गोजिरी
एक होती गोजिरी,
रुसुनी बसली कोपरी
काही केल्या बोलेना,
तिच्यापुढे आमचे काही चालेना
नाक आहे छोटेसे,
गुस्स्यात होते थोडे मोठेसे
खळी पडते गालावर,
गुस्स्यात पडे कपाळावर
आकाशी उडे जसे पाखरू,
तसे नाजूक आहे माझे कोकरू
शिंगांनी जरी देई मार,
माया आहे मनी फार
-विअर्ड विक्स
(चाल बडबड गीताप्रमाणे लावावी. हे बडबड गीत म्हणून सुद्धा चालू शकते. परंतु हे गीत अल्लड, निर्मळ नि कोमल मनाच्या प्रेयसीला ही सादर करू शकता...)
(No subject)
आवडलं, मस्त