✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंत्रयोग - जपयोग

अ
अनिल तापकीर यांनी
गुरुवार, 07/17/2014 - 16:32  ·  लेख
लेख
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
70530 वाचन

💬 प्रतिसाद (434)

प्रतिक्रिया

पण

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/24/2014 - 17:26 नवीन
गीताप्रेसने शांकरभाष्य मराठीत अनुवादीत करुन छापलेले नाहीये ...किमान अजुन तरी ... आम्हाला हिंदीतच वाचावे लागते ... हा सरळ सरळ मराठी भाषिकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे .... त्याचा आम्ही तीव्र शव्दात निषेध्द करतो *beee* ( ३ च राहिलेत रे ...४०० वा प्रतिसाद टंकायचा मान मला पाहिजेल यंदा )
↩ प्रतिसाद: प्यारे१

पण शांकरभाष्य अन्य प्रकाशनाने

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 17:29 नवीन
पण शांकरभाष्य अन्य प्रकाशनाने छापले असेलच की मराठीत, भागवत बुक डेपोमध्ये चौकशी केली पाहिजे अप्पा बळवंत चौकात.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 17:27 नवीन
भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण न गृह्यतां वचः', कारण शेवटी आचार्यांचा अद्वैतमत प्रस्थापित करायचा अजेंडा होता. अजेंडाविरहित बुकं वाचणं हे सर्वोत्तम.
↩ प्रतिसाद: प्यारे१

अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 17:32 नवीन
अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते फार वरचं टोक आहे. बाकी ह्याच अजेंडा वाल्या शंकराचार्यांनी अत्यंत सुंदर भक्तिस्तोत्रं (द्वैतवादी?) रचली आहेत. अर्थात सिस्टीमचा वापर करुन काम नाही झालं तर सिस्टीम फेल. काम झालं तरी नंतर सोडावीच लागणार. त्यामुळं सिस्टीमचं अवडंबर नको.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सिस्टीमचं अवडंबर हे

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/24/2014 - 17:34 नवीन
सिस्टीमचं अवडंबर हे समष्टीच्या व्यामिश्रते इतकेच गहन असते *lol*
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हणजे काय हो?

धन्या
गुरुवार, 07/24/2014 - 17:46 नवीन
म्हणजे काय हो?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 18:15 नवीन
गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द ट्यून' मध्ये याचं स्पष्टीकरण मिळेल. ;)
↩ प्रतिसाद: धन्या

तुम्ही आधी दासबोध वाचुन या मग

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/24/2014 - 18:17 नवीन
तुम्ही आधी दासबोध वाचुन या मग तुम्हाला कळेल *biggrin*
↩ प्रतिसाद: धन्या

स्तोत्रे छानच आहेत याबद्दल

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 17:36 नवीन
स्तोत्रे छानच आहेत याबद्दल शंका नाही. संस्कृतात यमक हा फंडा त्यांच्या सोडून अन्य कुणाच्या रचनेत असल्याचे आजवरच्या तुटपुंज्या वाचनातून दिसले नाही. अद्वैतमताबद्दल ज्ञानेश्वरांची 'साडेपंधरेया-सोलेया' इ.इ. कमेंट मस्त आणि एकदम नेमकी आहे. ते एक असोच. बाकी कोण कसलं अवडंबर माजवतंय ते स्वयंस्पष्ट आहेच.
↩ प्रतिसाद: प्यारे१

सिस्टीमला बळंच फेकून देणं हे

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 18:01 नवीन
सिस्टीमला बळंच फेकून देणं हे 'नो सिस्टीम' च्या सिस्टीमचं एक अवडंबरच. :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सिस्टिमला बळंच फेकून देण्याची

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 18:14 नवीन
सिस्टिमला बळंच फेकून देण्याची व्याख्या मनाप्रमाणे करणं हे तर सर्वांत मोठं अवडंबर. आपल्या मनी काहीएक सिस्टीम असावी, तीच लोकांनी फॉलो नै केली तर भ्यँऽऽऽ! करावे हे मोठेच अवडंबर. ज्यांना जमते त्यांचा हेवा वाटतो खरा. :)
↩ प्रतिसाद: प्यारे१

व्हेरीफाईड अ‍ॅण्ड टेस्टेड आहे

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 19:44 नवीन
व्हेरीफाईड अ‍ॅण्ड टेस्टेड आहे हो ती. आमचा आग्रह नाही ब्वा! ज्यांनी अनुभव घेतला त्यांचं म्हणणं आहे ते. ते वाचलं आहे का तुम्ही? समजून वाचा बरं. ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सोयीस्कर समजुती करून घेण्याचा

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 19:48 नवीन
सोयीस्कर समजुती करून घेण्याचा आग्रह बाकी हभप पणाला साजेसाच आहे हो ;)
↩ प्रतिसाद: प्यारे१

आधुनिकोत्तर बुवा, तुम्ही

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 19:51 नवीन
आधुनिकोत्तर बुवा, तुम्ही म्हणाल तसं. ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठीके इस्माईलभाई.

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 19:57 नवीन
ठीके इस्माईलभाई. वो थोडा कोनों मे भी साफ करो यारो ;) -बॅटमॅन फेकू.
↩ प्रतिसाद: प्यारे१

परमार्थेण न गृह्यतां वचः|

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/24/2014 - 17:36 नवीन
परमार्थेण न गृह्यतां वचः| ह्या मंत्राचा अर्थ काय ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

इथे अर्थ 'दिल पे मत ले',

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 17:39 नवीन
इथे अर्थ 'दिल पे मत ले', अर्थात, पूर्णपणे आहे तसे घ्यायचे कारण नै.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

४००!

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 17:29 नवीन
४००!

४०१ !!

सूड
गुरुवार, 07/24/2014 - 17:33 नवीन
४०१ !!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धागा ४२० पर्यंत तरी पोचलाच

शिद
गुरुवार, 07/24/2014 - 18:07 नवीन
धागा ४२० पर्यंत तरी पोचलाच पाहीजे. ;)

थोडक्यात सांगा

पैसा
गुरुवार, 07/24/2014 - 18:23 नवीन
सगळ्या चर्चेचं सार थोडक्यात सांगा.

सार

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 18:33 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: पैसा

रसम, सार, सांबार... भात के

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 18:42 नवीन
रसम, सार, सांबार... भात के साथ आहाहा!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पैसा तै, हे घ्या वरील सगळ्या

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 18:48 नवीन
पैसा तै, हे घ्या वरील सगळ्या चर्चेचं सार.
↩ प्रतिसाद: प्यारे१

५०० वी प्रतिक्रिया मी टाकणारे

यशोधरा
गुरुवार, 07/24/2014 - 18:26 नवीन
५०० वी प्रतिक्रिया मी टाकणारे. आधीच सांगून ठेवते. आता सुरु र्‍हाऊंद्यात. पटापटा पोस्टा. ४९९ झाले की सांगा, येतेच.

४०० आणि ४२० दोन्हींचा मान

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 19:31 नवीन
४०० आणि ४२० दोन्हींचा मान माझा! येऽऽऽ!

एकदा अनिल तापकीरांना भेटायला

कवितानागेश
गुरुवार, 07/24/2014 - 19:36 नवीन
एकदा अनिल तापकीरांना भेटायला हवं. फार पुण्यवान आहेत ते. :)

झालं.... जरा एखाद्याचं बरं

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 19:42 नवीन
झालं.... जरा एखाद्याचं बरं झालेलं बघवत नाही ह्या लीमाऊला. अज्जिबात भेटू नकोस. पुण्य घेऊन येशील त्यांचं सगळं. नैसर्गिक नियमानुसार जिथं जे नाही तिथं ते येऊन समतोल साधण्याचा प्रयत्न होतो ना? ;)
↩ प्रतिसाद: कवितानागेश

..पण माझ्याकडे सगळंय. मला

कवितानागेश
गुरुवार, 07/24/2014 - 19:45 नवीन
..पण माझ्याकडे सगळंय. मला काहीच कमी पडत नाही. :)
↩ प्रतिसाद: प्यारे१

मंत्रावेगळा

कपिलमुनी
गुरुवार, 07/24/2014 - 20:01 नवीन
ऐतिहासिक धाग्यावर आमचीही पिंक ;)

मंत्रावेगळा ळॉळ

बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 20:05 नवीन
मंत्रावेगळा ळॉळ =)) या धाग्यावर ५०० झालेच पाहिजेत. संपादक मंडळी, प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ब्रेकर नका ना लावू. मिपाच्या गौरवशाली इतिहासात आजवर एकही धागा पञ्चशतकी नै झालेला. तो बहुमान याला घेऊ द्या नं प्लीज! _/\_
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मिपाच्या गौरवशाली इतिहासात

शिद
गुरुवार, 07/24/2014 - 20:15 नवीन
मिपाच्या गौरवशाली इतिहासात आजवर एकही धागा पञ्चशतकी नै झालेला. तो बहुमान याला घेऊ द्या नं प्लीज!
आमेन! *biggrin*
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रदीर्घ चर्चेत निदान तीन लोकांना तरी नेमका मुद्दा कळला!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/24/2014 - 20:44 नवीन
पहिली गोष्ट, पिरा पूर्वग्रह सोडून वाचू शकली, त्यामुळे तिला नेमका मुद्दा उचलता आला. पूर्वग्रहरहित चित्त हा आकलनातला प्रथम चरण आहे. नवी गोष्ट समजायला सर्व पूर्वधारणा सोडायची तयारी हवी, मग त्या कितीही जिवलग असोत आणि कितीही काळ जपलेल्या असोत. पिरानं हा मुद्दा अचूक पकडला आहे :
लहानपणी जर आपल्याला "मिसळपाव" हा एक देव आहे.. असं सांगितलं असतं.. तर "श्रीराम" हा जप करुन जे साध्य होतं तेच "श्री मिसळपाव" ह्या नामस्मरणाने सुद्धा होईल. एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा.. लाखो वेळा तेच घोकल्यावर मेंदुला फटिग येऊन भास होणं शक्य नाही का?
ईश्वर ही प्रत्येकाची अज्ञानमूलक धारणा आहे आणि मंत्र किंवा जपानं त्याप्रत पोहोचू ही तिची उप-धारणा आहे. पहिली व्यर्थ आहे त्यामुळे दुसरीही व्यर्थ आहे. पिराच्या जे लक्षात आलंय, तेच मी चर्चेतल्या प्रथम प्रतिसादात सांगितलं होतं:
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात. या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad.
आता जर कुणाला, अध्यात्म नक्की काय आहे समजावून घ्यायचं असेल तर माझा, लेखकाला दिलेला हा प्रतिसाद वाचा :
अनीलजी, तुम्हाला (आणि सर्वांना) उपयोग व्हावा म्हणून अंतिम वस्तुस्थिती विषद करुन, सांगता करतो. शांतता ही प्रथम आणि अंतिम आहे. शांती, ईश्वराच्या स्वरुपाचा एक महत्तम पैलू आहे कारण ईश्वर अनुच्चारणीय आहे. त्याचं व्यापकत्त्व कोणत्याही मंत्रात, शब्दात किंवा ध्वनीत बसू शकत नाही. त्यामुळेच तर जगातल्या सर्व ग्रंथांची सांगता, `ॐ शांती: शांती: शांती:' अशी केली जाते. मन हा ध्वनी आहे आणि तो शांत झाल्याशिवाय आपण, त्या चिरस्थायी आणि आदिम शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. थोडक्यात, वैश्विक शांती आणि आपलं मूळ स्वरुप एकच आहे, हा आपला अनुभव होऊ शकत नाही. तस्मात जगातला कोणताही मंत्र कुणालाही शांततेप्रत नेऊ शकत नाही. वास्तविकात मंत्र किंवा मनाची अविरत बडबड हाच स्वरुपाचा उलगडा होण्यातला एकमेव अडथळा आहे. त्यामुळे एकीकडे मन संपूर्ण सक्रिय करत (वैखारी, मध्यमा, पश्यंती), ते सर्वस्वी नियंत्रणा बाहेर गेल्यावर (परा), शांत्योपलब्धी असंभव आहे. It is impossible to get connected to oneself. One can never be at peace. खरं तर कोणताही शब्द उमटण्यापूर्वी शांतता आहे. त्यामुळे संस्कृत काय की जगतली कोणतीही भाषा काय केवळ व्यक्तींमधल्या संभाषणाची सोय आहे. तुम्हाला संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, फ्रेंच कळण्याची काहीही गरज नाही. सर्व संस्कृत आणि तथाकथित धार्मिक पांडित्य व्यर्थ आहे आणि कोणताही ग्रंथ समजण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला, तुमच्या आप्तांशी संवाद साधता येणारी भाषा, पुरेशी आहे. शांतता हा अनिर्मित मंत्र आहे आणि तो तुम्हाला जन्मतःच उपलब्ध आहे. या आकलनासाठी, शहरी धकाधकीच्या जीवनात, सारं आयुष्य पणाला लावून, जगातल्या सर्व साधनांचा अभ्यास मला करावा लागलायं. तुम्ही निसर्गाच्या निकट आहात त्यामुळे नशीबावान आहात. भाषा आणि पांडित्याविषयी तुमचा सर्व न्यूनगंड झुगारुन द्या. अत्यंत थोडक्यात, आदिम वैश्विक शांतता, मनाच्या बिंदूवर प्रस्थपित होणं ही सिद्धत्वाची स्थिती आहे. अशा व्यक्तीची मनावर संपूर्ण हुकूमत असते. अशी व्यक्ती हवं तेव्हा मनाचा उपयोग करु शकते आणि इतर वेळी त्या आदिम शांततेशी एकरुपतेचा आनंद घेते. शांतता हीच ईश्वर आहे आणि तिच्याशी समरुपता तुम्हाला शांत करते, इतका सोपा मथितार्थ आहे.
वरचा प्रतिसाद हे माझ्या अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. ते तुम्हाला ही कळणं विषेश अवघड नाही. कारण ती अदिम शांतता आणि आपण एकच आहोत. शांतता एकच आणि अविभाज्य असल्यानं तिच्यासाठी प्रयत्न करणं हाच ती गवसण्यातला अडथळा आहे. हे एकदा समजलं की मग तुम्ही देखिल तथाकथित देव, कर्मकांड, जपजाप्य यातून सर्वस्वी मोकळे होऊन स्वच्छंद जगू शकता. फक्त, पूर्वग्रह सोडून शांतपणे वाचता यायला हवं!

+१०००००००००००००००००००००००००००

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 07/24/2014 - 20:59 नवीन
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा