✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

PLATONIC व्याभिचार- तोल सांभाळुन घसरण्यातला आनंद !

म
मारवा यांनी
Mon, 09/22/2014 - 01:11  ·  लेख
लेख
माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. तर हे मला फ़ारच आश्चर्यजनक वाटले मी सात्विक संतापाने मित्राला विचारले की अरे जर तीला नव्हताच इंटरेस्ट तर विषय मुळात इतका वाढवलाच का आणि इतक्या वेळ स्पर्श तरी का चालवुन घेतला ? तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ? तर या मागे एक फ़ार विशीष्ट अशी मानसिकता असते. तर या विषयी आमच्या चर्चेतुन जे काही मला उमगले ते मांडण्याचा प्रयत्न करतो. एक सुंदर इंग्रजी शब्द आहे प्लॆटॉनिक लव्ह हा शब्द थोर तत्वज्ञ प्लेटो याच्या नावावरुन बनलेला आहे. याचा अर्थ होतो अशरीरी कृतिहीन प्रेम उदात्त प्रेम अथवा देवदासी निस्सीम वासनाहीन प्रेम. आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार तर याचा अर्थ असा की व्याभिचार हा नेहमीच कृती त व्यक्त होत नाही निव्वळ मानसिक पातळीवर ही अनेकदा व्याभिचार केला जात असतो. तर अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. मात्र कृती करणं त्या कटाक्षाने टाळतात म्हणजे कल्पनेच्या घोड्याला त्या बेलगाम उधळु देतात मात्र कृतीचा लगाम घट्ट हाती धरुनच. या स्त्रीयांना आपल्या मागे पुरुष पागल होतात ( वा आपण केव्हाही कुठल्याही वयात कुणालाही पागल करु शकतो) ही कल्पनाच प्रचंड एक्सायटींग असते. मात्र अर्थातच पुढची पायरी गाठण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. असे का होते ? त्या अस का करतात ? यामागे अनेक घटक कार्यरत आहेत, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नेणीवेवरील नैतिकतेचा प्रचंड दबाव. धर्म समाज कायदा सर्व बाजुंनी व्याभिचार हा कीती वाइट आहे पाप आहे याच सतत केल जाणार हॆमरींग ! त्यामुळे आज फ़िर जीने की तम्मना है आज फ़िर मरनेका इरादा है किंवा मी कात टाकली पर्यंतचा बेभान हिंमतीचा टप्पा त्यांना व्याभिचारात गाठता येत नाही. म्हणजे अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होतो, सर्व काही तोडुन मोकळं व्हावस ही वाटतं पण मग तो आवेग ओसरल्यानंतर मन स्वत:च्या नैसर्गीक उर्मींना कुरतडु लागत. मग नेणीवेवरील दबाव कार्यरत होतो. आता या घुसमटीतुनच एक विलक्षण दांभिकता जन्म घेते एक आत्मवंचनेचा नविन प्रवास सुरु होतो. तो असा की या स्त्रीया एक नविन मार्ग चोखाळतात. त्या अगोदर आवडलेल्या पुरुषाला आव्हान देतात त्याला इनव्हाइट करतात एक्साइट करतात. यामध्ये तो पुरुष जसजसा पागल होत जातो जसा त्या स्त्रीला प्रेज करु लागतो तशा त्या याच गोष्टीचा आनंद घेतात. एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात. कारण त्यांना मुळात पुढे जायचच नसत. त्यांना तोच तितकाच चरीत्र वाचवुन आनंद ही देणारा मर्यादीत व्याभिचार च हवा असतो. त्यात काय नाहि मिळत ? अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात. यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो. शिवाय अशा अनुभवाच्या रीफ़्रेशमेंट नंतर मुळ विवाहातही परतल्यावर दिर्घ बदलीच्या सुटीनंतर रहाटगाडग्याला जोडुन घेतानाचा आनंद उपभोगता येतो. या खेळा तला पुरुष मात्र मुर्ख च असतो त्याला तोंडी आलेला घास गमावण्यातला चडफ़डाट केवळ भोगावा लागतो. पण मग यातुन स्त्री ला एक अमर वेदना ही प्रत्ययास कधी कधी येत असावी की आपण झोकुन देउ शकत नाही प्रेम प्रवाहात आपण वाहु शकलो नाही याची देखील बोच तर असेल ? माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही. सध्या चरीत्रहीन मित्रा शी चर्चे च्या माध्यमातुन अजुन बरेच काही समजुन घ्यायचे आहे..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
63019 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

कथा कुणाची व्यथा कुणाला.

धन्या
Mon, 09/22/2014 - 01:19 नवीन
कथा कुणाची व्यथा कुणाला. ;)
  • Log in or register to post comments

कुठे भेटेल हा तुमचा मित्र ??

खटपट्या
Mon, 09/22/2014 - 02:57 नवीन
कुठे भेटेल हा तुमचा मित्र ?? एक डाव वळ्ख करूनच द्या राव...
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 06:29 नवीन
+१ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

एक डाव वळ्ख करूनच द्या राव...

दिपक.कुवेत
Mon, 09/22/2014 - 11:10 नवीन
नको हां खट्टु काका, ती जेनी आज्जी टपूनच बसलीये....लग्गेच विचारेल....."ओय होय काकूंना म्हातै का??"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

(No subject)

खटपट्या
Tue, 09/23/2014 - 08:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

चरित्रहीन

चित्रगुप्त
Mon, 09/22/2014 - 06:50 नवीन
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे? या विषयातला अनुभवी जाणकार आहे तो. त्याने केलेले विवेचन पटण्याजोगे आहेच. या विषयावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकल्याबद्दल आभार. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

आपले डोळे पारच दिपून गेलेले

असंका
Mon, 09/22/2014 - 11:05 नवीन
आपले डोळे पारच दिपून गेलेले दिसतायत त्या प्रखर प्रकाशझोतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

त्या मित्राला चरित्रहीन का

आनन्दा
Mon, 09/22/2014 - 14:38 नवीन
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे?
+१००. ही टिपण्णी मला देखील पटली नाही. बाकी लेख आवडला. लेखाच्या गंभीर विषयाला ही टिपण्णी टाचणी लवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चरीत्रहीन हे विशेषण वापरणारे चरीत्र या शब्दाचा अर्थ

मारवा
Mon, 09/22/2014 - 17:10 नवीन
केवळ लैंंगिक संबधां वर्तना पुरताच मर्यादीत धरतात. त्यांना उपरोधाने दिलेले हे उत्तर आहे इतकेच. मी ते डीरोगेटरी अर्थाने वापरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

माहीत नाही स्त्री हा तसा गहन

विलासराव
Mon, 09/22/2014 - 09:55 नवीन
माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. मग हा उपद्व्याप हा? तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही. मग जेंव्हा कधी पुर्ण उकल झाली असेल ते आधी लिहा की राव
  • Log in or register to post comments

व्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन वा गृहीत धरण्याची गल्लत होऊ नये

माहितगार
Mon, 09/22/2014 - 09:56 नवीन
धागा लेखातल पुरषी पात्र खरं असो वा काल्पनिक, फ्लर्टींग (मराठी शब्द ?) अथवा मोकळेपणाचे गैर अर्थ काढले जाऊन समोरची व्यक्ती (स्त्री) गृहीत धरली जात नाहीए हे पहाणे हि संबंधीत पुरषाची पहिली जबाबदारी आहे. समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही पायरीवरून नाही म्हणण्याचा अथवा परत फिरण्याचा अधिकारातील परस्पर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदर हि दोन्ही बाजूंनी केले पाहीजे यात गल्लत होता कामा नये. मला या गोष्टीचा अनुभव नाही पण अर्थांचा खिस करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन होणार नाही गृहीत धरण्याची गल्लत होणार नाही हे महत्वाच. बाकी चालू द्यात.
  • Log in or register to post comments

फ्लर्टिंग

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 09/22/2014 - 15:01 नवीन
मराठीत "अनुनय " बाकी लेखातील काही वाक्ये जमली आहेत याबद्दल वादच नाही. "अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता" "अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत" "मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

गृहीत धरण्याचा प्रश्नच नाही हो

मारवा
Mon, 09/22/2014 - 17:18 नवीन
नाही म्हणण्याचा अधिकार केव्हाही मान्य आहेच हो. पण अस बघा जेव्हा एखाद्या सार्वजनिक स्थळी जसे बस मध्ये ही चुकुन जरी पुरुषाचा धक्का लागला तरी ही ज्या कोणा स्त्री ला इंटरेस्ट नसेल तर ती तात्काळ दुर सरकेल एक सेंकंद ही स्पर्श सहन करणार नाही पुरुष ही तसाच वागेल. मात्र दहा मिनीट सलग स्पर्श आणि बोलणं ( दोन्ही सजेस्टीव्ह ) नर मादी या स्ट्रटेजीतुन केलेला हेतु उघड जाहीर करुन केलेला स्पर्श आणि संवाद दोन्ही काही काळ सहन करुन प्रतिसाद देउन मग अचानक नाकारणे ही एक वेगळी बाब आहे. याची माहीती असु द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

200 नक्की

स्पा
Mon, 09/22/2014 - 10:20 नवीन
200 नक्की
  • Log in or register to post comments

स्त्रीयांना थेट लैंगिक

नानासाहेब नेफळे
Mon, 09/22/2014 - 11:03 नवीन
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो ,त्यामुळे ठराविकच नव्हे, तर प्रत्येक स्त्री प्लेटोकाकांची पुतणी असते.
  • Log in or register to post comments

वा वा वा...आपलीच कमी होती ...

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 11:22 नवीन
वा वा वा...आपलीच कमी होती ... जगातल्या सगळ्या बायकांनी येउन तुमच्या कानात सांगितले असेल ना?? तुम्ही शिक्षक आहात का? (साभार - चितळे मास्तर - पु.ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

स्त्रीयांना थेट लैंगिक

मृत्युन्जय
Mon, 09/22/2014 - 11:22 नवीन
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो तुम्हाला केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो असे म्हणायचे आहे काय? काही काळापुर्वी (तुम्हाला वरीलप्रमाणे म्हणायचे असल्यास) हे विधान साधारणतः खपुन गेले असते. सध्या अशी परिस्थिती आहे असे वाटत नाही.. बादवे बर्‍याच पुरुषांनाही केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

मजेदार

सुबोध खरे
Mon, 09/22/2014 - 11:53 नवीन
मजेदार सावकाश प्रतिक्रिया लिहितो
  • Log in or register to post comments

अनुभव यथोचित वाटतो पण....

काउबॉय
Mon, 09/22/2014 - 11:58 नवीन
हा स्वभाव(प्लेटो व्याभिचार) निव्वळ स्त्रियांचा नसून अनेक पुरुषांचा देखील आहे असे वाटते. आपले मदन जी बाण यांचेच उदा. पहाना मर्यादा ओलांडली नाही त्यांनी.
  • Log in or register to post comments

बरं मग?

कवितानागेश
Mon, 09/22/2014 - 12:20 नवीन
बरं मग? :)
  • Log in or register to post comments

तर काय!

नानासाहेब नेफळे
Mon, 09/22/2014 - 12:28 नवीन
तर काय!
  • Log in or register to post comments

शीर्षक पाहून मला तर आनलैन

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 12:33 नवीन
शीर्षक पाहून मला तर आनलैन व्यभिचाराबद्दल धागा आहे की काय असं वाटून मोठ्या आशेने इ.इ. धागा उघडला, पण के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.
  • Log in or register to post comments

नक्की काय?

नाखु
Mon, 09/22/2014 - 12:35 नवीन
अपे़क्षेची उपेक्षा का उपेक्षीत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पायजे ते घ्या ओ. कुठलाही अर्थ

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 12:38 नवीन
पायजे ते घ्या ओ. कुठलाही अर्थ घेतला तरी त्याने के एल पी डी का टळणारे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

के एल पी डी अर्थात खास लम्हे

सौंदाळा
Mon, 09/22/2014 - 13:42 नवीन
के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.
के एल पी डी चा नविन सभ्य फुल फॉर्म (पण अर्थ मात्र तसाच)सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे. B.H.M.B, HMT, A.B.C.D, JAPAN वगैरे अभ्यास केलेला डीग्रीबाज - सौंदाळा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

HMT, A.B.C.D, JAPAN

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 14:03 नवीन
HMT, A.B.C.D, JAPAN
या पामरास पण सांगावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

आयडी बदल लेका. नुस्ता आयडी

प्यारे१
Mon, 09/22/2014 - 14:07 नवीन
आयडी बदल लेका. नुस्ता आयडी घेऊन कुणी टवाळ बनत नस्तंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चायला मी शॉर्ट्फॉर्मस वापरत

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 14:37 नवीन
चायला मी शॉर्ट्फॉर्मस वापरत नाही...जो है वो है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 14:47 नवीन
हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय ते या पामरास व्यनि करून सांगणे. बाकी माहिती आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

+१ हेच म्हणतो.. आम्हाला पण

हाडक्या
Mon, 09/22/2014 - 15:27 नवीन
+१ हेच म्हणतो.. आम्हाला पण व्यनि करावा .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+२

प्रमोद देर्देकर
Mon, 09/22/2014 - 17:06 नवीन
+२ हेच म्हणतो अम्हाला पण व्य.नि. करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ज्ञानकण वाटलेले आहेत

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 19:05 नवीन
ज्ञानकण वाटलेले आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

धन्स..

हाडक्या
Mon, 09/22/2014 - 22:18 नवीन
धन्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ते कण जरा आमच्यापत्तुरबी पोचु

जेपी
Tue, 09/23/2014 - 06:32 नवीन
ते कण जरा आमच्यापत्तुरबी पोचु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोल...मिपावार धत्तुरा पण नाही

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 14:12 नवीन
लोल...मिपावार धत्तुरा पण नाही मिळणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर'

सौंदाळा
Mon, 09/22/2014 - 13:37 नवीन
'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' नाटक दाखवा तुमच्या मित्राला.
  • Log in or register to post comments

मुद्दलातच घोळ दिसतोय.

विलासराव
Mon, 09/22/2014 - 13:40 नवीन
मुद्दलातच घोळ दिसतोय. आपण केला तर प्रेम/शिष्टाचार वगैरे समजावे. दुसर्याने केले तर भ्रष्टाचार्/व्याभीचार. आता झाले का सगळे सोपे?
  • Log in or register to post comments

गरजांची प्रामाणिक पुर्तता

आंबट चिंच
Mon, 09/22/2014 - 14:32 नवीन
गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो>>>>
ही ह्ही ह्ही खि क हायला माऊ प्रत्येक प्रतिसादाला
ब्र मगची
कॅसेट लावली आहेस. @ नाना ने:-
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो.
. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.
  • Log in or register to post comments

. इथे थेट कोण करतंय? आम्ही

आनन्दा
Mon, 09/22/2014 - 14:40 नवीन
. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच

खिक काय मी मध्यस्ती वापरतो

आंबट चिंच
Tue, 09/23/2014 - 08:27 नवीन
खिक काय मी मध्यस्ती वापरतो म्हणजे थेट भेटत नाही असं म्हाणायचं होतं मला. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ओक्के !! तिला दाखवितो धागा

सुहास..
Mon, 09/22/2014 - 14:41 नवीन
ओक्के !! तिला दाखवितो धागा ;)
  • Log in or register to post comments

तुमच्या लेखात अगदीच तथ्यं

मनीषा
Mon, 09/22/2014 - 16:08 नवीन
तुमच्या लेखात अगदीच तथ्यं नाही असे नाही. पण काहीसा एकाच बाजूने अथवा दृष्टीकोनातून लिहिलेलेला वाटला. स्त्रियांबद्दलची , तुमची विधाने फारच वरवरची आणि अवास्तव वाटली.
  • Log in or register to post comments

तुमच्या मित्राला हे दाखवा.

कवितानागेश
Mon, 09/22/2014 - 18:52 नवीन
तुमच्या मित्राला हे दाखवा. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे - when does a woman owe you sex? मूळ स्रोत - When Does a Woman Owe You Sex? Check This Chart
  • Log in or register to post comments

Nobody spoken about owning anything to anyone...!

काउबॉय
Mon, 09/22/2014 - 19:21 नवीन
इथे हक्क न्हवे इच्छे बाबत चर्चा चालु आहे. स्त्रि ची अशी विटंबना होइल अशी वाक्य रचना टाळावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

जेटमाउली ! अहो अधिकार नाकारण्याचा प्रश्न च कुठे येतो यात ?

