लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा
आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि !
कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी
लागली कुणाला कुणाची उचकी
कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !
तरणीवाकाठी, नार न पोरटी, नजर हुद्यावर
फोडून सांधा, चतूर फंडा, जनता वार्यावर
फडामध्ये चाहुल, वाजंल कुणाचं पाऊलं
उरांत भरली धडकी
निजले उजव्या कुशी, हातगेला घशी, करु आता काशी
इंदराच्या लाटा, बेरजेचा काटा, मनसे झाली नकुषी
कमळात आला, धनुष छेडलं नाराजची कला
तोळ्याचा मासा, बाजार कसा थरके
फुटून वेगळी, कइ येरीवाळी, झाली ठेंगेकरी
मना डसले हात, हाताच बोट जातीला गुदगुल्या करी
नाण्यामध्ये धर्माधर्म दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यानं सार्यांचीच घेतली फिरकी
रात दिसं सांगते, वाट मुख्यमंत्रीपदाची बघते, किती मी घालू साद
झोप माझी उडली, जादू कशी घडली, जाई ना सत्तेची याद
भेटीसाठी आले मनी, कासाविस झाले मी, माझी मलाचकी परकी !
चांगलय. आवडल.मस्तच.
मी पयला....
मी पयला
(No subject)
वाट मुख्यमंत्रीपदाची बघते,