari kayam swarupi yantrana havi ... ani tyacha aagrah dharayala hava .... maharajanchya nava khali satta milavanare , karodonchi sampatti jamavanare ...killyanchya dekhrekhi sathi kahi lakh kharch karu shakat nahi ? ani aapan tyana jab vicharnya aivaji ... cigaret odhali tar kay zale ? chochi madhye choch ghatali tar kay zale ? hya charcha karato. mi hyachya awareness sathi kahi goshti karit aahe, interested people can contact me on prasad,aroskar@gmail.com Aapala Prasad Aroskar
  • Log in or register to post comments

ह्म्म !

लिखाळ
Fri, 08/08/2008 - 19:06 नवीन
ऐतिहासिक वास्तू आणि तेथील वातावरन कसे जपावे याबद्दलची मते वाचले. बरीचशी मते पटली. पण पावित्र्याबद्दलची मते जरा तीव्रच होत आहेत असे वाटले. सिंहगडावर दर रवीवारी व्यायामासाठी जाणे, सिंहगडावरील हवेची-वातावरणाची मजा लुटायला तेथे मुक्कम करणे, तेथील भजी-झुणका-भाकरीची वर्णने करणे आणि ते खायला मुद्दाम उठून पुण्यातून जाणे इत्यादी गोष्टी पावित्र्य जपण्यामध्ये बसतात का? असा प्रश्न पडला. हे म्हणजे देवाच्या दर्शनापेक्षा तेथल्या प्रसादाच्या अपेक्षेने देवळात जाण्यासारखे आहे असे म्हणावे का? --(गोंधळलेला) लिखाळ.
  • Log in or register to post comments

आत्ताच ह्या

लंबूटांग
Fri, 08/08/2008 - 20:56 नवीन
विषया वर भाष्य करणारा एक quote वाचला. "The direct use of force is such a poor solution to any problem, it is generally employed only by small children and large nations."- David Friedman. भगतसिंग कुठे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुठे...
  • Log in or register to post comments

oh really?????then what is

चिन्या१९८५
Fri, 08/08/2008 - 21:32 नवीन
oh really?????then what is ur solution 2 dis problem???what have u done 4 dat??? भगतसिंग कुठे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुठे आम्ही स्वतःला भगत सिंघ म्हणत नाही.पण आम्ही तुमच्याप्रमाणे फक्त भाष्य करत बसत नाही तर जे चुकतय ते बदलण्याचा प्रयत्न करतो. आम्ही चुकीच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न तरी करतो.तुम्ही तर तोहि करत नाही. आणि काही लोक तर काही करायच नाही म्हणुन डोळ्यावर चष्मा घालुन 'कुठे काय चुकतय' म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

राम राम...

एक
Fri, 08/08/2008 - 22:13 नवीन
हा आपला शेवटचा प्रतिसाद या थ्रेड ला.. बर्‍याचशा प्रतिसादांमधे आता "संभाजी ब्रिगेड" , बजरंग दल सारखी मेंटालिटी दिसायला लागली आहे. मूळ मुद्दा सोडून चिन्या सारखी लोकं आता वैयक्तिक पातळीवर घसरायला लागली आहेत.. हे बघा.. " शृंगार आणि अश्लिलतेतला फरक न कळणारे नुसतेच शरीरानी मोठे झालेले दिसतात..." तेव्हा आपला रामराम...
  • Log in or register to post comments

ज्यापध्दत

चिन्या१९८५
Fri, 08/08/2008 - 22:40 नवीन
ज्यापध्दतीच लिखाण करता त्यापध्दतीची उत्तरे द्यावी लागतात्.इथ आम्हाला अगदी गँगस्टर,कॉर्पोरेटर्,आमदार वगैरे म्हटले आहे त्याचे काय्??तुम्ही आणि तुमच्याशी सहमत असलेल्यांनी काहीही लिहाव आणि आम्ही थोडस काही लिहिल की लगेच निषेध हे डबल स्टँडर्ड्स का???आणि वरील तुम्हाला आक्षेपार्ह वाक्याचे उत्तर काय्???त्या दोन गोष्टींमधे फरक आहे का नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

मित्रहो,

सखाराम_गटणे™
Mon, 08/11/2008 - 08:30 नवीन
मित्रहो, तुमची इतकी चर्चा वाचल्या नंतर, मला ऐक प्रश्न पडला आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रेम कसे करावे? अनुभवी लोकांनी सल्ले द्यावेत. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

समुह उन्माद

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/11/2008 - 09:39 नवीन
रहमानी किडा प्रत्यक्षात आहे कि नाही हे मला माहित नाही. पण एकदा टाकली कि तो प्रत्येकाच्या _डीत वळवळायला सुरवात होते. आता त्या वळवळण्याची व्याप्ति किती हा खरा प्रश्न आहे. चतुरंग म्हणतात तसे या उपाय योजना तात्पुरत्या असतात. पण कायमस्वरुपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत या तात्पुतत्या व्यवस्थांच महत्व अबाधित आहे. कायदा व सुव्यस्था कमी पडते त्यावेळि समांतर न्याय व्यवस्था तयार होत असते. यात कायदाच केवळ हातात घेतला जात नाही तर न्यायाधीश ही आपणच बनतो. जोथे भावना तीव्र बनतात तिथ मेंदु विवेकाचा आधार न घेता भावनेच्याच आहारी जातो. पोलिस खात्यात समरी पॉवर या नावाने अनेक बेकायदेशीर गोष्टी चालतात. एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणुन अनैतिक आहे असे नव्हे किंवा एखादी गोष्ट कायदेशीर आहे म्हणुन नैतिक आहे असेही नव्हे. हा युक्तिवाद इथे लढवता येतो. महाराष्ट्रातल्या अनेक गडांवर पोलिस बिनतारी पुन:प्रक्षेपण केंद्रे आहेत. अनेक गडांवर असे गैर प्रकार चालतात ते रोखण्यासाठी याचा काही उपयोग होत नाही . कारण ती जबाबदारी व अधिकार इथे दिलेला नसतो. पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ वाया जात असतं. (आमच्या भाषेत ६० बाय ९० चादर) जुन्यापुराण्या पोलिस मॅन्युअल नुसार चालणारे कामकाज, कालबाह्य रुढी परंपरा यात अडकलेलि यंत्रणा, मनुष्य बळाचे मुल्यमापन करणारी आधुनिक व्यवस्थापनाची यंत्रणाच नसणे अशाकिति तरी गोष्टी आहेत. http://www.misalpav.com/node/114 इथे थोडेसे. सिंहगड , पेठ घाट, चतु:श्रुंगी अशा ठिकाणि नोकर्‍या केलेला. ( टंकायचा कंटु आला) ( बिनतारी जगत मधुन बाहेर पडलेला) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

अरेच्च्या!

धमाल मुलगा
Tue, 12/29/2009 - 17:22 नवीन
आज असंच मटा पाहता पाहता थर्टी फर्स्टच्या रात्री सेनेचा 'पहारा' ही बातमी वाचनात आली :) सहजच कुठेतरी गडकिल्ल्यांवर दारु पिणे, दंगा करणे वगैरेसंदर्भात असल्याने एकदम आठवण झाली :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा