मुंबई - पुणे - मुंबई
लेखनविषय (Tags)
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी .
टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही .
तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक..
तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू .
मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची ..
तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं .
तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ..
तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )
खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) .
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो .
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)
मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं .
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे .
१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )
मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .
२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..
३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात .
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो.
४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो .
५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)
६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात .
७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ..
८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ).
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात.
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)
१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात.
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .)
११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)
१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.
असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
प्रतिक्रिया
मूळ मुद्दा मुंबईची भौगोलिक
सु
@अरे मुंबाई सोडली तर उर्वरित
एकाच प्लास्टिकच्या पिशवीत
ओ काका!
आमची पोष्ट कोणतीही असो. तसा
अरे धाग्यात कोकण काढू नका....
>>ही दळभद्री वृत्ती कोकणातून
बाटलेला फकिर मोठ्याने बांग
जी महाराष्ट्रात यायला लोकांनी
जी महाराष्ट्रात यायला लोकांनी जीव दिला तिथं महाराष्ट्राची मराठी बोलायला लोकांना लाज वाटते.हा एकतर बहुतांश लोकांनी चुकीचा काढलेला निष्कर्श आहे किंवा जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा. साधा सरळ हिशोब आहे, एखाद्याशी संवाद साधताना कम्युनिकेशन होणे महत्वाचे. मुंबईत हे एक गावखेडॅ वा छोटेमोठे शहर नसून मेट्रोसिटी आहे, इथे अठरापगड जातीप्रांताचे लोक आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना सामाईक अश्या राष्ट्रभाषेतच बोलणे सोयीचे पडते. मागाहून समजले की आपण दोघेही मराठी आहोत तर मराठीतच बोलणे सुरू होते. यात लाज वा अभिमान हे दोन्ही कुठेच हिशोबात येत नाहीत.सायगल साहेब
+ ७८६
मुंबईत आलेला कोकणी माणूस आपली कोकणाशी नाळ तोडत नाही तर अभिमानाने जपतो.+७८६ कोकणी चाकरमान्यांना नेहमीच मुंबई आपली वाटते. कदाचित एकच सागरकिनारा जोडत असल्याने असावे, येथील हवा पाणी माती आपलीच वाटते. शहरात राहणार्या कोकणवासीयांना आपले गाव कोकणात आहे जसे वाटते तसेच कोकणात राहणार्यांना आपले शहर मुंबई आहे अशीच भावना असते. आणि म्हणूनच हे कोकण-मुंबईचे नाते, मुंबईतून मराठी माणूस कधीच हद्दपार होऊ देणार नाही .!जाता जाता -- मुंबई कोकणातच
तुम्ही साड्या विकत घ्यायला
ही दळभद्री वृत्ती कोकणातून
चोक्कस!
चितळे बंधू च्या दुकानात लोणी
ओ हॅलो
उलट पुण्यात व्यवसाय करणे फायद्याचे नाही का?
च्च! च्च! असे काय ते?
अगदी मनातले लिहलेत
अजून ७१ च?? पुर्वी असे धागे
म्हंजे काय!
मुलुंडच्या अलिकडं मुम्बई आणि
हॅ हॅ
हल्ली मुंबै कर्जतपर्यंत
सूड साहेब,
एकदम कडक प्रतिसाद.
आता
डॉक्टर..
+१
सुड साहेब
हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे
हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असे नाही. हडपसरला राहून रोज हिंजवाडी(कि हिंजवडी) ला आपल्या दुचाकीवर किंवा कंपनीच्या बसने प्रवास करणारे लोक पुण्यातही आहेतच.सहमत आहे, म्हणजे पुण्याचे मला माहीत नाही पण हे कोणत्याही शहराला लागू होतेच. आता बदलापूर-विरारला राहून जर ट्रेनचा तासदोनतासांचा प्रवास करावा लागतो म्हणून मुंबई वाईट म्हटले तर हे का लक्षात घेत नाही की मुंबई हे शहर लाखो लोकांना रोजगार मिळवून देते. कुछ तो बात है यार मुंबईमध्ये म्हणून ती एवढ्या वर्षांमध्ये पसरतच चालली आहे. जागांचे भाव गगनाला भिडत चाललेत ते का उगाचच म्हणून. तीस हजार रुपये तोळा किंमत सोन्यालाच असते चांदीला तो भाव येत नाही. त्यामुळे या निकषावर तर मुंबई सर्वश्रेष्ट आहेच.... तसेच सुबोध खरे यांच्या वर्क कल्चरच्या पोस्टला तर +७८६^+७८६ मुंबई याच साठी ओळखली जाते. वरच्या पोस्टमध्ये हेच चुकीच्या आणि नकारात्मक अँगलने बघितले जातेय बस्स.दादा, मुंबैचं किंवा पुण्याचं
चिंता नसावी, मला दुसर्याची
अर्थातच, ती काडी तुमची नाही
कशाला रक्त आटवताय
थोडक्यात तुझी टिका मुंबईवर
कारण मुंबईची कार्य संस्कृती
मुंबई च्या बाहेर देखील
लहान गावात किंवा शहरात
मुंबईव्यतिरिक्त इतर शहरांनी
+१
वरच्या कमेंट्स बघता नावडतीचं
वरच्या कमेंट्स म्हणजे मुंबई
लोड शेडींग हे त्यात्या
नालीत हात टाकण्याची इच्छा
@यशोधरा
अहो दादा, वैयक्तिक पातळीवर
हे क्रॉस-सबसिडी प्रकरण काही
Pagination