तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही
सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही
जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे,
छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही
किती दयाळू, महान आहेस तू खरोखर
तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही!
तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी
मला उमगले कुठेच माझा पडाव नाही
अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला
तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही
हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने
तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही
अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता
तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही
डॉ.सुनील अहिरराव
तुमची ही कविता जास्त मोकळी
ट्रेडमार्क.....किंचित अवांतर पण जरासे समांतर.
Kurlekar sir, खूप खूप आभार !
सुनिलराव, मस्त..... थोडीफार
छान.
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर,
बदल जीवनाचा स्थायीभाव आहे.
कॉमेंट एडिट करायची सोय नसतॅ
खल्लास!
सुधीर कुळये , धन्यवाद !