मारवा
Mon, 09/22/2014 - 20:01 नवीन
तुम्ही दिलेली लिंक पुर्ण वाचली. मात्र आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मित्राने कुठलीही जबरदस्ती केली नाही आपण जे बोलत आहोत ते काही काही स्त्रीयांमध्ये ( जनरालाइज नाही ) एक दांभिकता असते त्याविषयी. त्यांना व्याभिचार तर करायचा असतो पण एका मर्यादेतच. किंबुहना व्याभिचार तर हवाहवासा वाटतो पण झोकुन देण्याचे धाडस नसते. मग त्या समोरच्या पुरुषाचा वापर केवळ चाळवण्यासाठी करतात. यामध्ये अर्थातच त्यांची कुचंबणा ही होत असते. त्या अस का वागतात याची ही जमेल तितकी चिकीत्सा करण्याचा प्रयत्न लेखात केलाय. चर्चा त्यांना असे का वागावे लागते त्या अस का वागतात. ? त्यामागील घटक कोणते ? त्याहुन मोठा प्रश्न माणुस असा दांभिक का होतो. ? या दिशेने चर्चा अपेक्षीत होती ती तशी न जाता नेहमीप्रमाणे चुकीच्या दिशेने वळलीय असे वाटते. सर्वच स्त्रीया अस वागतात असे म्हणायचे सुचवायचे नाही. स्त्री मनातील आंदोलने अशा वेळची टीपण्याचा प्रयत्न व्हावयास हवा अशी अपेक्षा आहे. आणि हा तर दोन जणांचा पुर्णपणे परस्पर संमतीचा च प्रश्न आहे. यात कुठलीही जबरदस्ती नाहीच मितवा या ग्रेस यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आठवतो त्यात कवि ग्रेस यांना भेटायला एक विवाहीता आली माझे तुमच्यावर प्रेम आहे वगैरे म्हणाली तुमच्याच साठी आले इ. त्यावर ग्रेस यांनी विचारले मग घालाल का माझ्या गळ्यात गळा असे काहीसे ( लेख नीट आठवत नाही चुकभुल देणे घेणे पण ग्रेस यांचा रीअल लाइफ अनुभव मांडलाय ) तर त्या बाईंनी यावर कच खाल्ली माघार घेतली मग ग्रेस एक कवितेची ओळ देतात ( परत एकदा चुकभुल देणे घेणे वा मितवा वाचणे ) ढळतांना जे अडखळले ते फुल च असते सडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी

कवितानागेश
Mon, 09/22/2014 - 20:37 नवीन
ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी 'जबरदस्ती' बाबत दिली गेली असली, तरीही, मूळ चार्ट त्याबाबतीत नाही. प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येक वेळेस सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी करुनच होउ शकते असं नाही, असं मला वाटतं तुम्ही जो प्रसंग सांगताय तो का घडला किंवा अपेक्षाभंग का झाला , त्याला बरेच पैलू असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

स्त्री आणि पुरुषातील आकर्षण

असंका
Mon, 09/22/2014 - 23:46 नवीन
स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता मर्यादा कुठे आखायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. स्त्रीचे ते स्खलन आणि पुरुषाचे ते (तो चरीत्रहीन असल्याने) प्रामाणिक ही वर्गवारी तशी माफक विनोदी आहे. आपला संपूर्ण लेखच अगोदर मी विनोदी म्हणून वाचला होता.पण आता परत आलो तर आपण वर कुणाशी तरी प्रतिवादही करत आहात? दोन्ही डगरीवर पाय नका हो ठेवू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

या बाबतीत सरसकटीकरण करणे

फुंटी
Mon, 09/22/2014 - 20:06 नवीन
या बाबतीत सरसकटीकरण करणे योग्य नाही.असो. << स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो.>> कसकाय बुवा ?? काहीतरी अर्धवट राहणारच ना ..
  • Log in or register to post comments

विशिष्ट गुण, आवडी-निवडी

चित्रगुप्त
Mon, 09/22/2014 - 22:31 नवीन
काही जणांमधे जर काही विशिष्ट गुण वा आवडी-निवडी असल्या, ज्यांचे घरच्या मंडळींकडून फारसे कौतुक होत नाही, वा त्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, तर असे कौतुक करणार्‍या लोकांविषयी एक आपुलकी वा ओढा निर्माण होत असतो. या लेखात दिलेल्या उदाहरणासारख्या बाबतीत अश्या प्रकारच्या ओढ्याचा भागही असू शकतो.
  • Log in or register to post comments

सहमत

तिमा
Tue, 09/23/2014 - 10:03 नवीन
आमचे हे, असले ओढे बारा महिने दुथडी भरुन वहात असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा