झक मारली का?

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
6 Oct 2014 - 10:07 am
गाभा: 

नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले..

"उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?"

लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली. सविस्तर बातमी

आता मला सांगा,

१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का?
२) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय?
३) जर पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय?
४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते?
५) इतर बर्‍येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत?
६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले?
७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात?

मिपाकरांकडून उत्तरे अपेक्षित...

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

6 Oct 2014 - 10:09 am | योगी९००

मीच पयला..

खटपट्या's picture

6 Oct 2014 - 10:15 am | खटपट्या

हे म्हणजे स्वत:च बोलिंग करायची आणि स्वत:च ब्याटीन्ग करायची

जेपी's picture

6 Oct 2014 - 10:15 am | जेपी

१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का? बरोबर
२) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय? ज्याची त्याची जर बुद्धी
३)पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय? पहिले उत्तर बरोबर आहे
४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते? हि हि हि
५) इतर बर्‍येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत? कारण भाषण नेणत्या राजाचे होते.
६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले? प्रत्यक्ष भाषण आईकले नाय
७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात? माहित नाय

जेपी's picture

6 Oct 2014 - 10:17 am | जेपी

हुकला कि पयला नंबर :-(

योगी९००'s picture

6 Oct 2014 - 10:22 am | योगी९००

तुमचा पयला लंबर हुकावा म्हणून मीच लावला पयला लंबर..

खटपट्या's picture

6 Oct 2014 - 10:25 am | खटपट्या

आधी मी पायला टंकून घ्याचं !
मग प्रतिसाद द्याचा !
:)
फुडच्या येळंला ध्यानात ठिवा !

योगी९००'s picture

6 Oct 2014 - 10:51 am | योगी९००

आधी मी पायला टंकून घ्याचं !
मग प्रतिसाद द्याचा !

जेपी साहेब हेच करायचे नेहमी...यावेळी त्यांनी माझा लेख वाचला बहूतेक म्हणून हुकला लंबर...

मी धागा वाचुनच मी पयला टाकतो.
इथ उत्तर देण्याच्या नादात नंबर हुकला.
मी पयला प्रतिसाद आलाय याचा अर्थ धागा न वाचताच प्रतिसाद दिला जातो असा घेऊ नये.

मग धागा टाकायचा... ;)

माहितगार's picture

6 Oct 2014 - 10:45 am | माहितगार

*धागा जाहीरात:
झक मारणे: झक, झक्कू आणि झकास

(मिपाकरांची क्षमा मागून) आमच्या (माझ्या) ऐसी अक्षरेवरील झक मारणे: झक, झक्कू आणि झकास या शब्द समुहांचा अर्थाचा आणि व्युत्पत्तीचा सविस्तर उहापोह करणार्‍या धाग्याची हि जाहीरात !!

योगी९००'s picture

6 Oct 2014 - 12:47 pm | योगी९००

छान लिहीलेय..

दिपक.कुवेत's picture

6 Oct 2014 - 11:36 am | दिपक.कुवेत

थोड्या वेळ थांबा.....झक मारत सगळे ईकडे प्रतिसाद द्यायला येतील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Oct 2014 - 12:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योगी, शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच,अभ्यासपूर्वक बोलतो नेहमी. अगदी पहिल्यांदा मुख्यमंत्री-१९७८ पासून मी बघतेय.
झक मारली आणि पुरस्कार दिला असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आपण चालवून घेतलेच की.

योगी९००'s picture

6 Oct 2014 - 12:46 pm | योगी९००

शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच
हे वाचून आपल्या पाया पडावे असे उगीचच वाटले..

बाकी मा. बाळासाहेबांच्या आणखी बर्‍याच गोष्टी आपण चालवून घेत होतो कारण त्या त्यांना शोभत होत्या...

मला तर सगळा केलिकल लोच्या दिसतोय.

विनोद१८'s picture

6 Oct 2014 - 4:26 pm | विनोद१८


हा.....'केमिकल लोच्या' केवळ आणि केवळ तो 'नान्या न्येफळा, ग्रेट्थिंकर फिलोसोफर, सचिन......च' जाणे....!!

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 5:35 pm | माम्लेदारचा पन्खा

धागा उघडला !! जाऊ देत...

भृशुंडी's picture

7 Oct 2014 - 12:52 am | भृशुंडी

सुंदर धागा.
मिपावर येतो ते ह्याचसाठी. संपादकांचे अभिनंदन!