✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 08/19/2014 - 14:30  ·  लेख
लेख
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
कला
जीवनमान
तंत्र
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
102139 वाचन

💬 प्रतिसाद (182)

प्रतिक्रिया

वेगळ्या कोनातून काढलेले फोटोज

किल्लेदार
Mon, 08/25/2014 - 13:46 नवीन
याच वास्तू चे काही वेगळ्या कोनातून काढलेले फोटोज आहेत. ते नंतर शेअर करॆन. आत्ताच टाकले तर मला स्पर्धेतून बाद करतील परिक्षक .
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हाहा!

पैसा
Mon, 08/25/2014 - 16:17 नवीन
बाद करणार नाही, पुढचे फोटो स्पर्धेसाठी नाहीत म्हणून तिथेच लिहून टाकू! पण या फोटोंचा एक धागा अवश्य काढा! खूपच छान होईल!
↩ प्रतिसाद: किल्लेदार

माझी चित्रे

सर्वसाक्षी
Mon, 08/25/2014 - 00:47 नवीन
१) रामसिस द्वितिय, अबु सिंबेल - इजिप्त. भव्य मंदिर हा स्थापत्याचा नमुना. आणि ते मंदिर हलवुन पुन्हा बांधणे हा स्थापत्याचा चमत्कार Image removed. Camera NIKON D60 Lens - Focal Length 18mm Exposure 1/250 F Number f/8 ISO 200 Camera make NIKON CORPORATION २) जयपुरचा सुप्रसिद्ध हवामहल Image removed. Camera C770UZ Lens - Focal Length 14.8mm Exposure 1/200 F Number f/4 ISO 64 ३) राजपुतांचा मानबिंदु असलेल्या चितोडगढ येथील विजयस्तंभ Image removed. Camera C770UZ Lens - Focal Length 8.2mm Exposure 1/800 F Number f/4 ISO 64

माझी प्रवेशिका

जुइ
Mon, 08/25/2014 - 04:14 नवीन
स्प्लिट रॉक लाईटहाउस - मिनेसोटातील लेक सुपिरिअरच्या काठावरील उंच खडकावर वसलेल्या या दीपस्तंभामुळे गेल्या शतकात बोटींचे अनेक अपघात टळले आहेत. १९६९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जसेच्या तसे राखून ठेवण्यात आले आहे. Image removed. कॅमेरा - सोनी नेक्स ५ एन डॉल्बी थिएटर हॉलिवूड कॅलिफोर्निया (पूर्वीचे कोडॅक थिएटर) - ऑस्कर पारितोषिक सोहळा येथे पार पडतो. Image removed. कॅमेरा - निकॉन एस एक्स ५७० मात्री मंदीर औरोविल - स्वामी अरविंद यांच्या आश्रमाच्या मध्यभागी वसलेले आहे. Image removed. कॅमेरा - कॅनन एस एक्स १२० आय एस; या चित्रावर पिकासाचे ऑटो एनहान्स वापरले आहे.

दुरुस्ती

आतिवास
Mon, 08/25/2014 - 11:44 नवीन
तिस-या प्रकाशचित्राच्या माहितीत काही दुरुस्ती: "मातृमंदिर" "योगी" अरविंद किंवा श्री अरविंद (त्यांचा "स्वामी" असा उल्लेख माझ्या वाचनात कधी आला नाही; कदाचित काही लोक तसा उल्लेख करत असतीलही) हे स्थान अरविंद आश्रमाच्या मध्यभागी नसून त्यापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर आहे. इथं अधिक माहिती आहे.
↩ प्रतिसाद: जुइ

आभारी आहे

जुइ
Mon, 08/25/2014 - 17:45 नवीन
पर्यटक म्हणून घाईगडबडीत भेट दिल्याने चूकीची माहिती दिल्या गेली. याबद्दल क्षमस्व. यापुढे अधिक काळजी घेईन.
↩ प्रतिसाद: आतिवास

"क्षमस्व" ची गरज नाही हो!

आतिवास
Wed, 08/27/2014 - 13:14 नवीन
"क्षमस्व" ची गरज नाही हो! मला माहिती होती; म्हणून दुरुस्ती केली इतकंच!
↩ प्रतिसाद: जुइ

अप्रतिम फोटो येतायेत जेब्बात

स्पा
Mon, 08/25/2014 - 11:51 नवीन
अप्रतिम फोटो येतायेत जेब्बात मझा आ गया :)

झकास!

पैसा
Mon, 08/25/2014 - 12:02 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद!

अजिंठा लेणी क्र. १८ & फॉन्तेनब्लू फ्रांस

प्रशांत
Mon, 08/25/2014 - 17:35 नवीन
अजिंठा लेणी क्र. १८ Image removed. फॉन्तेनब्लू , फ्रांस Image removed.

उपरोल्लेखित चैत्यगृह १८

प्रचेतस
Mon, 08/25/2014 - 20:05 नवीन
उपरोल्लेखित चैत्यगृह १८ क्रमांकाची लेणी नसून २६वी आहे. ह्यातच महापरिनिर्वाण आणि मारविजयचे प्रसंग शिल्पांकीत केलेले आहेत.
↩ प्रतिसाद: प्रशांत

अरे नक्की कितव्या क्रमांकाची?

प्यारे१
Mon, 08/25/2014 - 21:07 नवीन
अरे नक्की कितव्या क्रमांकाची? १७, १८ की २६
↩ प्रतिसाद: प्रचेतस

२६

प्रशांत
Tue, 08/26/2014 - 10:39 नवीन
काय प्यारे.... वल्ली बोल्ला ना २६ तरी सुद्धा प्रश्न.
↩ प्रतिसाद: प्यारे१

स्पर्धेसाठी नाही

प्रचेतस
Mon, 08/25/2014 - 21:14 नवीन
स्पर्धेसाठी नाही पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराची पार्श्वभिंत. Image removed.

सर्व चित्रे आवडली.

रेवती
Tue, 08/26/2014 - 04:59 नवीन
सर्व चित्रे आवडली.

त्वरा करा!

पैसा
Tue, 08/26/2014 - 10:49 नवीन
आज स्पर्धेत भाग घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

किती वाजेपर्यंत

एस
Tue, 08/26/2014 - 19:57 नवीन
आणि आयएसटी का इडीटी? :-)
↩ प्रतिसाद: पैसा

हाहा!

पैसा
Tue, 08/26/2014 - 20:16 नवीन
वाटलंच होतं, कोणतरी विचारणार म्हणून. मला वाटतं, जास्तीत जास्त लोकांना भाग घेता यावा म्हणून आपण पी एस टी रात्री १२ पर्यंत एन्ट्र्या घेऊयात!
↩ प्रतिसाद: एस

मतदान सुरू होण्याची वेळ

श्रीरंग_जोशी
Tue, 08/26/2014 - 20:45 नवीन
मग मतदान सुरू होण्याची वेळ नेमकी कोणती? मला वाटले होते भाप्रवे २७-ऑगस्ट-२०१४ ००:००:०१ वाजता.
↩ प्रतिसाद: पैसा

मग

पैसा
Wed, 08/27/2014 - 00:11 नवीन
तुमच्या हिरव्या देशातले लोक ओरडले असते ना, शिवाय १९ ला धागा टाकायला तसा उशीर झाला होता. आता पी एस टी आणि भा प्र वे यात १२.३० तासांचा फरक आहे ना, म्हणजे सगळ्यांना पुरेसा वेळ मिळेल.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरं बरं

श्रीरंग_जोशी
Wed, 08/27/2014 - 00:25 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे हिरव्या देशातले लोक शांतताप्रेमी आहेत ;-). बादवे, मतदानासाठी एखादी आदर्श पद्धत असावी असे सुचवतो. उदा. प्रतिक्रियेमध्ये सदस्याने लिहावे
  • मत # १ - अबक यांचे दुसरे चित्र
  • मत # २ - कखग यांचे पहिले चित्र
  • मत # ३ - अबक यांचे पहिले चित्र
यापेक्षा अधिक सुटसुटीत पद्धत कुणी सुचविल्यास उत्तमच.
↩ प्रतिसाद: पैसा

मी काढलेली छायाचित्रे

Keanu
Tue, 08/26/2014 - 11:06 नवीन
१. सिअ‍ॅटल शहारात १९६२ मधे World's Fair साठी बांधण्यात आलेलं ज़गवि़ख्यात Space Needle. अमेरीकेच्या पश्चिम किनार्‍यावरील त्याकाळातील सर्वात उंच इमारत. Image removed. (20mm, f/16, 1/2500, ISO 100) २. शिंदे छत्री - महादजी शिंदे यांची वानवडी, पुणे येथील समाधी. Image removed. (18mm, f/22, 1/100, ISO 100) ३. गम वॉल (Gum Wall) - फेसबुक वॉल तशी आमच्या गावच्या बाजारातील गम वॉल. १९९३ साली सिअ‍ॅटल पाईकप्लेस मार्केट मधील थिएटरच्या बाहेरील भिंतीवर एका प्रॉडक्शनच्या माणसाने चुईंगम चिकटवून त्यावर एक पेनी चे नाणे डकवले. थिएटरमधे काम करणार्‍या कामगारांनी ते साफ करण्याच्या प्रयत्न केला परंतु भिंत साफ नाही झाली. हळूहळू पाईकप्लेस फिरायला येणार्‍या पर्यटकांनी भिंतीवर चुईंगम लावायला सुरवात केली. आणि त्यातून तयार झालेली ही गम वॉल. Image removed.

चला ह्या निमित्ताने

सुहास झेले
Tue, 08/26/2014 - 12:21 नवीन
चला ह्या निमित्ताने मिपाकरांकडून फोटोंची पर्वणी मिळाली आहे....चला माझ्याकडून पण तीन प्रवेशिका. फोटो फक्त पिकासा अपलोडरने कम्प्रेस केलेले आहेत. १. वेरूळ - कैलाश मंदिर Focal Length: 15.4mm, Exposure: 1/250 sec, ISO: 80, Camera: SONY DSC-W370 . Image removed. २. किल्ले तोरणा - झुंजार माची ( Focal Length: 10.1mm, Exposure: 1/200 sec, ISO: 200, Camera: SONY DSC-W370 ) . Image removed. ३. एलिफंटा लेणी (घारापुरी) (Focal Length: 10.1mm, Exposure: 1/30 sec, ISO: 200, Camera: SONY DSC-W370) . Image removed.

सगळे

जुइ
Tue, 08/26/2014 - 19:42 नवीन
फोटो खुपच सुंदर आहेत. सर्वांना स्पर्धेसाठी खुप शुभेछा Image removed.

सुरेख फोटो !!!

राघवेंद्र
Tue, 08/26/2014 - 19:56 नवीन
स्पर्धेसाठी खुप शुभेच्छा !!! All The Best !!!

कुठे कधी कसे करायचे मद्दान?

अजया
Wed, 08/27/2014 - 08:02 नवीन
कुठे कधी कसे करायचे मद्दान?

मलाही हेच विचारायचे आहे.

श्रीरंग_जोशी
Wed, 08/27/2014 - 08:57 नवीन
धाग्यात जे लिहिले आहे त्यानुसार प्रतिसादांद्वारेच मत द्यायचे आहे असा अंदाज आहे. जाहीर आवाहन - अलास्का,हवाई, ताहिती, फिजी स्थित मिपाकरांनो लौकरात लौकर फोटोज टाका अन मतदानाचा मार्ग मोकळा करा.
↩ प्रतिसाद: अजया

विनंती

समर्पक
Wed, 08/27/2014 - 09:08 नवीन
आता मतदान चालू होण्यापूर्वी प्रवेशिकांव्यतिरिक्त सर्व प्रतिसाद उडवले तर माझ्यामते तुलना सोपी जाईल, व निष्पक्ष होईल. व धागाही छान स्वच्छ दिसेल

मतदान

पैसा
Wed, 08/27/2014 - 10:31 नवीन
अवांतर प्रतिसाद काढायची गरज वाटत नाही. मतदान धाग्यात म्हटल्याप्रमाणे या धाग्यावरच करायचं. श्रीरंग जोशींची पद्धत बरोबर आहे. त्यातूनही आणखी एका प्रतिसादात मी लिहिले होते की ज्यांना आपण कोणाला मत दिले आहे हे इतरांना कळू द्यायचे नसेल त्यांनी संपादक मंडळ आयडीला व्यनि करा आणि इथे फक्त व्यनि पाठवल्याची नोंद करा. म्हणजे लगेच व्यनितील मतही मोजले जाईल.

ज्योतिजी, फक्त फोटो आणि गुणांक असा धागा हवा!

संजय क्षीरसागर
Wed, 08/27/2014 - 13:04 नवीन
या पोस्टवरच सगळे प्रतिसाद आले तर फोटोंची मजा राहाणार नाही.
↩ प्रतिसाद: पैसा

मतदान पद्धत

संजय क्षीरसागर
Wed, 08/27/2014 - 13:17 नवीन
श्रीरंगनं सुचवलंय :
उदा. प्रतिक्रियेमध्ये सदस्याने लिहावे मत # १ - अबक यांचे दुसरे चित्र मत # २ - कखग यांचे पहिले चित्र मत # ३ - अबक यांचे पहिले चित्र
१) त्यापेक्षा, प्रत्येक स्पर्धकाचे एकाखाली एक सलग तीन फोटो असा नवा धागा असावा. २) पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत १ ते ... असा रनींग नंबर द्यावा. ३) सदस्यांनी प्रतिसादात : फोटो क्रमांक ... - १ गुण फोटो क्रमांक ... - २ गुण फोटो क्रमांक .... - ३ गुण लिहीलं की झालं!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सगळे फोटो मस्त आहेत , आवडले .

दिव्यश्री
Wed, 08/27/2014 - 16:00 नवीन
सगळे फोटो मस्त आहेत , आवडले . :)
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा