महाभारत
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते,
जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते,
छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार
झगडावे लागते,
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय,
जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय,
तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय,
हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !!
इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय,
माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय,
दूरदूरवर पसरलाय अन्याय,
न्याय माञ कुठेतरी हरवलाय,
हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !!
मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत,
शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला लागलेत,
विश्वासाला तर कित्येकजण यमसदनी धाडलाय टपलेत
हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !!
इथे रोजच होतेय स्ञियांचे विडंबन,
नाक्यानाक्यावर दिसतायत दुर्योधन आणि दुशासन,
काही न पाहणार्या धृतराष्ट्रासारखे आंधळे झालेय प्रशासन
हे जीवन एक महाभारत झालेय भाऊ !!
जिंकायची आस ठेवली तरी बरेचसे गमवावे सुद्धा लागतं,
मोह किती झाला तरी आपलं काय परकंसुदधा जपावे लागतं,
कृष्ण काय आणि अर्जुन काय
इच्छा असो वा नसो प्रत्येकाला
इथे लढावचं लागतं
हे संस्थळ मिपा आहे ना भाऊ
.
किंवा
इथे रोजच होतेय स्ञियांचे
आदर करतो
आयला!
ञास हा की
हे g.one मिसळपाव आहे,
जेपी, हे तुमच्या खास आग्रहाखातर !
आवडला
काय सांगतायं? हा घ्या आणखी एक!
वा वा
हे फेसबुकावर वाचले होते ,
हो