Skip to main content

या नालायकांना अटकाव कसा करायचा

लेखक गणा मास्तर यांनी गुरुवार, 07/08/2008 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडाला जेव्हा लाज येते... महराष्ट्र टाइम्स मधली ही बातमी वाचुन डोके तापले. ह्या नालायकांना अटकाव कसा करायचा? दोन वर्षांपुर्वी मला राजगड्लाही हाच अनिभव आला होता.

वाचने 29348
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

हा आपला शेवटचा प्रतिसाद या थ्रेड ला.. बर्‍याचशा प्रतिसादांमधे आता "संभाजी ब्रिगेड" , बजरंग दल सारखी मेंटालिटी दिसायला लागली आहे. मूळ मुद्दा सोडून चिन्या सारखी लोकं आता वैयक्तिक पातळीवर घसरायला लागली आहेत.. हे बघा.. " शृंगार आणि अश्लिलतेतला फरक न कळणारे नुसतेच शरीरानी मोठे झालेले दिसतात..." तेव्हा आपला रामराम...

In reply to by एक

ज्यापध्दतीच लिखाण करता त्यापध्दतीची उत्तरे द्यावी लागतात्.इथ आम्हाला अगदी गँगस्टर,कॉर्पोरेटर्,आमदार वगैरे म्हटले आहे त्याचे काय्??तुम्ही आणि तुमच्याशी सहमत असलेल्यांनी काहीही लिहाव आणि आम्ही थोडस काही लिहिल की लगेच निषेध हे डबल स्टँडर्ड्स का???आणि वरील तुम्हाला आक्षेपार्ह वाक्याचे उत्तर काय्???त्या दोन गोष्टींमधे फरक आहे का नाही??

मित्रहो, तुमची इतकी चर्चा वाचल्या नंतर, मला ऐक प्रश्न पडला आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रेम कसे करावे? अनुभवी लोकांनी सल्ले द्यावेत. सखाराम गटणे

रहमानी किडा प्रत्यक्षात आहे कि नाही हे मला माहित नाही. पण एकदा टाकली कि तो प्रत्येकाच्या _डीत वळवळायला सुरवात होते. आता त्या वळवळण्याची व्याप्ति किती हा खरा प्रश्न आहे. चतुरंग म्हणतात तसे या उपाय योजना तात्पुरत्या असतात. पण कायमस्वरुपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत या तात्पुतत्या व्यवस्थांच महत्व अबाधित आहे. कायदा व सुव्यस्था कमी पडते त्यावेळि समांतर न्याय व्यवस्था तयार होत असते. यात कायदाच केवळ हातात घेतला जात नाही तर न्यायाधीश ही आपणच बनतो. जोथे भावना तीव्र बनतात तिथ मेंदु विवेकाचा आधार न घेता भावनेच्याच आहारी जातो. पोलिस खात्यात समरी पॉवर या नावाने अनेक बेकायदेशीर गोष्टी चालतात. एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणुन अनैतिक आहे असे नव्हे किंवा एखादी गोष्ट कायदेशीर आहे म्हणुन नैतिक आहे असेही नव्हे. हा युक्तिवाद इथे लढवता येतो. महाराष्ट्रातल्या अनेक गडांवर पोलिस बिनतारी पुन:प्रक्षेपण केंद्रे आहेत. अनेक गडांवर असे गैर प्रकार चालतात ते रोखण्यासाठी याचा काही उपयोग होत नाही . कारण ती जबाबदारी व अधिकार इथे दिलेला नसतो. पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ वाया जात असतं. (आमच्या भाषेत ६० बाय ९० चादर) जुन्यापुराण्या पोलिस मॅन्युअल नुसार चालणारे कामकाज, कालबाह्य रुढी परंपरा यात अडकलेलि यंत्रणा, मनुष्य बळाचे मुल्यमापन करणारी आधुनिक व्यवस्थापनाची यंत्रणाच नसणे अशाकिति तरी गोष्टी आहेत. http://www.misalpav.com/node/114 इथे थोडेसे. सिंहगड , पेठ घाट, चतु:श्रुंगी अशा ठिकाणि नोकर्‍या केलेला. ( टंकायचा कंटु आला) ( बिनतारी जगत मधुन बाहेर पडलेला) प्रकाश घाटपांडे

आज असंच मटा पाहता पाहता थर्टी फर्स्टच्या रात्री सेनेचा 'पहारा' ही बातमी वाचनात आली :) सहजच कुठेतरी गडकिल्ल्यांवर दारु पिणे, दंगा करणे वगैरेसंदर्भात असल्याने एकदम आठवण झाली :)