✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिक्षा

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 03/06/2014 - 15:58  ·  लेख
लेख
म्या लिवत व्हते. आईशप्पत. तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ” म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.” आदी हाताचेच अंगठे पकाडले. समदी हसाया लागली. गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे. गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले. पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली. केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं. पाय दुखायले. येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा. डोळे पुसले. मान वाकडी करून बायेर पायलं. रस्त्यावर मोत्या बसला व्हता. माज्याकडं तोंड करून. घंटी वाजली. जौन मोत्याच्या गळ्यात हात टाकला. मोत्या मला कदीबी शिक्षा देत न्हाई. शिक्षा फकस्त मान्सं देतेत का? ** शतशब्दकथा अन्यत्र पूर्वप्रकाशित

Book traversal links for शिक्षा

  • ‹ गपचिप
  • Up
  • मद्दान ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
12293 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

मस्त आतीवास ताई, आवडले.

भावना कल्लोळ
गुरुवार, 03/06/2014 - 16:09 नवीन
मस्त आतीवास ताई, आवडले.
  • Log in or register to post comments

+१

सखी
गुरुवार, 03/06/2014 - 23:48 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

समजले नाही!

amit_m
गुरुवार, 03/06/2014 - 16:12 नवीन
समजले नाही!
  • Log in or register to post comments

क्षमस्व!

आतिवास
गुरुवार, 03/06/2014 - 18:06 नवीन
हं! तुमच्यापर्यंत लेखन पोचले नाही; पण त्याबाबत मी काही करू शकत नाही, क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit_m

आवडल .

जेपी
गुरुवार, 03/06/2014 - 16:13 नवीन
आवडल .
  • Log in or register to post comments

शिक्षा फकस्त मान्सं देतेत का?

आयुर्हित
गुरुवार, 03/06/2014 - 16:29 नवीन
ज्यांच्यावर दुसऱ्यांना घडवायची जबाबदारी आहे, त्यांनी शिक्षा दिली तर त्यात वावगे काय? गुरु आणि शासक यांना हा अधिकार नैसर्गिकरित्या प्राप्त होतो. आणि ते सुद्धा देतांना मनातून हळहळतात, शेवटी ती सुद्धा माणसेच असतात. बाकी लेखन खूप छान मजेशीर झाले आहे. "आन्जे"चे लहानपण हुबेहूब समोर आले.
  • Log in or register to post comments

'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा

आतिवास
Fri, 03/07/2014 - 09:22 नवीन
'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा अधिकार' यांसारख्या तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर पुष्कळ काही बोलता येईल. पण इथं ते अवांतर होईल कदाचित ... म्हणजे मी लिहिणं अवांतर होईल. पण विषय महत्त्वाचा आहे, पुढे कधीतरी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

लिहा सवडीने

आयुर्हित
Fri, 03/07/2014 - 21:07 नवीन
नक्कीच आवडेल आम्हाला, लिहा सवडीने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आन्जी सॉल्लिड पात्र आहे. टॉम

आदूबाळ
गुरुवार, 03/06/2014 - 16:51 नवीन
आन्जी सॉल्लिड पात्र आहे. टॉम सॉयर, हक फिन, डेनिस (द मेनेस) यांच्या रांगेत आन्जी फिट्ट बसेल. तै, सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा.
  • Log in or register to post comments

महत्त्वाकांक्षी

आतिवास
Mon, 03/10/2014 - 09:47 नवीन
सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा. फार महत्त्वाकांक्षी कल्पना आहे! बघू, आन्जीत किती जीव आहे त्यावर अवलंबून आहे ते! तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्त..

योगी९००
गुरुवार, 03/06/2014 - 17:05 नवीन
आवडेश..
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

प्रचेतस
गुरुवार, 03/06/2014 - 23:41 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

_/\_

आत्मशून्य
गुरुवार, 03/06/2014 - 23:43 नवीन
म्या चालली बायेर. तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत. पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”
क्लास.
  • Log in or register to post comments

अतिशय परिणामकारक!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/07/2014 - 00:35 नवीन
अतिशय परिणामकारक!
  • Log in or register to post comments

अतिशय परिणामकारक!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/07/2014 - 00:35 नवीन
अतिशय परिणामकारक!
  • Log in or register to post comments

आंजी खोट नाही बोलायची.

स्पंदना
Fri, 03/07/2014 - 07:18 नवीन
आंजी खोट नाही बोलायची. उगा शिक्षा दिली मास्तरांनी. खवट कुठचे!! मास्तर झाल म्हणजे अगदी अमेरिका समजतेत स्वत्;ला. अतिवास ताई मस्त.
  • Log in or register to post comments

आन्जी रॉक्स.

प्रीत-मोहर
Fri, 03/07/2014 - 08:00 नवीन
आन्जी रॉक्स.
  • Log in or register to post comments

वाचतेय.

यशोधरा
Fri, 03/07/2014 - 09:27 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments

आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही

कानडाऊ योगेशु
Fri, 03/07/2014 - 19:36 नवीन
आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही एक वेगळीच शैली तुम्ही निर्माण केली आहे. तुम्ही ह्या शैलीवर बिनदिक्कतपणे स्वामित्व हक्क सांगु शकता. ह्या कथेत आधीच्या कथेत जो नेहेमीचा पंच असायचा तो काही दिसला नाही. अर्थात तसा तो प्रत्येक कथेत असावाच असाही काही हट्ट नाही.मी फक्त एक निरिक्षण नोंदवले.आन्जीच्या नजरेतुन आजुबाजुला नेहेमीच्या घटनांना पाहणे हे एकाच वेळी मनोरंजक व विचार करायला लावणारे असे आहे.
  • Log in or register to post comments

निरीक्षण

आतिवास
Mon, 03/10/2014 - 09:52 नवीन
तुमचं निरीक्षण मोकळेपणाने सांगितलंत; त्याबद्दल आभार. बाकी शैलीच्या हक्काबद्दल - ही आजुबाजूच्या वातावरणातून 'उचललेली' शैली आहे - आणि ती मिश्र शैली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

आन्जी

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 03/07/2014 - 20:39 नवीन
या कथा वाचुन मला प्रकाश संतांचा लंपन आठवतो...किंवा मालगुडी डेजमधला व्यंकटेशा
  • Log in or register to post comments

+१११११ लंपन आठवला...

पिशी अबोली
Mon, 03/10/2014 - 11:45 नवीन
+१११११ लंपन आठवला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

मस्तच!

पैसा
Fri, 03/07/2014 - 23:21 नवीन
मोत्या कंदीबी सगळ्यांपेक्षा लै चांगला! त्येला फकस्त मायाच करता येत्ये!
  • Log in or register to post comments

तसं नाय पैसा ताई मोत्या

जयनीत
Sun, 03/09/2014 - 11:36 नवीन
तसं नाय पैसा ताई मोत्या आन्जीचा फास्टफ्रेंड! आता तो गुर्जीं ना सोडतोय व्हय? निंगु द्या त्यास्नी भायर मंग बगा मजा.
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
Mon, 03/10/2014 - 09:53 नवीन
हे 'भविष्य' सुचलं नव्हतं मला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयनीत

आभार

आतिवास
Mon, 03/10/2014 - 09:44 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

ही कथाही आवडली!

बॅटमॅन
Mon, 03/10/2014 - 11:42 नवीन
ही कथाही आवडली! मौ चा उल्लेख वाचून कालच घरात २-३ तास अडकून पडलेल्या एका बोकोबांची आठवण झाली. मस्त गबदुल होता. तो सुटल्यावर अखेरीस जीव भांड्यात पडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा