✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोरं vs मुलं

व
वेल्लाभट यांनी
गुरुवार, 09/11/2014 - 10:56  ·  लेख
लेख
नमस्कार! मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे. 'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही. विद्वान, जाणकार मिपाकरांचे यावरचे विचार वाचण्यास उत्सुक.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21391 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

पोरं (का मुलं?) लई दंगा करु

सौंदाळा
गुरुवार, 09/11/2014 - 16:27 नवीन
पोरं (का मुलं?) लई दंगा करु लागलीत धाग्यावर पोरी अजुन मागे कशा?
  • Log in or register to post comments

शब्दांच्या अर्थावर प्रश्न

वेल्लाभट
गुरुवार, 09/11/2014 - 16:27 नवीन
शब्दांच्या अर्थावर प्रश्न केला तर बिनातिकीट गावाला पोचली मंडळी ! धन्य धन्य धन्य !
  • Log in or register to post comments

मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम

प्रचेतस
गुरुवार, 09/11/2014 - 16:29 नवीन
मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा. प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.
  • Log in or register to post comments

एक नंबर!

बॅटमॅन
गुरुवार, 09/11/2014 - 16:31 नवीन
लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे. आता बोला, कुणाचे चुकले? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमचे !

वेल्लाभट
गुरुवार, 09/11/2014 - 16:35 नवीन
तुम्हाला होता का माहित अर्थ? जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही. जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे? जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१ तो वेल्लेश

स्पा
गुरुवार, 09/11/2014 - 16:36 नवीन
ब्यतयन लै शन बन्तो क..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मि तुझ्ह्यपेक्श शन कस बन्न्र?

बॅटमॅन
गुरुवार, 09/11/2014 - 16:42 नवीन
मि तुझ्ह्यपेक्श शन कस बन्न्र?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मला तोवर लक्षात आले नव्हते.

बॅटमॅन
गुरुवार, 09/11/2014 - 16:42 नवीन
मला तोवर लक्षात आले नव्हते. खातरजमा मी केलेली आहे म्हणूनच त्याला हो म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

झालं मग !

वेल्लाभट
गुरुवार, 09/11/2014 - 16:44 नवीन
संपला विषय ! उत्तर मिळालं मला. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नशीब !

वेल्लाभट
गुरुवार, 09/11/2014 - 16:32 नवीन
असा एकतरी प्रतिसाद आला. धन्यवाद; ही माहितीतली भर आहे माझ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ज्येन्युनली विचारतोय !! अरे

सुहास..
गुरुवार, 09/11/2014 - 16:33 नवीन
ज्येन्युनली विचारतोय !! अरे मग प्राधीकरण चा उगम कशापासुन झाला आहे ? ...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्राधीकरण हा माझ्या

प्रचेतस
गुरुवार, 09/11/2014 - 16:36 नवीन
प्राधीकरण हा माझ्या माहितीप्रमाणे सावरकरांनी सुचवलेला शब्द आहे (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

+१

बॅटमॅन
गुरुवार, 09/11/2014 - 16:49 नवीन
असे वाचल्यासारखे वाटते. पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पोरटं

तिमा
गुरुवार, 09/11/2014 - 16:42 नवीन
माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती. या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments

+१

सौंदाळा
गुरुवार, 09/11/2014 - 16:47 नवीन
+१ गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+२

आदूबाळ
गुरुवार, 09/11/2014 - 17:12 नवीन
+२ "छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

ठ्ठो खरंय.

बॅटमॅन
गुरुवार, 09/11/2014 - 17:13 नवीन
ठ्ठो =)) खरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नेहमी संयत भाषेत प्रतिसाद

सौंदाळा
गुरुवार, 09/11/2014 - 16:46 नवीन
नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते) १०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?
  • Log in or register to post comments

नाही ब्वा ! अशी तयारी बियारी

वेल्लाभट
गुरुवार, 09/11/2014 - 16:50 नवीन
नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं. ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

हेच चुकते तुम्हा लोकांचे

सौंदाळा
गुरुवार, 09/11/2014 - 16:56 नवीन
हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच. तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;) (स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

माहितीची देवाणघेवाण

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/11/2014 - 22:33 नवीन
स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश). ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

बोला श्री शब्दबंबाळी

सुहास..
गुरुवार, 09/11/2014 - 16:59 नवीन
बोला श्री शब्दबंबाळी पाल्हाळेश्वर महाराSSज कीSS जय ;)
  • Log in or register to post comments

कितीची सुपारी हो वेल्लाकाका?

सूड
गुरुवार, 09/11/2014 - 17:19 नवीन
कितीची सुपारी हो वेल्लाकाका?
  • Log in or register to post comments

शब्दबंबाळ हा शब्द योग्य

विजुभाऊ
गुरुवार, 09/11/2014 - 17:21 नवीन
शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे. काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?
  • Log in or register to post comments

मराठीत.

एस
गुरुवार, 09/11/2014 - 17:31 नवीन
मराठीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पोरकट धागेबी शंभरी जवळ धाऊ

जेपी
गुरुवार, 09/11/2014 - 17:47 नवीन
पोरकट धागेबी शंभरी जवळ धाऊ लागलेत. चालुद्या. पोर,मुल,कार्ट या शब्दाने काही फरक पडत नाही. (असे मानणारा)जेपी
  • Log in or register to post comments

पोर या शब्दावरून पोरकट वाद

विअर्ड विक्स
Sun, 09/14/2014 - 09:58 नवीन
पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!! अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….
  • Log in or register to post comments

आमची धाग्याला पोरकट भर!

प्यारे१
Sun, 09/14/2014 - 12:25 नवीन
आमची धाग्याला पोरकट भर!
  • Log in or register to post comments

गळ्यान साखळी सोन्याची

साती
Sun, 09/14/2014 - 12:54 नवीन
गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे. या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे. 'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची ' तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते. --संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Sun, 09/14/2014 - 13:41 नवीन
तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर पोरीचा बापूस कवटं चोर असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे. -प्रा. डॉ. किती शहाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

काय??

एस
Sun, 09/14/2014 - 22:15 नवीन
प्रा. डॉ. ??? आपण प्रा. डॉ. असं म्हणालात का? हम्म्म्...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हां, मग?

पैसा
Sun, 09/14/2014 - 22:19 नवीन
सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मग आता

एस
Sun, 09/14/2014 - 22:47 नवीन
मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अर्रर्र!

पैसा
Sun, 09/14/2014 - 22:54 नवीन
नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

____/\_____

अजया
Sun, 09/14/2014 - 14:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments

एक जेन्युईन प्रश्न

आगाऊ म्हादया......
Sun, 09/14/2014 - 18:08 नवीन
batman आणि वेल्लाभट यांना.. तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला... कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना... मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस.. म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला.. यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...
  • Log in or register to post comments

रोचक चर्चा

श्रीरंग_जोशी
Sun, 09/14/2014 - 20:03 नवीन
माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते. माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.
  • Log in or register to post comments

बोलीभाषा समजून घेणे होत असेल

रेवती
Mon, 09/15/2014 - 02:44 नवीन
बोलीभाषा समजून घेणे होत असेल पण सहिष्णुता वाढेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा