✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

युरोप मधील धमाल मिपा.कट्टा (म्युनिक मधला) - समाप्ती

द
दिव्यश्री यांनी
Wed, 04/02/2014 - 13:58  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/27348 हि पहिल्या भागाची लिंक आहे. डखाऊ कॅम्प वरून थोडेसे हिरमुसून आम्ही बशी ईष्टोप्वर आलो. तिथून ट्रेणीत बसलो . ज्या गफ्फा रंगल्या काही विचारू नका . लैम चा ष्टोप कंदी येउन गेला समजलेच नाय . एक अगदी वयस्कर आजी आमच्या गफ्फांकडे लक्ष देत होत्या त्यानाही कळल नाही कि स्टोप कधी येउन गेला . :( मग त्याही आमच्या बरोबरच पुढच्या थांब्याला उतरल्या आणि तिथून मग आमची वरात लैमला आली . :D लैम ष्टेषण ला उतरून चाली चाली करत घरी आलो . बशीला वेळ होता म्हणून चाली चाली . घरी आल्यावर आधी पाणी मग चहा . एकीकडे गफ्फा दुसरी कडे कांदा पोहेंची तयारी . मज्जाच मज्जा होती . एका क्षणी मी अतिशय भावूक झाले आणि रडलेच . परदेशातल्या माझ्या या छोट्याशा घरी , संसारात आज पहिल्यांदाच जेष्ठ आणि श्रेष्ठ तसेच मायेच्या व्यक्ती आल्या होत्या ते म्हणजे पेठकर काका आणि काकू . हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं :( ना सासू-सासर्यांनी . पहिले दांपत्य पेठकर काका काकू आहेत जे इथे घरी आले हे आम्ही दोघेही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. :) . पोहे खाताना ...श्री निनाद यांचे प्रवचन तल्लीणतेणे ऐकताणा श्रोतागण . ;) :D थोडस सावरल्यावर पुन्हा पोह्यांकडे वळले . मनात इतकी धाकधूक होती मी काकूंना पोहे कसे होतील काय माहिती हा आणि अशा आशयाचे किती प्रश्न किती वेळा विचारले देवच जाणे . काकू सतत मला सांगत होत्या अग काळजी करू नको छानच होतील ई. पण कोणफीडन्सच नाही आधीपासून मग काय *beee* . त्यात काकांसारख्या व्यक्ती समोर काहीतरी करायचं म्हणजे बालवाडीतल्या मुलीने पीएचडी / अजून जी मोठी डिग्री असेल ती झालेल्या व्यक्तीसमोर काय करावे . करून करून काय करणार . पोहे झाले . त्यात कांदा , बटाटा आणि मटार घातले . कसे झाले होते परमेश्वर जाणे . पण काका काकू आणि श्री निनाद , प्यांटवालं( यांना आता सवयच आहे म्हणा ;) ) यांनी ते खाल्ले . मग कॉफी केली . कॉफीपान झाल्यानंतर आमची वरात जगप्रसिध्द अशा माधुशालेकडे निघाली . अगदी हळदी कुंकू लावून मधुशालेत जाणार्या आम्ही दोघी पहिल्याच महिला असू . *LOL* तिथे मस्त आम्ही कोक घेतलं आम्ही सभ्यपुरुषांनी त्याचं पेय घेतलं . :D एकीकडे गोंगाट दुसरीकडे संगीत आणि आमच्या गफ्फा तिसरीकडेच . :P अस चालू होत . एकंदरीत मस्त चालू होत . ते आटोपल्यावर पुन्हा ठेषण तिथून चाली चाली मग घरी . . मधुशालेत पेयाचा आस्वाद घेताणा ...श्री निनाद आणि प्यांटवालं / मिष्टर दिव्यश्री . :D अशाप्रकारे पहिला दिवस संपला . :) दुसर्या दिवशी सकाळी फोण केला काकांना . त्यांना आमंत्रण दिल त्यांनी ते स्वीकारलं त्या बद्दल त्यांची आभारी आहे . त्याप्रमाणे दुपारी चारच्या दरम्यान मला त्यांचा फोण आला कि आम्ही डखाऊ हून निघलो आहोत थोड्या वेळात भेटूया . त्याप्रमाणे पाच वाजता ते आले . निनाद यांचाही फोण आला होताच . नेमके त्याच वेळेस काकाश्री मला फोण करत होते . मग काका काकूंना घेऊन मी घरी आले . चहा घेण सुरु असतानाच ठणाठाण बेल वाजली . खरतर मी विसरूनच गेले होते . मी म्हणाले कि या वेळेस कोण आल आणि जर्मन लोक अशी कशी बेल वाजवतात , आजपर्यंत अस कधीच नाही झालं . *DASH* मग काकू म्हणाल्या अग निनाद असतील मग ट्यूब पेटली . निनाद यांना पेशल चाय करून आम्ही खरेदीला निघालो . घरातून निघेपर्यंत सव्वासहा होऊन गेले होते . मी अक्षरशः सगळ्यांना पळवल कारण आठ वाजता सगळी दुकाने / मौल्स बंद होतात . काकांना टिपणे काढायला वही मिळाली . मला फार बर वाटल . याच साठी केला अट्टाहास . मग तिथून दुसरी कडे तिथे काकांनी आमच्यासाठी( मी आणि निनाद ) खाऊ घेतला जो त्यांनी घरी आल्यावर आम्हाला दिला . तिथे थोडी खरेदी करून परत घरी . घरी येउन सयपाक केला . लैच उशेर झाला व्हता . भज्याची आमटी, पोळ्या , पुरण , साध वरण , भात , तुपाची धार , काकडी असा साधसुधा मेन्यु होता जेवायला . काकांना आमटी तिखट जाळ लागली . असो पुढच्या वेळेस जरा जास्तच साधासुधा मेन्यु ठेवूया , काय काका चालेल णा? . जेवताणा ...पुन्हा एकदा प्रवचनकार आणि श्रोतागण . :P :D निघताना काका काकुंना नमस्कार केला त्यात स्वार्थ जास्तच होता . तो म्हणजे आशीर्वाद . त्यांनी अगदी मस्त आशीर्वाद दिला . भरून पावले मी . काका आणि काकू तुम्हा दोघांचे मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या कडे आलात खूप बर वाटल . आयुष्यभर पुरेल असा आठवणींचा खजिना आमच्याकडे आहे . निनाद यांचेही आभार . . ऐतिहासिक(पक्के) कट्टेकरी . :) खूप मज्जा केली दोन दिवस परदेशात आहे मी अस मला वाटलच नाही . ठेषणवर सोडायला गेलो . ट्रेन आली हे लोक बसले . ट्रेन सुरु झाली जशी जशी ती पुढे सरकू लागली ....वायीट वाटत होत .आता परत कधी भेट होयील असा प्रश्न पडत होता . खरतर या दोन दिवसांमध्ये सगळ्या विषयांवर जोरदार वादविवाद झाले , त्या नादात इष्टोप विसरलो , सगळ झाल . पण हे दोन दिवस माझ्या युरोप मधल्या वास्तव्यातले अतिशय आनंदी , समाधानी असे आहेत . जर पुढे कधी पुस्तक लिहील तर हे दोन दिवस मी त्या पुस्तकामध्ये अतिशय अभिमानाने नमूद करेन .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8873 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

छान!

शुचि
Tue, 04/08/2014 - 23:21 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा