Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/11/2014 - 10:56
नमस्कार! मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे. 'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही. विद्वान, जाणकार मिपाकरांचे यावरचे विचार वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
  • 21391 views

प्रतिक्रिया

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 09/11/2014 - 16:27

Permalink

पोरं (का मुलं?) लई दंगा करु

पोरं (का मुलं?) लई दंगा करु लागलीत धाग्यावर पोरी अजुन मागे कशा?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/11/2014 - 16:27

Permalink

शब्दांच्या अर्थावर प्रश्न

शब्दांच्या अर्थावर प्रश्न केला तर बिनातिकीट गावाला पोचली मंडळी ! धन्य धन्य धन्य !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 09/11/2014 - 16:29

Permalink

मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम

मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा. प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/11/2014 - 16:31

In reply to मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम by प्रचेतस

Permalink

एक नंबर!

लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे. आता बोला, कुणाचे चुकले? =))
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/11/2014 - 16:35

In reply to एक नंबर! by बॅटमॅन

Permalink

तुमचे !

तुम्हाला होता का माहित अर्थ? जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही. जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे? जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 09/11/2014 - 16:36

In reply to तुमचे ! by वेल्लाभट

Permalink

+१ तो वेल्लेश

ब्यतयन लै शन बन्तो क..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/11/2014 - 16:42

In reply to +१ तो वेल्लेश by स्पा

Permalink

मि तुझ्ह्यपेक्श शन कस बन्न्र?

मि तुझ्ह्यपेक्श शन कस बन्न्र?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/11/2014 - 16:42

In reply to तुमचे ! by वेल्लाभट

Permalink

मला तोवर लक्षात आले नव्हते.

मला तोवर लक्षात आले नव्हते. खातरजमा मी केलेली आहे म्हणूनच त्याला हो म्हणालो.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/11/2014 - 16:44

In reply to मला तोवर लक्षात आले नव्हते. by बॅटमॅन

Permalink

झालं मग !

संपला विषय ! उत्तर मिळालं मला. आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/11/2014 - 16:32

In reply to मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम by प्रचेतस

Permalink

नशीब !

असा एकतरी प्रतिसाद आला. धन्यवाद; ही माहितीतली भर आहे माझ्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/11/2014 - 16:33

In reply to मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम by प्रचेतस

Permalink

ज्येन्युनली विचारतोय !! अरे

ज्येन्युनली विचारतोय !! अरे मग प्राधीकरण चा उगम कशापासुन झाला आहे ? ...;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 09/11/2014 - 16:36

In reply to ज्येन्युनली विचारतोय !! अरे by सुहास..

Permalink

प्राधीकरण हा माझ्या

प्राधीकरण हा माझ्या माहितीप्रमाणे सावरकरांनी सुचवलेला शब्द आहे (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/11/2014 - 16:49

In reply to प्राधीकरण हा माझ्या by प्रचेतस

Permalink

+१

असे वाचल्यासारखे वाटते. पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 09/11/2014 - 16:42

Permalink

पोरटं

माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती. या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 09/11/2014 - 16:47

In reply to पोरटं by तिमा

Permalink

+१

+१ गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 09/11/2014 - 17:12

In reply to +१ by सौंदाळा

Permalink

+२

+२ "छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/11/2014 - 17:13

In reply to +२ by आदूबाळ

Permalink

ठ्ठो खरंय.

ठ्ठो =)) खरंय.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 09/11/2014 - 16:46

Permalink

नेहमी संयत भाषेत प्रतिसाद

नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते) १०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/11/2014 - 16:50

In reply to नेहमी संयत भाषेत प्रतिसाद by सौंदाळा

Permalink

नाही ब्वा ! अशी तयारी बियारी

नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं. ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 09/11/2014 - 16:56

In reply to नाही ब्वा ! अशी तयारी बियारी by वेल्लाभट

Permalink

हेच चुकते तुम्हा लोकांचे

हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच. तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;) (स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/11/2014 - 22:33

In reply to हेच चुकते तुम्हा लोकांचे by सौंदाळा

Permalink

माहितीची देवाणघेवाण

स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश). ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/11/2014 - 16:59

Permalink

बोला श्री शब्दबंबाळी

बोला श्री शब्दबंबाळी पाल्हाळेश्वर महाराSSज कीSS जय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 09/11/2014 - 17:19

Permalink

कितीची सुपारी हो वेल्लाकाका?

कितीची सुपारी हो वेल्लाकाका?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/11/2014 - 17:21

Permalink

शब्दबंबाळ हा शब्द योग्य

शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे. काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 09/11/2014 - 17:31

In reply to शब्दबंबाळ हा शब्द योग्य by विजुभाऊ

Permalink

मराठीत.

मराठीत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 09/11/2014 - 17:47

Permalink

पोरकट धागेबी शंभरी जवळ धाऊ

पोरकट धागेबी शंभरी जवळ धाऊ लागलेत. चालुद्या. पोर,मुल,कार्ट या शब्दाने काही फरक पडत नाही. (असे मानणारा)जेपी
  • Log in or register to post comments

Submitted by विअर्ड विक्स on Sun, 09/14/2014 - 09:58

Permalink

पोर या शब्दावरून पोरकट वाद

पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!! अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 09/14/2014 - 12:25

Permalink

आमची धाग्याला पोरकट भर!

आमची धाग्याला पोरकट भर!
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Sun, 09/14/2014 - 12:54

Permalink

गळ्यान साखळी सोन्याची

गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे. या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे. 'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची ' तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते. --संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/14/2014 - 13:41

In reply to गळ्यान साखळी सोन्याची by साती

Permalink

धन्यवाद!

तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर पोरीचा बापूस कवटं चोर असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे. -प्रा. डॉ. किती शहाणे
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 09/14/2014 - 22:15

In reply to धन्यवाद! by पैसा

Permalink

काय??

प्रा. डॉ. ??? आपण प्रा. डॉ. असं म्हणालात का? हम्म्म्...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/14/2014 - 22:19

In reply to काय?? by एस

Permalink

हां, मग?

सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 09/14/2014 - 22:47

In reply to हां, मग? by पैसा

Permalink

मग आता

मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/14/2014 - 22:54

In reply to मग आता by एस

Permalink

अर्रर्र!

नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 09/14/2014 - 14:03

Permalink

____/\_____

=))
  • Log in or register to post comments

Submitted by आगाऊ म्हादया...... on Sun, 09/14/2014 - 18:08

Permalink

एक जेन्युईन प्रश्न

batman आणि वेल्लाभट यांना.. तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला... कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना... मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस.. म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला.. यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 09/14/2014 - 20:03

Permalink

रोचक चर्चा

माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते. माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 09/15/2014 - 02:44

In reply to रोचक चर्चा by श्रीरंग_जोशी

Permalink

बोलीभाषा समजून घेणे होत असेल

बोलीभाषा समजून घेणे होत असेल पण सहिष्णुता वाढेलच असे नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com